एक्स्प्लोर

Maval Assembly constituency: मावळ पॅटर्न फसला; सुनील शेळकेंनी टाकली गुगली, बापु भेगडेंना टाकलं इतक्या मतांनी पिछाडीवर

Maval Assembly constituency: अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह मनसे आणि बाकी पक्षांनी देखील पाठिंबा दिला होता. मात्र, मावळ पॅटर्न फसल्याचं चित्र आता दिसून येत आहे.

पुणे: पुण्यातील मावळ विधानसभा मतदारसंघाची राज्यभरात चर्चा झाली ती मावळ पॅटर्नमुळे. मावळ मतदारसंघामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षाचे नेते उभे ठाकले होते. अपक्ष उमेदवारी दाखल करत मावळमध्ये बापूसाहेब भेगडे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या मतदारसंघातील निवडणुकीमध्ये भाजपसह स्थानिक सर्व पक्षांनी एकत्र येत अजित पवारांच्या पक्षाचे  उमेदवार सुनील शेळकें (Sunil Shelke)  विरोधात आघाडी उघडली होती. अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे (Bapu Bhegade) यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह मनसे आणि बाकी पक्षांनी देखील पाठिंबा दिला होता. मात्र, मावळ पॅटर्न फसल्याचं चित्र आता दिसून येत आहे. (Maval Assembly constituency) 

सुनील शेळके (Sunil Shelke) विरूध्द इतर पक्षांनी अपक्ष उमेदवारांला दिलेला पाठिंबा यामुळे मतदारसंघात काँटे की टक्कर पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, आता सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी 2019 च्या मताधिक्क्यातील मोठं लीड 11 व्या फेरीतच मिळवलं आहे. शेळके (Sunil Shelke) यांची मोठ्या मताधिक्क्याकडे वाटचाल सुरू आहे. ते विजयाकडे घौडदौड करत आहेत.

मावळ मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीपासूनच अजित पवारांचे (Ajit Pawar) उमेदवार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी आघाडी घेतल्याचं दिसून आलंं. सुरूवातीपासून घेतलेली आघाडी अकराव्या फेरीपर्यंत कायम राहिली. अकराव्या फेरीअखेर एकूण 1 लाख 04 हजार 263 मतांची मोजणी पूर्ण झाली असून सुनील शेळके यांना 75 हजार 449 तर अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे (Bapu Bhegade) यांना 26 हजार 758 मतं मिळाली आहेत. सुनील शेळके (Sunil Shelke) विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी 2019 मध्ये इतिहास घडवला होता. तब्बल 25 वर्ष भाजपची सत्ता असलेला मावळ आपल्याकडे खेचून आणण्यात यश मिळालं होतं. या विधानसभेत देखील ते विजयाचा गुलाल उधळणार अशा चर्चा सुरू आहेत. यामुळे ते मोठ्या मताधिक्क्याच्या विजयाकडे त्यांची घौडदौड सुरू असल्याचे दिसून येत आहे.बहुतांश राजकीय पक्षांनी अपक्ष बापू भेगडे (Bapu Bhegade) यांना पाठिंबा दिल्याने मतदारसंघांमध्ये मावळ पॅटर्नची चर्चा चांगलीच चर्चा झाली होती.

2019 विधानसभा निवडणुकीत काय झालं?

सुनील शेळके (Sunil Shelke) यांना 2019च्या निवडणुकीमध्ये 167712 इतकी मतं मिळाली होती तर भाजपचे उमेदवार बाळा भेगडे (Bapu Bhegade)यांना 73770 इतकी मतं मिळाली होती.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget