(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Vidhansabha Election : अमित शाहांचा शब्द महायुतीनं खरा करुन दाखवला, तब्बल 135 मतदारसंघात 50 टक्क्यांपेक्षा अधिक मतं, महाविजयाची वैशिष्ट्ये एक क्लिकवर
Amit Shah and Maharashtra Vidhansabha Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवलाय.
Amit Shah and Maharashtra Vidhansabha Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठं यश मिळवलंय. निवडणुकीत महाविकास आघाडीचा अक्षरश: सुपडा साफ झालाय. महायुतीने 237 जागा मिळवल्या आहेत, तर महाविकास आघाडीला केवळ 50 जागांवर समाधान मानावे लागले आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने अनेक नवे विक्रम केले आहेत.
विरोधक किती ही एकत्रित आले, तरी आम्ही 50% मतं घेऊन विजयी होऊ, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अनेकदा भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी बोलतात. मात्र, देशात राजकीय मैदानावर प्रत्यक्षात असे फारसे घडले नव्हते.. यंदा मात्र, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीने 50% पेक्षा जास्त मतं घेण्याची किमया एक दोन नव्हे तर तब्बल 135 मतदारसंघात करून दाखवली आहे.
राज्यात महायुतीने जिंकलेल्या 235 जागांपैकी 135 जागांवर महायुती झालेल्या मतदानाच्या 50% पेक्षा जास्त मते घेऊन विजयी झाली आहे...
सर्वाधिक 85 ठिकाणी भाजप ने 50% पेक्षा जास्त मतदान घेतले आहे... तर शिंदेंच्या शिवसेनेने 30 ठिकाणी आणि अजित दादांच्या राष्ट्रवादीने 20 ठिकाणी 50% पेक्षा जास्त मतदान घेतले आहे...
भाजपचे 26 उमेदवार त्यांच्या मतदारसंघात झालेल्या मतदानाचे 45% पेक्षा जास्त मतं घेऊन जिंकले आहे...
राज्यातील एकूण मतदानात भाजपला सुमारे सत्तावीस टक्के मत मिळाले असले, तरी फक्त भाजपनं लढवलेल्या 149 जागांचा विचार केल्यास तर त्या मतदारसंघात भाजप मतांची टक्केवारी सरासरीने 51.78% होते..
उत्तर महाराष्ट्रात तर भाजपच्या मतांची सरासरी टक्केवारी 57% पर्यंत गेली आहे.. उत्तर महाराष्ट्रात भाजपने लढवलेल्या 21 जागांवर भाजपने झालेल्या मतदानाचे 57.09% मतं मिळविले आहे...
पश्चिम महाराष्ट्रातील 26 जागा भाजपने लढवल्या असून तिथे भाजपच्या मतांची सरासरी 55.47% आहे...
ठाणे जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेने नऊ जागा लढवल्या असून तिथे शिवसेनेच्या मतांची सरासरी 54% एवढी आहे...
कोकणातही शिंदेंच्या शिवसेनेने नऊ जागांवर 50% पेक्षा जास्त मतं घेतली आहे...
विशेष म्हणजे मतांच्या याच प्रचंड टक्केवारीमुळे भाजपचा एकही उमेदवार राज्यात तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला नाही... भाजपने उभं केलेल्या 149 उमेदवारांपैकी 132 उमेदवार पहिल्या क्रमांकावर राहून विजयी झाले आहे... तर उरलेले 17 जण दुसऱ्या क्रमांकावर आहेत...
अजित दादांच्या राष्ट्रवादीचेही फक्त 3 उमेदवार वगळता सर्वच उमेदवार पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहे.. अजित दादांचे फक्त तीन उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहे..
तर शिंदेंच्या शिवसेनेचे फक्त 5 उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर असून उरलेले सर्व उमेदवार पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहे...
याच प्रचंड टक्केवारीमुळे राज्यातील आठ मतदारसंघांवर भाजप उमेदवार एक लाख पेक्षा जास्त मताधिक्य घेऊन जिंकले आहे..
महायुतीचे उमेदवार अर्ध्यापेक्षा जास्त महाराष्ट्रात 50% च्या वर मतदान घेत असताना महाविकास आघाडीच्या उमेदवारांना त्याच मतदारसंघात मात्र 35 ते 38 टक्केच मतदान मिळाले.. काही काही ठिकाणी तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे मतदान 30 टक्क्यांच्या ही खाली घसरले आहे... त्यामुळेच महायुतीचे अनेक उमेदवार मोठ्या मताधिक्यांनी विजयी होताना पाहायला मिळाले आहे...
इतर महत्त्वाच्या बातम्या