एक्स्प्लोर

मोठी बातमी : अजय चौधरी संकटकाळात सोबत राहिले, उद्धव ठाकरेंचे शब्द ऐकताच नमस्कार करुन सुधीर साळवी बाहेर पडले!

Maharashtra Vidhan Sabha Election 2024  : शिवडी विधासभा मतदारसंघातून अजय चौधरी यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024  : 'संकटकाळात सर्वजण सोडून जात असताना अजय चौधरी (Ajay Chaudhari) माझ्यासोबत राहिले. त्यामुळं त्यांना पुन्हा संधी देत आहोत', असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर शिक्कामोर्तब केलं. उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) हे शब्द ऐकून सुधीर साळवी (Sudhir Salvi) यांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला आणि ते मातोश्रीबाहेर पडले.  दरम्यान सुधीर साळवी यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं की, मी संघटनेशी एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून  काम करणार आहे. 

मुंबईतील बहुचर्चित मतदारसंघ शिवडीतून ठाकरेंनी पुन्हा एकदा अजय चौधरींचा मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे सुधीर साळवी यांना आता विधानसभेचं मैदान गाठता येणार नाही. शिवडी मतदारसंघात अजय चौधरी आणि सुधीर साळवी यांच्या नावाचा बराच संभ्रम होता. पण अखेर मातोश्रीवर निर्णय घेत शिवडी मतदारसंघातून अजय चौधरींनाच उमेदवारी देण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. 

म्हणून अजय चौधरींच्या नावावर शिक्कामोर्तब

शिवसेनेत फूट पडली त्यावेळी आमदार म्हणून अजय चौधरी हे ठाकरेंसोबतच राहिले.त्यामुळे त्यांच्या एकनिष्ठेवरुन उद्धव ठाकरे यांनी अजय चौधरी यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. पण लालबाग-परळसारख्या भागात सुधीर साळवी यांच्या उमेदवारीची उत्सुकता होती. मात्र आता अजय चौधरींच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. असं असलं तरीही मी पक्षासोबत एकनिष्ठ राहणार असल्याची ठाम भूमिका सुधीर साळवी यांनी घेतली आहे. 

सुधीर साळवी यांनी काय म्हटलं? 

दरम्यान मातोश्रीने हा निर्णय दिल्यानंतर सुधीर साळवी उद्धव ठाकरे यांना नमस्कार केला आणि ते बाहेर पडले. त्यानंतर एबीपी माझाला सुधीर साळवींनी प्रतिक्रिया दिली. त्यावेळी ते म्हणाले की, मी संघटनेशी एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून  काम करणार अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे अजय चौधरींना जरी उमेदवारी दिली असली तरीही सुधीर साळवी हे पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षासाठीच काम करणार असल्याचं स्पष्ट झालंय. 

शाखाप्रमुख ते पदाधिकाऱ्यांचा सुधीर साळवींना होता पाठिंबा

शिवडी विधानसभेतील पाच पैकी पाच शाखाप्रमुखांनी सुधीर साळवींच्या बाजुनं भूमिका घेतली. युवासेना आणि महिला पदाधिकाऱ्यांनी देखील सुधीर साळवींच्या बाजुनं कौल दिला. परंतु अजय चौधरी जुने नेते आणि बंडखोरीत उद्धव ठाकरेंसोबत थांबल्यानं त्याचंही मातोश्रीवर महत्वाचं स्थान आहे. त्यामुळे मातोश्रीनेही आता अजय चौधरींच्याच नावावर शिक्कामोर्तब केलंय दरम्यान शिवडी विधानसभेत मनसेकडून बाळा नांदगांवकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

ही बातमी वाचा :

Shivadi Assembly constituency : मोठी बातमी : सुधीर साळवी यांना उमेदवारी नाहीच, शिवडीतून पुन्हा अजय चौधरीच मैदानात!

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
Embed widget