मोठी बातमी : ज्याच्या फोनवर शहाजीबापू म्हणाले, काय झाडी काय डोंगर, त्यालाच खेडमध्ये 5 कोटींसह पकडला, बापू अडचणीत?
ShahajiBapu Patil खेड शिवापूरमध्ये पाच कोटी रोकड घेऊन जाणारी कार पकडण्यात आली आहे. या कारवाईमुळे आता शहाजीबापू पाटील अडचणी आले आहेत.
पुणे : राज्यात आचारसंहिता लागू झालेली असताना खेड-शिवापूर येथे एका गाडीत तब्बल 5 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ही रोकड पकडली गेल्यामुळे विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेचे आसूड ओढले जात आहेत. आमचे कार्यकर्ते गेले म्हणून फक्त 5 कोटी तरी पकडले गेले. त्यावेळी घटनास्थळी आणखी 10 कोटी रुपये होते, असा दावा उद्धव ठाकरेंच्या शिवेसनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. विरोधक पकडण्यात आलेल्या गाडीचा संबंध शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांच्याशी जोडत आहेत. असे असतानाच आता या प्रकरणात आता खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे.
पाहा व्हिडीओ :
शहाजीबापूंना फोन करणारा हाच 'तो'
मिळालेल्या माहितीनुसार खेड शिवापूर टोलनाक्यावर जप्त करण्यात आलेल्या गाडीमध्ये एकूण चार व्यक्ती होत्या. या चार व्यक्तींचे नावे सागर पाटील (सांगोला), रफीक नदाफ (सांगोला), बाळासाहेब असबे (सांगोला), शशिकांत कोळी (ड्रायव्हर) आहेत. या चार जणा़ंची नावे खेड शिवापूर पोलीस चौकीच्या स्टेशन डायरीमधे नोंद करण्यात आली आहेत. यातील रफिक नदाफ नावाच्या व्यक्तीने शहाजीबापू पाटील यांना गुहावटीला असताना फोन केला होता. त्याच्याशी बोलतानाच शहाजी बापूंनी 'काय झाडी काय डोंगार' असा उल्लेख केला होता. तर यातील सागर पाटील हा शहाजी बापूंचा नातेवाईक आहे.
शहाजीबापू पाटील नेमकं काय म्हणाले?
खेड शिवापूर या भागात पकडण्यात आलेल्या पाच कोटी रोकड रकमेशी शहाजीबापू पाटील यांच्याशी संबंध लावला जात आहे. महाराष्ट्रभर याची चर्चा झाल्यामुळे शहाजीबापू पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. माझा आणि त्या पाच कोटी रुपयांचा काहीही संबंध नाही. तालुक्यात माझे हजारोच्या संख्येनेक कार्यकर्ते आहेत. शिवापूर टोलनाक्यावर 5 कोटी रुपये पकडण्यात आल्याचं मला माध्यमातील वृत्तातूनच समजले. या रमकेशी माझा तसेच माझ्या कुटुंबाशी कसलाही संबंध नाही, असे शहाजीबापू पाटील यांनी सांगितले आहे. तसेच त्यांनी संजय राऊत यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
हेही वाचा :