(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नवाब मलिकांचा पोपटाचा व्यवसाय नाही, त्यांनी भविष्य सांगू नये, आशिष शेलारांचा टोला
नवाब मलिक (Nawab Malik) हा आमचा उमेदवार नाही. आमचा उमेदवार शिवसेनेचा आहे, त्याला आमचा पाठिंबा असल्याचे मत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी व्यक्त केलं.
Ashish Shelar on Nawab Malik : नवाब मलिक (Nawab Malik) हा आमचा उमेदवार नाही. आमचा उमेदवार शिवसेनेचा आहे, त्याला आमचा पाठिंबा असल्याचे मत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी व्यक्त केलं. तसेच नवाब मलिक यांनी भविष्य सांगू नये, त्यांचा व्यवसाय पोपटाचा नाही, असी टीका केली शेलार यांनी केली.
नेमकं काय म्हणाले होते नवाब मलिक?
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात काय होईल, हे सांगता येत नाही. महाराष्ट्रात सध्या वेगळंच काहीतरी सुरु आहे. वेगवेगळी चर्चा या महाराष्ट्रात सुरु आहे. महाराष्ट्रात कोणाचं सरकार येईल, हे आता ठामपणे सांगता येणार नाही. शरद पवार (Sharad Pawar) आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यातही काहीतरी सुरु आहे, अशी जोरदार चर्चाही आहे. विधानसभेच्या निकालानंतर कोण कोणासोबत राहील, हेदेखील सांगता येत नाही, असे वक्तव्य अजितदादा गटाचे नेते नवाब मलिक यांनी केले आहे. त्यांच्या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. यावर आशिष शेलारांनी टीका केली आहे.
मी जनतेच्या सतत संपर्कात राहणारा कार्यकर्ता
जो जनतेशी संपर्कात नसतो त्याला प्रचार करावा लागतो. मी जनतेच्या सतत संपर्कात राहणारा कार्यकर्ता असल्याचे मत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केलं. बांद्रा बॉय म्हणून माझी ओळख आहे.. त्यामुळे महायुती इथे जिंकणार आहे.. मुंबईत 35 विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार उभे आहेत. हे सर्व मतदारसंघ जिंकण्याचा आमचा प्रयत्न आहे. शिवडीबाबत आज संध्याकाळी सभेत बोलेन असंही शेलार म्हणाले.
माहिम विधानसभेबाबत महायुती एकत्र निर्णय घेईल
माहिम विधानसभेबाबत महायुती एकत्र निर्णय घेईल असे शेलार म्हणाले. तसेच महायुतीत कुठलाही बेबनाव महायुतीत नाही. महायुती यावर चर्चा करून निर्णय करेल तोवर मी बोलण योग्य नाही असेही शेलार म्हणाले. अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा हा विचार सुरु होता असेही ते म्हणाले. राज ठाकरे यांनी त्यांचे मत मांडले असावे. राजकारणाचा चिखल उद्धव ठाकरे आणि त्यांच्या उबाठा सेनेने केला आहे. लाडकी बहिण योजनेचा धक्का सर्वच पक्षांना बसला आहे. आता मनसेने देखील घेतला आहे. चिन्हाबाबत न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्यावर जे आक्षेप घेत आहेत त्यांनी एल एल बी च्या पहिल्या वर्गात जाऊन बसावं असेही शेलार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: