एक्स्प्लोर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: आरएसएसचा 288 जागांचा सर्व्हे, महाराष्ट्रात कोणाचं सरकार येणार, विधानसभा निवडणुकीत काय होणार?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात आरएसएसने महाराष्ट्रातील सर्व 288 जागांवर सर्वेक्षण केल्याची माहिती समोर आली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महायुतीतील घटक पक्षांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर महाविकास आघाडीमधील ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. याचदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) अंतर्गत सर्व्हे समोर आला असून आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला 160 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

भाजप-शिवसेना (शिंदे गट)-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना आगामी विधानसभेच्या निवडणुकीत मोठा विजय मिळेल, असा अंदाज आरएसएसच्या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. आरएसएसकडून महाराष्ट्रातील 288 जागांचं सर्वेक्षण करण्यात आलं. याबाबत आरएसएसच्या एका संबंधित व्यक्तीने सांगितले की, राज्यातील सध्याचं राजकीय वातावरण समजून घेण्यासाठी संघ निवडणुकीपूर्वी गोपनीय पद्धतीने अंतर्गत सर्वेक्षण करतो. त्या सर्वेक्षण अहवालाच्या आधारे भाजपची निवडणूक रणनीती बनवली जाते आणि लोकसंख्या लक्षात घेऊन उमेदवारांची निवड केली जाते. दरम्यान, ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात आरएसएसने महाराष्ट्रातील सर्व 288 जागांवर सर्वेक्षण केल्याची माहिती समोर आली आहे.

सर्वेक्षणात कोणाला किती जागा?

आरएसएसच्या सर्वेक्षणानुसार महायुती 160 जागा जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. यामध्ये भाजपला 90 ते 95 जागा, शिंदे यांच्या शिवसेनेला 40 ते 50 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 25 ते 30 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरएसएसचा या सर्वेक्षणाचा हा अंदाज खरा ठरतो की निवडणुकीच्या मैदानात नवे वळण येते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

20 नोव्हेंबर रोजी मतदान; यंदा महाराष्ट्रात कोण मारणार बाजी?

महाराष्ट्र विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक राजकीय भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सर्वात आधी शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी, त्यानंतर सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळणं, शिंदेंनी भाजपच्या साथीनं महायुती सरकार स्थापन करुन स्वतः मुख्यमंत्रीपदी विराजमान होणं, त्यानंतर अजित पवारांच्या बंडानंतरची राष्ट्रवादीतील फूट, तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी थेट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ठोकलेला दावा. यासर्व घडामोडी राज्याच्या राजकारणाला हादरे देणाऱ्या ठरल्या. त्यामुळे ज्या मतदार राजानं हे राजकीय हादरे झेलले, तो मतदार राजा यंदा राज्याचं सिंहासन कुणाच्या हवाली करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

संबंधित बातमी:

Amit Thackeray: अमित ठाकरेंनी माहीम विधानसभा मतदारसंघच का निवडला?; समजून घ्या, यामागचं 'राज'कीय गणित!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडलेEknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजीUddhav Thackeray on BJP | नामर्दाची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदूत्व शिकायचं का? उद्धव ठाकरेUddhav Thackeray on BJP | जयश्री रामनंतर जय शिवराय बोलावच लागेल- उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
Embed widget