एक्स्प्लोर

सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी, दोन्ही खासदार ऐकमेकांविरोधात प्रचारात उतरले, दोघांचींही प्रतिष्ठा पणाला

Maharashtra Vidhansabha Election 2024 : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) दोन्ही खासदार एकमेकांविरोधात प्रचारात उतरले आहेत.

Maharashtra Vidhansabha Election 2024 : सोलापूर (Solapur) जिल्ह्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) दोन्ही खासदार एकमेकांविरोधात प्रचारात उतरले आहेत. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील  (Pandharpur Mangalvedha Assembly) राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांनी माचनूर येथील महादेव मंदिरात दर्शन घेत केला प्रचाराचा शुभारंभ केला आहे. यावेळी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या विराट सभेची सुरुवात झाली. तर दुसरीकडे कालच संध्याकाळी महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचाराचा शुभारंभ माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Darishsheel Mohite Patil) यांच्या हस्ते याच ठिकाणी झाला होता. 

काल धैर्यशील मोहिते पाटील यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव न घेता गद्दाराला जनता धडा शिकवेल असा टोला लगावला होता. यावर आज प्रणिती शिंदे आणि भगीरथ भालके काय उत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंगळवेढा तालुक्यातील अतिशय पुरातन असणाऱ्या माचनूर येथील महादेव मंदिरात सर्व प्रमुख उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडल्याने माचनुर चा महादेव कोणाला पावणार याचीही चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे. याच ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी दोन दिवसांपूर्वी प्रचाराचा शुभारंभ केला होता तर काल राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अनिल सावंत यांचा येथेच शुभारंभ झाला होता. 

तिन्ही उमेदवारांचं जोरदार शक्तीप्रदर्शन, निवडणूक रंगतदार होणार

दरम्यान, तिन्ही उमेदवारांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनामुळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची निवडणूक रंगतदार होणार आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीत झालेली बिघाडी कोणाला फायदेशीर ठरते यावर येथील निकाल अवलंबून असणार आहे. महाविकास आघाडीतील लोकसभेला एकत्र असलेले माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे अनिल सावंत यांच्या प्रचारासाठी तर सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे या भगीरथ भालके यांच्या प्रचाराला आल्याने जिल्ह्यातील दोन्ही खासदार विधानसभेला एकमेकांच्या विरोधात असल्याचे चित्र तयार झाले आहे.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील लढत रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महायुतीकडून विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना संधी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. सुरुवातील काँग्रेसने भगीरथ भालके यांनी तिकीट जाहीर केलं होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं अनिल सावंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळं आता पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : अमेरिकन निवडणुकीचं सखोल विश्लेषण, भारतावर काय परिणाम होणार ?Sadabhau Khot Special Report : सदाभाऊ खोत यांची पवारांवर टीका,राष्ट्रवादीच्या नेत्यांचं प्रत्युत्तरZero Hour : महायुतीच्या आधीच अजित दादांच्या राष्ट्रवादीचा स्वतंत्र जाहीरनामाZero Hour:डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अध्यक्ष ते महायुतीच्या आधी दादांचा जाहीरनामा;झीरो अवरमध्ये चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Rahul Gandhi :  महालक्ष्मी योजना ते जातनिहाय जनगणना, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा
खटाखट, खटाखट, खटाखट, राहुल गांधींचा मुंबईत पुन्हा नारा, महालक्ष्मी योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार, कारण सांगितलं
Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
Embed widget