एक्स्प्लोर

Nanded : नांदेड लोकसभेसाठी 67.81 तर विधानसभेसाठी 69.45 टक्के मतदान, अशोक चव्हाणांच्या मुलीच्या मतदारसंघात किती टक्के?

Nanded : लोकसभा पोटनिवडणुकीतही गेल्या वेळेच्या तुलनेत 7 टक्के अधिक मतदान झाले असून ही टक्केवारी 67.81 आहे.

नांदेड : नांदेड जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणूक व 9 विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले. निवडणूक आयोगाने 21 तारखेला दुपारी जाहिर केलेल्या अंतिम आकडेवारी नुसार नांदेड जिल्ह्याने यावेळी 2019 च्या तुलनेने विक्रमी मतदान केले असून यावेळी विधानसभेसाठी 69.45 टक्के मतदान झाले आहे. तर लोकसभा पोटनिवडणुकीतही गेल्या वेळेच्या तुलनेत 7 टक्के अधिक मतदान झाले असून ही टक्केवारी 67.81 आहे.

उद्या शनिवार 23 नोव्हेंबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये ज्ञान स्त्रोत केंद्र ( नॉलेज रिसोर्स सेंटर ) येथे सकाळी 7 वाजल्यापासून मतमोजणी सुरु होणार आहे. पहिल्या व दुसऱ्या माळ्यावर विधानसभा व लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. पहिल्या माळयावर खोली क्रमांक 102 व खोली क्रमांक 6 याठिकाणी सहा विधानसभा क्षेत्राची मतमोजणी होणार असून सर्व मतयंत्र याठिकाणच्या स्ट्रॉगरुमध्ये पोहोचले आहे. तसेच दुसऱ्या माळ्यावर खोली क्रमांक 202 ते 206 मध्ये लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी होणार आहे. याठिकाणच्या स्ट्रॉगरुममध्ये मतयंत्र पोहोचली आहेत. उमेदवारांच्या उपस्थितीत सर्व मतपेट्या स्ट्राँगरुममध्ये बंद झाल्या असून सीसीटीव्हीच्या निगराणीत ठेवण्यात आल्या आहेत. 23 नोव्हेंबरला सकाळी उमेदवारांच्या व त्यांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत मतदान यंत्र बाहेर काढले जातील व त्यानंतर मतमोजणीला सुरुवात होईल. याठिकाणी वेगवेगळे कक्ष करण्यात आले असून उमेदवारांचे प्रतिनिधींसाठी देखील थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विधानसभेची 14 टेबलावर मोजणी होणार आहे. अंदाजे 24 ते 28 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे.

नांदेड लोकसभेसाठी 19 लाखांच्यावर तर विधानसभेसाठी 27 लाखांच्यावर मतदार संख्या आहे. दरम्यान काल झालेल्या मतदानात शेवटच्या मतदानाची आकडेवारी आज हाती आली आहे. रात्री उशिरापर्यत मतदान सुरु होते. त्यामुळे आज अंतिम आकडेवारी पुढे आली आहे. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भोकर मतदारसंघात सर्वात जास्त 76.33 टक्के तर सर्वात कमी 86-उत्तरमध्ये 60.60 टक्के मतदान झाले आहे. तर 87-नांदेड दक्षिणमध्ये 63.99, नायगावमध्ये 74.02, देगलूर 63.22, मुखेड 70.14 टक्के मतदान झाले आहे, असे एकूण 67.81 टक्के मतदान झाले आहे.  

तर विधानसभेसाठी किनवटमध्ये 71.95 टक्के, हदगावमध्ये 71.77, भोकर मतदारसंघात 76.33, नांदेड उत्तरमध्ये 60.6 टक्के, नांदेड दक्षिणमध्ये 63.99 टक्के, लोहा मतदारसंघात 75.2 टक्के, नायगाव मतदारसंघात 74.03 टक्के, देगलूर मतदारसंघामध्ये 63.22 टक्के, मुखेड मतदारसंघात 70.14 असे एकूण 69.45 टक्के मतदान झाले आहे.  विधानसभेसाठी सर्वात जास्त भोकर येथे 76.33 टक्के मतदान झाले आहे तर सर्वात कमी मतदान नांदेड उत्त्तर मध्ये 60.6 मध्ये झाले आहे.

 लोकसभा स्त्री-पुरुषनिहाय मतदान

लोकसभा पोटनिवडणूकीसाठी भोकर मतदारसंघात पुरुष 1 लाख 20 हजार 117 तर महिला 1 लाख 11 हजार 236 व इतर 3 असे एकूण 2 लाख 31 हजार 356 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. नांदेड उत्तर मतदारसंघात पुरुष 1 लाख 13 हजार 524 तर महिला 1 लाख 3 हजार 983 तर इतर 15 असे एकूण 2 लाख 17 हजार 522 तर नांदेड दक्षिण मतदारसंघात पुरुष 1 लाख 6 हजार 390 व महिला 96 हजार 326 व इतर 2 असे एकूण 2 लाख 2 हजार 718 मतदारांनी आपला हक्क बजावला.

नायगाव मतदारसंघात पुरुष 1 लाख 19 हजार 637 तर महिला 1 लाख 10 हजार 114 व इतर 1 असे एकूण 2 लाख 29 हजार 752 मतदारांनी मतदान केले. देगलूर मतदारसंघात पुरुष 1 लाख 2 हजार 290 महिला 95 हजार 111 व इतर 8 असे एकूण 1 लाख 97 हजार 409 मतदारांनी मतदान केले. मुखेडमध्ये पुरुष 1 लाख 11 हजार 876 तर महिला 1 लाख 3 हजार 524 व इतर 2 असे एकूण 2 लाख 15 हजार 402 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

विधानसभा निहाय स्त्री-पुरुषनिहाय मतदान  

किनवट मतदारसंघात पुरुष 1 लाख 4 हजार 154 महिला 96 हजार 342 व इतर 3 असे एकूण 2 लाख 499 मतदारांनी मतदान केले. हदगाव मतदारसंघात पुरुष 1 लाख 13 हजार 105 , महिला 1 लाख 1 हजार 546 व इतर 2 असे एकूण 2 लाख 14 हजार 653 मतदारांनी मतदान केले. भोकर मतदारसंघात पुरुष 1 लाख 20 हजार 223 महिला 1 लाख 11 हजार 239 व इतर 3 असे एकूण 2 लाख 31 हजार 365 मतदारांनी मतदान केले. 86 नांदेड उत्तर मध्ये पुरुष 1 लाख 13 हजार 522 महिला 1 लाख 3 हजार 978 , इतर 15 असे एकूण 2 लाख 17 हजार 515 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

नांदेड दक्षिणमध्ये पुरुष  1 लाख 6 हजार 399 महिला 96 हजार 331 तर इतर 2 असे एकूण 2 लाख 2 हजार 732 मतदारांनी मतदान केले. लोहा मतदारसंघात पुरुष 1 लाख 17 हजार 651 महिला 1 लाख 9 हजार 183 व इतर 3 असे एकूण 2 लाख 26 हजार 837 मतदारांनी मतदान केले.

नायगाव मतदारसंघात पुरुष 1 लाख 19 हजार 642 महिला 1 लाख 10 हजार 114 व इतर 1 असे एकूण 2 लाख 29 हजार 757 मतदारांनी  तर  देगलूर मतदारसंघात पुरुष 1 लाख 2 हजार 289 तर महिला 95 हजार 111 इतर 8 असे एकूण 1 लाख 97 हजार 408 मतदारांनी आपला हक्क्‍ बजावला. मुखेड मतदारसंघात पुरुष 1 लाख 11 हजार 875 व महिला 1 लाख 3 हजार 524 इतर 2 असे एकूण 2 लाख 15 हजार 401 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असे एकूण 27 लाख 87 हजार 947 मतदारापैकी 19 लाख 36 हजार 167 उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला.

किनवट, हदगाव व लोहा येथे त्या-त्या ठिकाणी मतमोजणी

किनवटला आयटीआय कॉलेजमध्ये तर हदगावला समाज कल्याण भवन येथील अनुसूचित जातीचे मुलींचे शासकीय वसतीगृह तर लोहा येथे महसूल हॉल, तहसिल कार्यालयाच्या ठिकाणी  मतमोजणी होणार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Maharashtra Vidhansabha Election 2024 : महायुतीला 175 पेक्षा जास्त जागा, महाविकास आघाडी 110 जागांसाठी संघर्ष, टूडे चाणक्यचा एक्झिट पोल समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 16 January 2025Hindenburg Research | हिंडेनबर्गचं पॅकअप, अदानींचे शेअर वधारले, भारतावर काय परिणाम? Special ReportSupriya Sule VS Ajit Pawar | काका पुतणे बसले लांब, ताई-दादांचीही टाळाटाळ Special ReportRajkiya Shole on Saif ali Khan| सैफ अली खानवर हल्ला, विरोधकांकडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Raju Shetti on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Embed widget