एक्स्प्लोर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदेंच्या नेत्यांचा आंतरवाली सराटीत भेटीगाठींचा खेळ चाले, अन् केसरकर राज ठाकरेंच्या भेटीला; उदय सामंतांनी 'राज'कारण सांगितले!

आज छत्रपती संभाजीनगरमधील संदिपान भुमरे जरांगे यांच्या भेटीसाठी पोहोचले. त्यानंतर उदय सामंत सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचल्याने राजकीय भूवया उंचावल्या गेल्या आहेत.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : गेल्या अनेक दिवसांपासून अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या भेटीसाठी राजकीय नेत्यांच्या भेटींचा सिलसिला सुरूच आहे. मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत हा भेटीचा सिलसिला होत असल्याने नेमकं काय शिजतंय? असाच प्रश्न राजकीय वर्तुळातून चर्चिला जात आहे. दरम्यान मनोज जरांगे यांच्या भेटीगाठी घेण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेत्यांचा समावेश सर्वाधिक आहे.

दीपक केसरकर सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले

आज छत्रपती संभाजीनगरमधील संदिपान भुमरे जरांगे यांच्या भेटीसाठी पोहोचले. त्यानंतर उदय सामंत सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचल्याने राजकीय भूवया उंचावल्या गेल्या आहेत. इकडं या भेटी अंतरवाली सराटीमध्ये होत असताना मंत्री दीपक केसरकर सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले. अवघ्या दोन मिनिटांची ही भेट असली, तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन पोहोचवल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे.

माहीममधून अमित ठाकरे यांच्या विरोधात शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे ठाण्यामध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात देण्यात आलेल्या उमेदवार मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे मनसे आणि शिंदे गटातील राजकीय घडामोडींचे चांगलीच चर्चा रंगली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी भूमिका स्पष्ट केली. 

मनोज जरांगेंच्या भेटीवर उदय सामंत काय म्हणाले? 

ते म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांची झालेली भेट ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होती असं म्हणता येणार नाही. सहकाऱ्यांचे एबी फॉर्म घेऊन मी संभाजीनगरमध्ये आलो होतो. मात्र जरांगे यांच्या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नाही. कोणत्या मागण्या पूर्ण होऊ शकतात, यावर चर्चा झाल्याचा दावा सामंत यांनी केला. केसरकर यांच्या भेटीबाबत विचारण्यात आले असता ते म्हणाले की दीपक केसरकर यांनी राज ठाकरे यांची भेट का घेतली याबाबत मला माहिती नाही.

ते म्हणाले की, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेत्यांनी मुंबई येथील नगरसेवक फोडले होते. नगरसेवकांना खोके देऊन फोडण्याचा फोन होता. अमित ठाकरे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे काय हे समोर आणल्याचा टोला उदय सामंत यांनी लगावला. दरम्यान, उमेदवार यादीवर बोलताना ते म्हणाले की राजकारणामध्ये तिकीटावेळी वेटिंग असणे स्वाभाविक आहे. काही घटना घडत असतात, बसून चर्चा करायची असते. मात्र, कोणावरही अन्याय होणार नाही असेही ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेची 3 री यादी, मुंबईतील 3 उमेदवारांची घोषणा; राम कदमांविरुद्ध भिडू ठरला
उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेची 3 री यादी, मुंबईतील 3 उमेदवारांची घोषणा; राम कदमांविरुद्ध भिडू ठरला
भुजबळ, कोकाटे, झिरवाळांविरोधात शरद पवारांनी डाव टाकला, राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीत तगड्या नेत्यांना तिकीट
भुजबळ, कोकाटे, झिरवाळांविरोधात शरद पवारांनी डाव टाकला, राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीत तगड्या नेत्यांना तिकीट
Sharad Pawar NCP Candidate 2nd List 2024: खडकवासल्यातून सचिन दोडकेच, पर्वती, पिंपरी अन् जुन्नरमधून कोणाला संधी? बेनकेंना मोठा धक्का
खडकवासल्यातून सचिन दोडकेच, पर्वती, पिंपरी अन् जुन्नरमधून कोणाला संधी? बेनकेंना मोठा धक्का
Kolhapur District Assembly Constituency : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, इचलकरंजीमधून मदन कारंडे, चंदगडमधून नंदाताई बाभुळकर
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, इचलकरंजीमधून मदन कारंडे, चंदगडमधून नंदाताई बाभुळकर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel : हॉटेलमध्ये भेट, फोनवर चर्चा तरी MIM ला मविआत नो एन्ट्री?ABP Majha Headlines :  4 PM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सChandraShekhar Bawankule PC | वसंत देशमुखांवर कडक कारवाई करणार, बावनकुळे अॅक्शन मोडवरBalasaheb Thorat PC | एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे महिलांबाबत बोलायचं, थोरात संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेची 3 री यादी, मुंबईतील 3 उमेदवारांची घोषणा; राम कदमांविरुद्ध भिडू ठरला
उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेची 3 री यादी, मुंबईतील 3 उमेदवारांची घोषणा; राम कदमांविरुद्ध भिडू ठरला
भुजबळ, कोकाटे, झिरवाळांविरोधात शरद पवारांनी डाव टाकला, राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीत तगड्या नेत्यांना तिकीट
भुजबळ, कोकाटे, झिरवाळांविरोधात शरद पवारांनी डाव टाकला, राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीत तगड्या नेत्यांना तिकीट
Sharad Pawar NCP Candidate 2nd List 2024: खडकवासल्यातून सचिन दोडकेच, पर्वती, पिंपरी अन् जुन्नरमधून कोणाला संधी? बेनकेंना मोठा धक्का
खडकवासल्यातून सचिन दोडकेच, पर्वती, पिंपरी अन् जुन्नरमधून कोणाला संधी? बेनकेंना मोठा धक्का
Kolhapur District Assembly Constituency : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, इचलकरंजीमधून मदन कारंडे, चंदगडमधून नंदाताई बाभुळकर
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, इचलकरंजीमधून मदन कारंडे, चंदगडमधून नंदाताई बाभुळकर
तानाजी सावंतांविरुद्ध शरद पवारांनी भाकरी फिरवली, ठाकरेंनी जाहीर केलेली उमेदवारी मागे, आता नवा चेहरा
तानाजी सावंतांविरुद्ध शरद पवारांनी भाकरी फिरवली, ठाकरेंनी जाहीर केलेली उमेदवारी मागे, आता नवा चेहरा
मविआत 'या' जागांवरुन चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच; ठाकरेंच्या भेटीनंतर थोरात म्हणाले आता शरद पवार
मविआत 'या' जागांवरुन चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच; ठाकरेंच्या भेटीनंतर थोरात म्हणाले आता शरद पवार
Lawrence Bishnoi : गँगस्टर लाॅरेन्स बिश्नोई केसमध्ये 'सर्जिकल स्ट्राईक'; 2 DSP, तीन SI आणि एक ASI सह 7 जण निलंबित!
गँगस्टर लाॅरेन्स बिश्नोई केसमध्ये 'सर्जिकल स्ट्राईक'; 2 DSP, तीन SI आणि एक ASI सह 7 जण निलंबित!
'भुजबळांनी मोठा भ्रष्टाचार केला अन् मग ते जेलमध्ये गेले'; माजी आमदाराचा गंभीर आरोप, समीर भुजबळांवरही जोरदार हल्लाबोल
'भुजबळांनी मोठा भ्रष्टाचार केला अन् मग ते जेलमध्ये गेले'; माजी आमदाराचा गंभीर आरोप, समीर भुजबळांवरही जोरदार हल्लाबोल
Embed widget