एक्स्प्लोर

Daund Assembly constituency: '4 तारखेच्या वाटाघाटीमध्ये जे होईल ते होईल पण...', दौंडची जागा मिळवण्यासाठी अजित पवार पक्षाचे नेते आग्रही

Daund Assembly constituency: दौंडची जागा मिळवण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. अजित पवारांनी मोठ्या प्रमाणात दौंड विधानसभा मतदारसंघाचा विकास केला.

दौंड: विधानसभेच्या उमेदवारीवरून राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच पुणे जिल्ह्यात दौंड आणि पुरंदरमध्ये महायुतीत अजित पवार गटाकडून भाजप आणि शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात थेट एबी फॉर्म देऊन बंडखोरीचे निशाण फडकवले आहे. दौंडची जागा मिळवण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. अजित पवारांनी मोठ्या प्रमाणात दौंड विधानसभा मतदारसंघाचा विकास केला. त्यामुळे ही जागा आम्हाला मिळावी अशी मागणी वैशाली नागवडे यांनी केलेली आहे. 

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या ४ तारखेच्या वाटाघाटीमध्ये जे होईल ते होईल पण आम्ही जागा मिळावी यावरती ठाम आहोत असं वैशाली नागवडे म्हणतात. भाजपचे नेते सातत्याने महायुती धर्म निभाव असं सांगतात. पण दौंड तालुक्याचा विकास अजित दादांच्या माध्यमातून झालेला आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीचीच असल्याचं वैशाली नागवडे म्हणाल्या.

दौंड विधानसभेला महायुतीचा धर्म पाळावा - राहुल कुल

दौंड विधानसभेसाठी राहुल कुल यांनी भाजपकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कुल यांनी गावोगावी भेट देत प्रचार दौरा सुरू केला आहे. दौंडची जागा भाजपकडे गेली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने ऐनवेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विश्वासू सहकारी वीरधवल जगदाळे यांना पक्षाने एबी फॉर्म देत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले. त्यामुळे दौंडमध्ये महायुतीत बिघाडी झाली आहे. लोकसभेला आम्ही महायुतीचा धर्म पाळलेला आहे. विधानसभेला देखील त्यांनी महायुतीचा धर्म पाळावा अशी अपेक्षा आहे. आमच्या वरिष्ठांशी याबाबत चर्चा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीचा धर्म पाळावा हे अपेक्षित आहे. वरिष्ठ स्तरावर हा निर्णय होईल असे अपेक्षित आहे अशी अपेक्षा राहुल कुल यांनी व्यक्त केली आहे.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी जातानाआमदार संजना जाधव यांना गेटवरच अडवलं, सुरक्षा रक्षकांवर संताप, व्हिडिओ व्हायरल
एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी जातानाआमदार संजना जाधव यांना गेटवरच अडवलं, सुरक्षा रक्षकांवर संताप, व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
Dharashiv : भाजपने पैशांच्या बळावर उमेदवार फोडले आता मतदार फोडतेय, काँग्रेसच्या उमेदवाराचा आरोप
Dharashiv : भाजपने पैशांच्या बळावर उमेदवार फोडले आता मतदार फोडतेय, काँग्रेसच्या उमेदवाराचा आरोप
Nashik Vidhan Parishad Election 2026: ठाकरे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने महायुतीची धाकधूक वाढली, नाशिक विधान परिषदेत मोठा गेम होणार?
ठाकरे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने महायुतीची धाकधूक वाढली, नाशिक विधान परिषदेत मोठा गेम होणार?

व्हिडीओ

Arvind Sawant on Operation Tiger : ऑपरेशन टायगर फेल, सगळे खासदार ठाकरेंसोबत, सावंतांचा दावा
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद
Ambadas Danve On Operation Tiger : दम असेल तर निवडून आणा, दुसऱ्यांची पोरं का लागतात
Nitin Deshmukh On Operation Tiger : फुटणाऱ्यांना लाज वाटू दे, मशालीवर निवडून आलात
Operation Tiger : ऑपरेशन टायगर - दिल्लीत हालचालींना वेग, एकनाथ शिंदे आणि UBT खासदार दिल्लीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
HCC Share Price : 30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली
Shivsena : ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
Prince Yadav: प्रिन्स यादव पदार्पणाच्या सामन्यातच दुर्दैवी ठरला, नको तेच घडलं; अशी चूक आयुष्यभर कधीच विसरणार नाही!
प्रिन्स यादव पदार्पणाच्या सामन्यातच दुर्दैवी ठरला, नको तेच घडलं; अशी चूक आयुष्यभर कधीच विसरणार नाही!
Weather Update: जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
प्रतिभा धानोरकरांचा विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय उलथापालथ
प्रतिभा धानोरकरांचा विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय उलथापालथ
Embed widget