Suresh Dhas: 'ज्या दिवशी फोन बंद करून झोपायची वेळ येईल, त्या दिवशी राजकारण सोडेन', मुंडे,देशमुखांचे उदाहरण देत सुरेश धस यांचं मोठं वक्तव्य
Suresh Dhas: आष्टीत जोरदार शक्ती प्रदर्शन करत सुरेश धस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. जाहीर सभेत 'ज्या दिवशी मला फोन बंद करून झोपायची वेळ येईल त्या दिवशी मी राजकारण सोडेन' असे धस यावेळी म्हणाले आहेत.
Suresh Dhas: आष्टी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपने आपल्या तिसऱ्या यादीत उमेदवाराची घोषणा केली आहे. आष्टीतून भाजपने विधानपरिषदचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आहे. आष्टीत जोरदार शक्ती प्रदर्शन करत सुरेश धस (Suresh Dhas) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत विरोधकांना टोले लगावले. तर 'ज्या दिवशी मला फोन बंद करून झोपायची वेळ येईल त्या दिवशी मी राजकारण सोडेन' असे धस यावेळी म्हणाले आहेत.
'गोपीनाथराव पहाटे कोणाचाही फोन घेत होते,विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना रिक्षावाल्यांचा फोन घ्यायचे.मी पाटील, मुंडे,देशमुख या तिन्ही लीडर सोबत काम केल आहे. कुणाचा फोन उचलणार नाही, माझा फोन बंद ठेवेल असं पाप माझ्या हातून होणार नाही रात्री दीड वाजता फोन करा अडीचला फोन करा असे खुले आव्हानच सुरेश धस (Suresh Dhas) यांनी यावेळी दिले. जो रात्रंदिवस अभ्यास करतो त्याला परीक्षेची भीती नसते या परीक्षेत मी पासच होणार', असा विश्वास धस यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
नेमकं काय म्हणालेत धस?
आष्टीत जोरदार शक्ती प्रदर्शन करत सुरेश धस (Suresh Dhas) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत बोलताना सुरेश धस म्हणाले, गोपीनाथराव पहाटे देखील फोन घ्यायचे.गोपीनाथ मुंडे बोलतोय सांग काय काम आहे, असं म्हणायचे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना रिक्षावाल्याचा देखील फोन घ्यायचे. या नेत्यांसोबत काम केल्यामुळे मी माझ्या राजकीय जीवनात ठरवलं आहे. ज्या दिवशी माझा मोबाईल हॉलमध्ये ठेवून झोपायची वेळ माझ्यावर येईल किंवा फोन बंद करून झोपायची पाळी माझ्यावर येईल, त्या दिवशी मी राजकारण सोडेन. पण, कोणाचा फोन उचलणार नाही असं पाप माझ्यकडून होणार नाही. कधीपण ट्राय करा. रात्री १ वाजता फोन करा नाहीतर ३ वाजता फोन करा. उशाला फोन असतो, रात्री अडीच वाजता फोन आला. अपघात झाला, तर लगेच ड्रायव्हरला बोलवतो, कपडे घालतो. लगेच गाडीत बसून जातो, उगाच लोक घोषणा देत नाहीत, असं वक्तव्य धस यांनी सभेत केलं आहे.
आष्टीतून महायुतीकडून भाजपने विधानपरिषदचे आमदार सुरेश धस यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर महाविकास आघाडीकडूनराष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांना संधी दिली आहे. त्यामुळे आता आष्टीमध्ये होणारी लढत महत्त्वपुर्ण बनली आहे.