एक्स्प्लोर

वेळ संपली तरी चंद्रहार पाटलांकडून मतमोजणी दरम्यान प्रतिनिधी नाही, आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार?

4 जूनला लोकसभेची मतमोजणी पार पडणार आहे. मतमोजणी प्रकियेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांच्याकडून अद्याप मतमोजणी दरम्यान प्रतिनिधीच दिले नाहीत.

Chandrahar Patil : सांगली लोकसभेच्या (Sangli Loksabha) दृष्टीनं एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मतमोजणी प्रकियेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांच्याकडून अद्याप मतमोजणी दरम्यान प्रतिनिधीच दिले नाहीत. मतमोजणीच्या 104 टेबलसाठी प्रतिनिधी द्यायचे होते. मात्र, दिलेल्या वेळेत चंद्रहार पाटलांच्या प्रतिनिधींची यादी शासनाकडे पोहोचलीच नाही.  

चंद्रहार पाटील हे जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याची शक्यता

सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील निवडणुकीच्या मैदानात आहेत. सांगलीत तिरंगी लढत होत आहे. भाजपकडून पुन्हा संजयकाका पाटील हे तर काँग्रेसचे विशाल पाटील हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यामुळं या मतदारसंघाकडं राज्याचं लक्ष लागलं आहे. येत्या 4 जूनला मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र, त्यापूर्वी मतमोजणी दरम्यान प्रतिनिधी देणं गरजेचे असते. ते प्रतिनिधी अद्याप चंद्रहार पाटील यांनी दिले नाही. याची मुदत देखील संपली आहे. आज चंद्रहार पाटील हे जिल्हाधिकाऱ्यांना भेटून प्रतिनिधी घेण्याची विनंती करण्याची शक्यता आहे.  

तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी?

सांगली लोकसभेची निवडणूक उमेदवारी जाहीर होण्यापासून हा मतदारसंघ चर्चेत होता. शेवटी भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) या दोन उमेदवारांमध्येच आता खरी लढाई असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीचा निकाल येण्यापूर्वी सांगली लोकसभा मतदारसंघात दोन कार्यकर्त्यामध्ये पैजे लागल्याची एक पोस्ट सोशल मिडियावर तूफान वायरल होते आहे. या मतदारसंघातून काँग्रसचे नेते विशाल पाटील हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, ही जागा शिवसेना "ठाकरे गटाला सोडण्यात आली. चंद्रहार पाटील हे या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडण्यात आली आहे. त्याबदल्यात सांगलीची जागा शिवसेना सोडल्याचे सांगण्यात आले. मात्र, यानंतर सांगली काँग्रेसमध्यो मोठी नाराजी असल्याचं पाहायला मिळालं. या मतदारसंघातून विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं या मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. 

दरम्यान, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी खूप प्रयत्न केले होते. सांगली काँग्रेसच्या नेत्यांनी उमेदवारी मिळावी म्हणून दिल्लीवारी देखील केली होती. मात्र, अखेर उमेदवारी शिवसेना ठाकरे गटाला देण्यात आल्यानं सांगली काँग्रेसमध्ये नाराजी पाहायला मिळाली.

महत्वाच्या बातम्या:

सांगलीच्या जतमध्ये चाऱ्याचा तुटवडा; छावण्यांची वाढती मागणी, मात्र, आचारसंहितेमुळे मदत मिळणं कठीण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये ''घरवापसीची पे चर्चा''
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये ''घरवापसीची पे चर्चा''
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 28 जून 2024 Top 25 28 June 2024Petrol-Disel Price : पेट्रोल डिझेलचा मुंबई, नवी मुंबई, ठाण्यातला दर घटवला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये ''घरवापसीची पे चर्चा''
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये ''घरवापसीची पे चर्चा''
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
विधानसभा निवडणुकीच्या तयारीली वेग, निवडणूक आयोग लागले कामाला
विधानसभा निवडणुकीच्या तयारीली वेग, निवडणूक आयोग लागले कामाला
Embed widget