एक्स्प्लोर

"...तर महाविकास आघाडीची अडचण होईल" ? मीरज जागेवरून राऊतांचं रोखठोक विधान; काँग्रेसच्या भूमिकेवर थेट सांगून टाकलं!

मीरज या जागेवरून महाविकास आघाडीत सध्या धुसफूस चालू आहे. या जागेसाठी ठाकरेंची शिवसेना तसेच काँग्रेस हे दोन्ही पक्ष आग्रही आहेत. यावरच आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) सांगली जिल्ह्यातील मीरज या जागेसाठी वाद चालू आहे. मीरज ही जागा आम्हालाच मिळावी, असा ठाकरेंच्या शिवसेनेचा हट्ट आहे. तर काँग्रेस पक्ष ही जागा सोडण्यास तयार नाही. लोकसभा निवडणुकीतही सांगली हा मतदारसंघा असाच चर्चेत आला होता. या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेने चंद्रहार पाटलांना तिकीट दिले होते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसारखीच स्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन संजय राऊत यांनी महाविकास आघाडीला सूचक इशारा दिला आहे. मीरज जागेसारखीच लागण प्रत्येक मतदारसंघाला लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला अडचणी होतील, असा सूचक इशारा राऊत यांनी दिला आहे. ते आज (28 ऑक्टोबर) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.    

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

काँग्रेस आणि आमच्यात चर्चा झाली आहे. दिग्रस येथून आमचा उमेदवार निवडणूक लढवणार नाही. आम्ही ती जागा माणिकराव ठाकरे यांच्यासाठी सोडलेली आहे. काल यावर चर्चा झाली. या चर्चेनुसार दिग्रसच्या बदल्यात काँग्रेसने आम्हाला दर्यापूर हा मतदारसंघ आम्हाला दिला आहे. भूम-परांडा मतदारसंघाबाबतही आमच्यात आणि शरद पवार यांच्यात वाद नाही. ही जागा एकमेकांना बदलावी, यावर आमची चर्चा  झाली आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली.

...तर महाविकास आघाडीला अडचणी होतील

तसेच दक्षिण सोलापूरमध्ये काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. मीरजमध्येही काँग्रेसचे काही लोक आमचा उमेदवार द्यावा, असं सांगत आहेत. याबाबत माझ्या कानावर आलं आहे. असं झालं तर संपूर्ण महाराष्ट्रात ही लागण लागेल आणि महाविकास आघाडीला अडचणी होतील. म्हणूनच तिघांनीही एकमेकांशी चर्चा करायची आणि निर्णय घ्यायचा, असं आम्ही ठरवलं आहे, असं संजय राऊत म्हणाले.  

मीरजचा नेमका तिढा काय? 

मीरज जागेबाबत महाविकास आघाडीत सध्या धुसफूस चालू आहे. या जागेसाठी ठाकरेंची शिवसेना आग्रही आहे. काँग्रेसलाही ही जागा हवी आहे. खानापूर ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला गेल्यास आम्हाला मीरज जागा हवी आहे, अशी ठाकरे गटाची भूमिका आहे. त्यामुळेच काँग्रेसची कोंडी झाली आहे. त्यामुळे महाविकास आघआडीत ही जागा नेमकी कोणाला मिळणार? याकडे सर्वांच लक्ष लागलंय.

हेही वाचा :

शरद पवार गटाची उमेदवारी मलाच मिळेल, रणजित शिंदेंचा दावा, माढा विधानसभेसाठी भरले दोन अर्ज 

माढा, माळशिरसचा तिढा कायम! माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांनी घेतली फडणवीसांची भेट

Amit Thackeray vs Sada Sarvankar: अमित ठाकरेंसाठी माघार घेण्याची विनंती, पण सदा सरवणकरांच्या 'त्या' एका प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निरुत्तर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतंAjit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजीABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Embed widget