एक्स्प्लोर

शरद पवारांची मोहोळमध्ये सरप्राईज उमेदवारी, माजी आमदाराची ‘लेक लाडकी’ मैदानात, माढ्यातून कुणाला उमेदवारी?

मोहोळ विधानसभेच्या (Mohol Vidhansabah election) जागेवर शरद पवार गटाने सरप्राईसिंग उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात पवार गटाने लाडक्या बहिणीली उमेदवारी जाहीर केली आहे.

Vidhansabha Election NCP Sharad Pawar Party Third Candidate List 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर (NCP Sharad Pawar Party Third Candidate List 2024) झाली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी 9 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये मोहोळ विधानसभेच्या (Mohol Vidhansabah election) जागेवर शरद पवार गटाने सरप्राईसिंग उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात माजी आमदार रमेश कदम यांच्या नावाची चर्चा होती. पण शरद पवार गटाने रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम (siddhi Kadam) यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, दुसरीकडे माढा आणि पंढरपुरात अद्याप सस्पेंन्स कायम आहे. या मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार? याबाबत तर्क वितर्क लढवले जातायेत. 

मोहोळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळालेल्या सिद्धी कदम या माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या आहेत. रमेश कदम हे अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ घोटल्याप्रकरणी तुरुंगात होते. त्या इमेजचा फटका बसू नये म्हणून कदाचित सिद्धी कदम यांना उमेदवारी दिल्याची चर्चा सुरु आहे. त्यावेळी अपक्ष असलेल्या रमेश कदम यांना 25 हजार मतं मिळाली होती. रमेश कदम यांच्यावर असलेला ठपका पाहता शरद पवार गटाने सिद्धीला संधी दिल्याचे दिसत आहे. रमेश कदम जामिनावर बाहेर आहेत. त्यांचा आगामी काळात जामीन रद्द झाला तर अडचण होऊ शकतो, म्हणून सिद्धीचा पर्याय निवडण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

कोण आहेत सिद्धी कदम? 

सिद्धी कदम या माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या आहेत.
सिद्धी कदम यांचे शिक्षण टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्समधून झालं आहे. 
त्या एका NGO मध्ये देखील काम करतात.  
2019 च्या निवडणुकीत वडील तुरुंगात असताना त्यांनीच प्रचार यंत्रणा सांभाळली होती

आतापर्यंत जाहीर झालेल्या सोलापुर जिल्ह्यातील उमेदवारापैकी सर्वात तरुण उमेदवार 

सिद्धी कदम यांचे वय 26 वर्षे आहे.

मोहोळमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता

मोहोळमधून शरद पवार गटाकडून अनेकजण इच्छुक होते. त्यामध्ये प्रामुख्यानं संजय क्षीरसागर, राजू खरे यांची नावे आघाडीवर होती.  तसेच लक्ष्मण ढोबळे यांच्यासह त्यांचे पुत्र अभिजीत ढोबळे, त्यांच्या कन्या कोमल ढोबळे या देखील इच्छुक होत्या. मात्र, अशाचत सिद्धी यांचे नाव अचानक जाहीर केल्याने मोहोळमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

राष्टरवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारांची तिसरी यादी

कारंजा- ज्ञायक  पाटणी
हिंगणघाट- अतुल वामदिले
नागपूर हिंगणा- रमेश बंग
अणुशक्तीनगर- फहाद अहमद
चिंचवड- राहुल कलाट
भोसरी- अजित गव्हाणे 
बीड माजलगाव- मोहन बाजीराव जगताप
परळी- राजेश देशमुख
मोहोळ- सिद्धी रमेश कदम

महत्वाच्या बातम्या:

शरद पवारांची 9 उमेदवारांची तिसरी यादी, चिंचवडचा पत्ता उलगडला; धनंजय मुंडेंविरुद्धही उमेदवार ठरला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Embed widget