Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 : निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाचं परफेक्ट नियोजन, मतदारांना महत्त्वाचं आवाहन
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 : महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि झारखंड राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार, डॉ. एस. एस. संधू,ज्ञानेश कुमार यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. महाराष्ट्र आणि झारखंडचा दौरा केला. राजकीय पक्ष, अधिकारी, पोलीस दलातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
महाराष्ट्रात 36 जिल्हे 288 विधानसभा मतदारसंघ, 234 हे खुले प्रवर्ग,25 अनूसुचित जमाती आणि 29 मतदारसंघ अनूसुचित जातीसाठी राखीव आहेत. राज्यात एकूण 9.63 कोटी मतदार आहेत. त्यापैकी 4.97 कोटी पुरुष मतदार असून 4.66 कोटी महिला मतदार आहेत. यामध्ये 1.85 कोटी तरुण मतदार आहेत. 20.93 लाख पहिल्यांदा मतदान करणारे मतदार असल्याची माहिती निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली. महाराष्ट्रात 100 वर्ष पूर्ण करणारे 47776 मतदार आहेत. 85 वर्षापेक्षा अधिक वय असणारे मतदार 42.43 लाख आहेत. 6.36 लाख दिव्यांग मतदार आहेत. तर, 6031 तृतीयपंथी मतदार राज्यात आहेत.
निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष होण्यासाठी आयोगाकडून दक्षता
मतदान केंद्रावर सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. मतदान केंद्रावरील सर्व प्रक्रियांची व्हिडीओग्राफी केली जाणार आहे.
तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार, वोटर हेल्पलाईन अॅपमध्ये मतदारांना माहिती पाहता येईल.
सी व्हिजिलचा वापर केला जाणार, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये जागरुक मतदार चुकीचं काही घडत असल्यास आम्हाला माहिती देतील अशी अपेक्षा असल्याचं राजीव कुमार म्हणाले.
गुन्हेगारी पार्श्वभूमीसंदर्भातील सूचना तीनवेळा वृत्तपत्रात माहिती द्यावी लागणार आहे.
कोणत्याही पदाधिकाऱ्याविरुद्ध तक्रार आली, एखाद्या पक्षाला झुकतं माप दिलं जात असल्याची तक्रार आल्यास कठोर कारवाई केली जाईल.
पैसे वाटप, दारू वाटप, मोफत गोष्टींचं वाटप यावर लक्ष ठेवलं जाईल.
आंतरराज्यीय हालचालींवर देखरेख ठेवण्यासाठी उत्पादन शुल्क, वाहतूक विभाग, जीएसटी यासह इतर विभागाचं पथक असेल.
दोन किमी दरम्यान मतदान केंद्र असणार आहे. सोशल मिडिया नरेटिव्ह वर लक्ष ठेवलं जाणार आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक कार्यक्रम :
निवडणुकीचं नोटिफिकेशन: 22 ऑक्टोबर 2024
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख: 29 ऑक्टोबर
अर्जांची तपासणी : 30 ऑक्टोबर 2024
अर्ज मागं घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर
मतदान :20 नोव्हेंबर 2024
मतमोजणी : 23 नोव्हेंबर 2024
निवडणूक प्रक्रिया समाप्त: 25 नोव्हेंबर 2024
झारखंड विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे.
पहिला टप्पा 43
नोटिफिकेशन 18 ऑक्टोबर
अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस 25 ऑक्टोबर
अर्जांची छाननी 28 ऑक्टोबर
अर्ज मागं घेण्याची तारीख 30 ऑक्टोबर
पहिला टप्पा मतदान 13 नोव्हेंबर
दुसरा टप्पा 38 जागा
निवडणुकीचं नोटिफिकेशन: 22 ऑक्टोबर 2024
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख: 29 ऑक्टोबर
अर्जांची तपासणी : 30 ऑक्टोबर 2024
अर्ज मागं घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर
मतदान :20 नोव्हेंबर 2024
मतमोजणी : 23 नोव्हेंबर 2024
निवडणूक प्रक्रिया समाप्त: 25 नोव्हेंबर 2024
इतर बातम्या :