Jalna District Vidhan Sabha Election Results 2024 : जालना जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी...
Jalna Vidhan Sabha Election result all Constituency winning MLA : या विधानसभा निवडणुकीत जालना जिल्हा चांगलाच चर्चेत होता. या जिल्ह्यात कोणाचे वर्चस्व राहणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
जालना : विधानसभा निवडणूक 2024 चा निकाल (Vidhan Sabha Election Result 2024) आता स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. विशेष म्हणजे या निवडणुकीत जालना (Jalna District MLA) जिल्हा चर्चेच्या केंद्रस्थानी होती. अर्जुन खोतकर, राजेश टोपे यासारखे बडे नेते जालना जिल्ह्यातून निवडणुकीच्या रिंगणात होते. दरम्यान, आता जालना जिल्ह्यातील निवडणुकीचा निकाला स्पष्ट झाला आहे.
जालना विधानसभेचा निकाल काय? कोणाचा विजय?
1) घनसावंगी- हिकमत उढाण (शिवसेना- एकनाथ शिंदे गट)
2) जालना- अर्जुन खोतकर (शिवसेना- एकनाथ शिंदे गट)
3) बदनापूर- नारायण कुचे (भाजपा)
4) भोकरदन- संतोष दानवे (भाजपा)
5) परतूर-मंठा- बबनराव लोणीकर (भाजपा)
मराठा, ओबीसी आरक्षण आंदोलनाचा परिणाम झाला का?
गेल्या काही महिन्यातं जालना जिल्हा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आला. राज्यातील ओबीसी आणि मराठा आरक्षणाला याच राज्यातून चालना मिळाली. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन याच जिल्ह्यातून वाढवले. तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनीदेखील याच जिल्ह्यात उपोषणाला बसून ओबीसींचे आरक्षण वाचवण्याची मोहीम चालवली. त्यामुळे या दोन्ही आंदोलनांचा जालना जिल्ह्यात परिणाम होणार असा अंदाज राजकीय वर्तुळात लावला जात होता. या दोन्ही आंदोलनांचा फटका सत्तेतील महायुतीला बसू शकतो, असेही म्हटले जात होते. प्रत्यक्ष मात्र या जिल्ह्यातील महायुतीला चांगली मते मिळाली आहेत. या जिल्ह्यातील चारही मतदारसंघांत महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे आता या जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
2019 विधानसभा स्थिती
2019 विधानसभेमध्ये विद्यमान काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यात लढत झाली होती. मागच्या वेळी भाजप स्वतंत्र लढल्यामुळे अर्जुन खोतकर यांना फटका बसला होता. त्यामुळेच खोतकर यांचा या जागेवर भराभव झाला होता.
2019 निकाल:-
कैलास गोरंट्याल काँग्रेस 91835 मते.
अर्जुन खोतकर (शिवसेना)-66497 मते
कोणता पक्ष किती जागांवर आघाडीवर?
भाजपा-139
शिवसेना (एकनाथ शिंदे)- 54
राष्ट्रवादी (अजित पवार)- 40
शिवसेना (ठाकरे गट)- 20
राष्ट्रवादी (शरद पवार)- 13
काँग्रेस-19
हेही वाचा :