एक्स्प्लोर

Rashmi Shukla : मोठी बातमी! महायुतीसोबत रश्मी शुक्लाही पुन्हा आल्या, राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती

Rashmi Shukla IPS : रश्मी शुक्ला यांचा कार्यकाल हा जून महिन्यातच संपल्यानंतर त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर काँग्रेसने त्यांच्या विरोधात तक्रार केली होती.

मुंबई : राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत येण्यापूर्वीच मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रश्मी शुक्ला यांची पुन्हा एकदा राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी रश्मी शुक्ला आपला पदभार स्वीकारणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने पदमुक्त केलं होतं. आता पुन्हा त्यांना सेवेत दाखल करून घेण्यात आलं आहे.  

राज्यातल्या काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षनेत्यांचे फोन टॅपिंगचा आरोप असलेल्या रश्मी शुक्लांना निवडणुकीच्या काळात पदावरून हटवण्यात आलं होतं. काँग्रेसने केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्याच्या पोलिस महासंचालकपदी संजय कुमार वर्मा यांची नियुक्ती केली होती. पण त्यांच्या नियुक्तीमध्ये तात्पुरती नियुक्ती असा शब्द वापरण्यात आला होता. 

विधानसभा निवडणुकीचा निकाल महायुतीच्या बाजून आला असून राज्यात आता महायुतीचं सरकार येणार आहे. त्यामुळे निकाल लागल्यानंतर लगेचच रविवारी संध्याकाळी रश्मी शुक्ला यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्यानंतर आता रश्मी शुक्लांची पुन्हा एकदा पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. 

Who Is Rashmi Shukla :  कोण आहेत रश्मी शुक्ला?

रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असून महाराष्ट्र पोलिसांच्या सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांपैकी त्या एक आहेत. रश्मी शुक्ला यांनी भूगर्भशास्त्र या विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. वयाच्या 22 व्या वर्षी त्या यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या. 2005 रश्मी शुक्ला यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले होते. 2008 मध्ये त्यांची महाराष्ट्र सरकारमध्ये समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

सन 2013 मध्ये, रश्मी शुक्ला यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक देऊन गौरविण्यात आले. 2014 ते 2019 या काळात रश्मी शुक्ला यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. 

सन 2014 ते 2019 या काळात रश्मी शुक्ला या राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. त्यावेळी काँग्रेसचे नाना पटोले यांच्यासह अनेक जणांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. 

रश्मी शुक्ला या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होणार्‍या पहिल्या महिला ठरल्या होत्या. राज्याच्या पोलीस महासंचलाकपदी नियुक्ती होण्यापूर्वी रश्मी शुक्ला या केंद्रात सशस्त्र सीमा दलाच्या (SSB) केंद्र प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. जून 2024 मध्ये त्या निवृत्त होणार होत्या. मात्र, राज्य सरकारने त्यांना मुदतवाढ दिली होती. रश्मी शुक्ला यांनी  पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde on Missing Link : एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन; एकनाथ शिंदेंची टिप्पणी
एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन : एकनाथ शिंदे
Jayant Patil: 'आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनात ..' जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?
'आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनात ..' जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?
Kiran Lahamate: राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना
राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde on Missing Link : एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन; एकनाथ शिंदेंची टिप्पणी
एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन : एकनाथ शिंदे
Tiger Dart: वाघिणीला जेरबंद करणारी 'शेरनी'; प्रियल चोरगडेंनी वाघाच्या पिंजऱ्यात बसून मारला डार्ट
वाघिणीला जेरबंद करणारी 'शेरनी'; प्रियल चोरगडेंनी वाघाच्या पिंजऱ्यात बसून मारला डार्ट
Eknath Shinde : पाणी की तरह ये दोस्ती हमारी कोई भी कोई कितना भी चाहे जुदा नही होंगे, एकनाथ शिंदेंचं देवेंद्र फडणवीसांसोबतच्या मैत्रीवर शायरीतून भाष्य
हम वो नही जो दिल तोड देंगे, थाम कर हात फिर साथ छोड देंगे, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Jayant Patil: 'आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनात ..' जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?
'आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनात ..' जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?
Kiran Lahamate: राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना
राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना
Rupali Chakankar and Ashok Kharat: सोशल मीडियावर माझ्या 'त्या' AI व्हिडीओंना 43 मिलियन्स व्ह्यूज, प्रतिमा मलीन झाली; रुपाली चाकणकरांनी कोर्टात काय-काय सांगितलं?
सोशल मीडियावर माझ्या 'त्या' AI व्हिडीओंना 43 मिलियन्स व्ह्यूज, प्रतिमा मलीन झाली; रुपाली चाकणकरांनी कोर्टात काय-काय सांगितलं?
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
Aaditya Thackeray : 'हि कसली मर्दानगी, देवेंद्र फडणवीस यांचे हात कोणी बांधलेत?' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंवरून आदित्य ठाकरेंचा प्रहार; एकनाथ शिंदेंवरही सडकून टीका
'हि कसली मर्दानगी, देवेंद्र फडणवीस यांचे हात कोणी बांधलेत?' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंवरून आदित्य ठाकरेंचा प्रहार; एकनाथ शिंदेंवरही सडकून टीका
Embed widget