आर आर आबा हे इमानदार होते, अजित पवारांची फायनल चौकशी देवेंद्र फडणवीस यांनी लावली
आर आर आबा हे इमानदार होते. अजित पवारांची (Ajit Pawar) फायनल चौकशी ही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनींच लावल्याचे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं.
Supriya Sule on Devendra Fadnavis : आर आर आबा हे इमानदार होते. अजित पवारांची (Ajit Pawar) फायनल चौकशी ही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनींच लावल्याचे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केलं. गेल्या चार पाच दिवसांत ज्या घटना घडट आहेत त्याचे मूळ देवेंद्र फडणवीस आहेत असंही सुळे म्हणाल्या. पहिला आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहास्तव चौकशी केल्याचे सुळे म्हणाल्या.
पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रात 7 ते 8 सभा घ्याव्या लागतात हा स्वाभिमानी जनतेचा विजय
अजित पवार विरोधी पक्षात असताना देखील देवेंद्र फडणवीस फाईल दाखवीत होते. गोपनीयतेची शपथ घेता मग हे काम कसं झालं? असा सवलाही सुळे यांनी केला. 80 तासाचे सरकार बसवले त्यावेळी अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्यात तथ्य नाही असं सांगितलं होतं असेही सुळे म्हणाल्या. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भोपाळ येथे बोलले होते की, महाराष्ट्रात 70 हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. ही नैसर्गिक करप्ट पार्टी आहे असे सुळे म्हणाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना 7 ते 8 सभा घ्याव्या लागतात हे महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेचा विजय असल्याचे सुळे म्हणाल्या.
गेलेल्या माणसाबद्दल बोलणं योग्य नाही असं म्हणत सुळे यांनी अजित पवारांनी आर आर पाटील यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर टीका केली. आमच्यावर चांगले संस्कार आहेत असे सुळे म्हणाल्या. महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी वाढल आहे, असं म्हणत सुळेंनी फडीस यांच्यावर देखील टीका केली.
नेमकं काय म्हणाले होते अजित पवार?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे तासगावात माजी खासदार संजयकाका पाटील यांचा अर्ज भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी दिवंगत आर. आर. पाटील यांनी सिंचन घोटाळ्याच्या फाईलवर सही केल्याचा गौप्यस्फोट केला. यावेळी अजित पवार यांनी सांगली मधील सभेत सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणी आर आर पाटील यांनी माझा केसाने गळा कापला असं वक्तव्य केलं. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बंगल्यावर बोलवून आर. आर. पाटील यांनीच तुमची खुली चौकशी करावी असे आदेश देत सही केल्याचे दाखवलं. ज्याच्यावर एवढा विश्वास ठेवला. एवढं सहकार्य केलं. त्यात आर. आर. पाटील यांनी माझा केसाने गळा कापला होता,असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तासगाव येथे केला होता.
महत्वाच्या बातम्या:
Ajit Pawar : आर. आर.पाटील यांनी माझा केसाने गळा कापला, सिंचन घोटाळ्याच्या फाईलवरील सही फडणवीसांनी दाखवली, अजित पवारांचा आरोप