एक्स्प्लोर

Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 : विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, 20 नोव्हेंबर रोजी मतदान, 23 तारखेला निकाल  

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Schedule : राज्यातील विधानसभेसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. त्यासाठीचं संपूर्ण वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Schedule : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी त्याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दिल्लीमधील केंद्रीय विज्ञान भवन या ठिकाणी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली आणि या तारखा जाहीर केल्या. 26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या सध्याच्या विधानसभेची मुदत संपणार आहे. 

Maharashtra Election 2024 Schedule : असं असेल महाराष्ट्राच्या निवडणुकीचं वेळापत्रक - 

  • निवडणुकीचं नोटिफिकेशन :  22 ऑक्टोबर 2024
  • अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 29 ऑक्टोबर 
  • अर्जांची तपासणी : 30 ऑक्टोबर 2024
  • अर्ज मागे घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर 
  • मतदान  : 20 नोव्हेंबर 2024
  • मतमोजणी : 23 नोव्हेंबर  2024

Maharashtra Voter List : 288 जागांसाठी किती मतदार असतील? 

  • एकूण मतदार - 9 कोटी 63 लाख
  • नव मतदार - 20.93 लाख
  • पुरूष मतदार - 4.97 कोटी
  • महिला मतदार - 4.66 कोटी
  • युवा मतदार - 1.85 कोटी
  • तृतीयपंथी मतदार - 6,031
  • 85 वर्षावरील मतदार - 12. 48 लाख
  • शंभरी ओलांडलेले मतदार - 47,776
  • दिव्यांग मतदार - 6.32 लाख

Maharashtra Voting Booth List : महाराष्ट्रात किती मतदान केंद्र असणार? 

  • एकूण मतदान केंद्र - 1 लाख 186 
  • शहरी मतदार केंद्र - 42,604 
  • ग्रामीण मतदार केंद्र - 57,582 
  • एका मतदान केंद्रावर सरासरी मतदार - 960

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तारीखा जाहीर करण्यात आल्या. महाराष्ट्रात एकूण 9.63 कोटी मतदार असून त्यासाठी 1 लाख 186 मतदार केंद्रावर मतदान होणार आहे. मतदानाची पूर्ण प्रक्रिया ही व्हिडीओ रेकॉर्ड होणार आहे. 

ज्येष्ठ नागरिकांसाठी, ज्यांचं वय 85 पेक्षा जास्त आहे त्यांना त्यांच्या घरातूनच मतदान करण्याची सुविधा प्राप्त करून देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना निवडणूक आयोगाचा एक फॉर्म भरावा लागणार आहे. 

महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे अजित पवार हे एका बाजूला असतील. दुसरीकडे काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे शरद पवार हे असतील. 

Suvidha Portal App : मतदारांसाठी सुविधा पोर्टल अॅप 

निवडणूक आयोगाच्यावतीने सुविधा पोर्टल नावाने अॅप जारी करण्यात आलं आहे. या एप्लिकेशन्सवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. एखाद्या ठिकाणी काही घटना घडली किंवा उशीरापर्यंत मतदान सुरु असेल तर केवळ फोटो काढून या एप्लिकेशन्सवर अपलोड केला की, 90 मिनिटांत निवडणूक आयोगाची टीम तिथं पोहचेल असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. 

एटीएमसाठी पैसे घेऊन जाणाऱ्या वाहनांवर निर्बंध

एटीएमसाठी पैसै घेऊन जाणाऱ्या गाडीला निवडणूक काळात रात्री 6 ते सकाळी 8 पर्यंत पैसे वाहतूक करता येणार नाही. राज्यातील पैसा, ड्रग्ज आणि दारुच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात येईल. याकाळात अँब्युलन्स, बँक आणि पतसंस्था यावर देखील लक्ष ठेवलं जाईल. 17 सी कॉपी पोलिंग एजंटला मतदान संपताच दिले जातील. यावर किती मतदान झालं याची माहिती असेल. सोशल मीडियात फेक, डीफ फेक प्रकार घडला तर कडक कारवाई होईल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
निवडणुकांची घोषणा होताच इम्तियाज जलिलांनी घेतली जरांगेंची भेट; राजकीय युतीवर झाली चर्चा?
निवडणुकांची घोषणा होताच इम्तियाज जलिलांनी घेतली जरांगेंची भेट; राजकीय युतीवर झाली चर्चा?
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Varsha Gaikwad : ⁠निवडणूक जाहीर, जागावाटप रखडलं? मविआत मुंबईच्या जागांवरुन राडा? ABP MAJHAEknath Shinde On Vidhan Sabha Election : दोन वर्षात केलेल्या कामची पोचपावती जनता आम्हाला देईल- शिंदेHeadlines 7 07 PM TOP Headlines 07 PM 15 October 2024Vijay Wadettiwar On Assembly Election : महाराष्ट्र निवडणूक झाल्यानंतर मोदींच्या खुर्चीला झटका बसेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
निवडणुकांची घोषणा होताच इम्तियाज जलिलांनी घेतली जरांगेंची भेट; राजकीय युतीवर झाली चर्चा?
निवडणुकांची घोषणा होताच इम्तियाज जलिलांनी घेतली जरांगेंची भेट; राजकीय युतीवर झाली चर्चा?
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Vijay Wadettiwar : नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
विधानसभेचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसच उरले, अद्याप उमेदवारांचा पत्ता नाही; मनसे अन् वंचितने घेतली आघाडी
विधानसभेचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसच उरले, अद्याप उमेदवारांचा पत्ता नाही; मनसे अन् वंचितने घेतली आघाडी
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: केंद्रीय निवडणूक आयोगाचा मुंबईतील मतदारांसाठी महत्त्वाचा निर्णय, ती चूक टाळणार, BMC आयुक्तांना कठोर निर्देश
केंद्रीय निवडणूक आयोगाचा मुंबईतील मतदारांसाठी महत्त्वाचा निर्णय, ती चूक टाळणार, BMC आयुक्तांना कठोर निर्देश
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम, अर्जाची तारीख, मतदान अन् निकाल; A टू Z अपडेट
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम, अर्जाची तारीख, मतदान अन् निकाल; A टू Z अपडेट
Embed widget