एक्स्प्लोर

समीर भुजबळ ठाकरे गटात प्रवेश करणार का? नांदगावमधून उमेदवारी मिळणार का? नेमकं काय म्हणाले भुजबळ?

नांदगाव विधानसभा मतदारसंघातून (Nandgaon Assembly Constituency) मी राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे, अशी माहिती माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिली आहे.

Sameer Bhujbal : नांदगाव विधानसभा मतदारसंघातून (Nandgaon Assembly Constituency) मी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. माझ्या कार्यकर्त्यांनी देखील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेत माहिती दिली आहे. त्यावर आता काय बोलणार, अशी प्रतिक्रिया माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी दिली आहे. ते येवल्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी करण्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, ही केवळ मीडियात चर्चा आहे. सूत्रांची माहिती असल्याचे सांगत त्यावर अधिक भाष्य करण्याचे त्यांनी टाळले. 

दरम्यान, मंत्री छगन भुजबळ हे उद्या येवल्यातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्ष व कार्यकर्ते यांच्या बैठका घेण्यासाठी व नियोजनासाठी माजी खासदार समीर भुजबळ हे येवल्यात दाखल झाले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. 

समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याच्या चर्चा

गेल्या दोन ते अडीच वर्षात राज्यानं अभूतपूर्व सत्तासंघर्ष अनुभवला आहे. राज्यातील दोन मोठे पक्ष, शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) उभी फूट पडली आणि राज्यातील राजकारणात भूकंप झाला. अशातच पक्षांतर्गत फुटीनंतरची यंदाची पहिलीच विधानसभा निवडणूक (Vidhan Sabha Election 2024) असल्यामुळे मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. अशातच राज्यानं एक काका पुतण्यातील बंड पाहिला आहे, अशातच यंदाच्या विधानसभेत राज्याला पुन्हा एकदा काका-पुतण्यातील संघर्ष पाहायला मिळू शकतो. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना त्यांचे पुतणे समीर भुजबळ (Sameer Bhujbal) मोठा धक्का देऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मंत्री छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांनी यापूर्वीच शड्डू ठोकला असून नांदगाव मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे महायुतीकडून संधी मिळण्याची चिन्ह न दिसल्यामुळे आता माजी खासदार समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांच्या वतीनं मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव मतदारसंघातून लढण्यासाठी समीर भुजबळ इच्छुक असल्याचीही माहिती मिळत आहे. 

समीर भुजबळ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. उमेदवारी न मिळाल्यास भुजबळ इतर पर्यायांचा विचार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

महत्वाच्या बातम्या:

छगन भुजबळांना घरातूनच धक्का? पुतणे समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या संपर्कात, नांदगावमधूनच लढण्यास इच्छुक, सुत्रांची माहिती

महत्त्वाच्या बातम्या

Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Embed widget