एक्स्प्लोर

मोठी बातमी : मनसेचं ठरलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात उमेदवार देणार नाही, कारण...

Raj Thackeray: मनसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मनसे उमेदवार देणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर त्याच कारण देखील स्पष्ट झालं आहे.

Raj Thackeray: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष उमेदवार याद्या जाहीर करत आहेत, अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. मनसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मनसे उमेदवार देणार नसल्याची माहिती समोर आली आहे. कोपरी पाचपाखाडी मतदार संघात अभिजित पानसे यांची उमेदवारी निश्चित झाली होती, मात्र आता उमेदवारी न देण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे. कोकण पदवीधर मतदार संघातून देखील अभिजित पानसे यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगण्यात आले होते.

आता ठाण्यात, ठाणे शहर मतदारसंघातून अविनाश जाधव, ओवळा माजिवडा इथून संदीप पाचांगे आणि कळवा मुंब्रा इथून सुशांत सूर्यराव हे उमेदवार विधानसभा निवडणूक लढणार आहेत. मुख्यमंत्री यांच्यासोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे उमेदवार देणार नसल्याची माहिती समोर आली आहे. जरी अमित ठाकरे यांच्या विरोधात शिवसेनेने सदा सरवणकर यांनी उमेदवारी जाहीर केली असली तरी राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उमेदवार देणार नसल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी, "राज ठाकरे दोस्तीचा दुनियेतला राजा माणूस आहे" अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंना विरूध्द केदार दिघे

कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे कोपरी पाचपाखाडीतून शिवसेना (ठाकरे गट) विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) असा सामना रंगणार आहे. केदार दिघे यांच्यामुळे एकनाथ शिंदेंना मोठं आव्हान निर्माण झालं आहे. कोपरी पाचपाखाडी मतदारसंघ 2009च्या आधी ठाणे शहर मतदारसंघात समाविष्ट होता. नंतर मतदारसंघाच्या पुनर्रचनेत कोपरी पाचपाखाडी हा स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला. तेव्हापासून एकनाथ शिंदे या मतदारसंघाचे नेतृत्त्व करत आहेत. या मतदारसंघामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा मोठा समर्थक वर्ग आहे. 

अमित ठाकरेंच्या विरोधात सदा सरवणकर 

माहीम मतदारसंघाची लढत चुरशीची होणार आहे. माहीममध्ये राजपुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उत्तर आहेत. अशातच सर्वात आधी चर्चा होती की, उद्धव ठाकरे पुतण्याविरोधात उमेदवार देणार नाही. पण, ठाकरेंनी उमेदवार रिंगणात उतरवला. आता तिरंगी लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच आज राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतिर्थावर जाऊन शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी भेट घेतली. तसेच, मुख्यमंत्री शिंदेंचा निरोप घेऊन केसरकर राज ठाकरेंकडे गेल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता सदा सरवणकरांच्या उमेदवारीबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे आता सदा सरवणकरांच्या उमेदवारीबाबत खलबतं सुरू असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरू आहे? अशा चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, अटी काय?Maratha Samaj on Walmik Karad | वाल्मीक कराडची नार्को टेस्ट करा, नांदेड मधील मराठा समाजाची मागणीSantosh Deshmukh Muder Case | संतोष देशमुखांची हत्या नेमकी कशी केली? आरोपींनी सांगितली माहितीManoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget