Maharashtara Vidhan Sabha Election 2024 : अर्ज भरण्यासाठी फक्त दोन दिवस राहिले, तरी 92 जागांवर महाविकासची गाडी अडली!
Maharashtara Vidhan Sabha Election 2024 : उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अजून फक्त दोन दिवसांचा अवधी असताना अजूनही 92 जागांवर उमेदवार निश्चित करण्यात आलेली नाहीत.
Maharashtara Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज दुसरी यादी जाहीर केली. या यादीत 23 नावे आहेत. काँग्रेसने पहिल्या यादीत 48 नावे जाहीर केली होती. पक्षाने आतापर्यंत 71 उमेदवारांची घोषणा केली आहे. महाविकास आघाडीकडून आतापर्यंत 196 उमेदवारांची यादी जाहीर केली आहेत. 23 ऑक्टोबरलाच तिन्ही पक्षांनी 85-85-85 जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अजून फक्त दोन दिवसांचा अवधी असताना अजूनही 92 जागांवर उमेदवार निश्चित करण्यात आलेली नाहीत.
काँग्रेसच्या पहिल्या यादीत 48 नावे होती
काँग्रेसने 24 ऑक्टोबर रोजी 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. यात पक्षाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात दक्षिण पश्चिम नागपूरमधून प्रफुल्ल गुडधे यांना उमेदवारी दिली. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांना साकोलीतून तिकीट देण्यात आले आहे. कराड दक्षिण मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली. अमरावतीतून सुनील देशमुख यांना रिंगणात उतरवले. काँग्रेसच्या पहिल्या यादीत 5 महिला उमेदवारांना तिकीट देण्यात आले होते. तसेच 5 ST आणि 3 SC उमेदवारांची घोषणा केली.
NCP (SP) पहिली यादी, 45 नावे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) ने गुरुवारी संध्याकाळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर केली. त्यात 45 नावे होती. बारामतीतून युगेंद्र पवार यांना पक्षाने तिकीट दिले आहे. ते अजित पवार यांचे पुतणे आहेत. अनिल देशमुख यांना काटोलमधून, जितेंद्र आव्हाड यांना मुंब्रा कळवा आणि जयंत पाटील यांना इस्लामपूरमधून तिकीट मिळाले आहे.
शिवसेनेच्या (UBT) पहिल्या यादीत 65 नावे होती
MVA मध्ये, शिवसेना (UBT) ने 23 ऑक्टोबरच्या संध्याकाळी यादी जाहीर केली. त्यात 65 नावे होती. उद्धव यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना वरळीतून उमेदवारी देण्यात आली. केदार दिघे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर कोपरी पाचपाखाडीतून तिकीट देण्यात आले.
अबू आझमी म्हणाले- पाच जागा न दिल्यास 25 जागांवर निवडणूक लढवू
समाजवादी पक्षाचे (एसपी) महाराष्ट्र प्रमुख अबू आझमी यांनी एमव्हीएकडे पाच जागांची मागणी केली आहे. आझमी म्हणाले की, जागावाटप निवडणुकीपूर्वी व्हायला हवे होते, कारण एमव्हीए आधीच तयार झाले आहे. अंतर्गत मतभेद असणे योग्य नाही. सपाही युतीत आहे, मात्र जागांवर चर्चा झालेली नाही. मी पाच जागा जाहीर केल्या आहेत. MVA ने मला जागा द्यावी. शरद पवार यांनी शनिवारी दुपारपर्यंत थांबण्यास सांगितले आहे. मी वाट पाहीन, पण त्यांनी आमचा समावेश केला नाही तर आम्ही 25 जागांवर निवडणूक लढवू. यापूर्वी सपाने 12 जागा मागितल्या होत्या. याशिवाय पाच जागांसाठीचे उमेदवारही जाहीर करण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या