एक्स्प्लोर

Sudhir Salvi : 'मी एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून काम करणार', 'मातोश्री'च्या निर्णयानंतर सुधीर साळवींची एबीपी माझाला प्रतिक्रिया

Sudhir Salvi : अजय चौधरींना उमेदवारी दिल्यानंतर सुधीर साळवींनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली

Sudhir Salvi on Ajay Chaudhari : अजय चौधरींच्या (Ajay Chaudhari) उमेदवारीनंतर सुधीर साळवींनी (Sudhir Salvi) एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना म्हटलं की, 'मी संघटनेशी एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून  काम करणार.' त्यामुळे जरी पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याने अजय चौधरींना संधी देण्यात आली असली तरी सुधीर साळवी हे देखील पक्षासाठीच काम करणार असल्याचं चित्र आता आहे. त्यामुळे लालबाग-परळमध्ये ठाकरेंचीच मशाल धगधगती राहणार का याची उत्सुकता आहे. 

शिवडी विधानसभेचा पेच अखेर सुटला असून विद्यमान आमदार अजय चौधरी यांनाच पक्ष पुन्हा एकदा संधी देणार आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवडी मतदारसंघासाठी मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय दिला. यावेळी अजय चौधरी आणि सुधीर साळवी हे दोघेही उपस्थित होते. पण अजय चौधरी यांच्या उमेदवारीचा निर्णय घेतल्यानंतर सुधीर साळवी उद्धव ठाकरेंना नमस्कार करुन बाहेर पडले. त्यावेळी त्यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. 

उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं? 

संकटकाळात सर्वजण सोडून जात असताना अजय चौधरी माझ्यासोबत राहिले. त्यामुळं त्यांना पुन्हा संधी देत आहोत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर शिक्कामोर्तब केलं. उद्धव ठाकरेंचे हे शब्द ऐकून सुधीर साळवी यांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला आणि ते मातोश्रीबाहेर पडले.  दरम्यान सुधीर साळवी यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं की, मी संघटनेशी एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून  काम करणार आहे. 

अजय चौधरींच्या एकनिष्ठेचं फळ

शिवसेनेत फूट पडली त्यावेळी आमदार म्हणून अजय चौधरी हे ठाकरेंसोबतच राहिले.त्यामुळे त्यांच्या एकनिष्ठेवरुन उद्धव ठाकरे यांनी अजय चौधरी यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. पण लालबाग-परळसारख्या भागात सुधीर साळवी यांच्या उमेदवारीची उत्सुकता होती. मात्र आता अजय चौधरींच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. असं असलं तरीही मी पक्षासोबत एकनिष्ठ राहणार असल्याची ठाम भूमिका सुधीर साळवी यांनी घेतली आहे. 

शाखाप्रमुख ते पदाधिकाऱ्यांचा सुधीर साळवींना होता पाठिंबा

शिवडी विधानसभेतील पाच पैकी पाच शाखाप्रमुखांनी सुधीर साळवींच्या बाजुनं भूमिका घेतली. युवासेना आणि महिला पदाधिकाऱ्यांनी देखील सुधीर साळवींच्या बाजुनं कौल दिला. परंतु अजय चौधरी जुने नेते आणि बंडखोरीत उद्धव ठाकरेंसोबत थांबल्यानं त्याचंही मातोश्रीवर महत्वाचं स्थान आहे. त्यामुळे मातोश्रीनेही आता अजय चौधरींच्याच नावावर शिक्कामोर्तब केलंय दरम्यान शिवडी विधानसभेत मनसेकडून बाळा नांदगांवकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

ही बातमी वाचा : 

मोठी बातमी : अजय चौधरी संकटकाळात सोबत राहिले, उद्धव ठाकरेंचे शब्द ऐकताच नमस्कार करुन सुधीर साळवी बाहेर पडले!

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget