एक्स्प्लोर

अमरावतीत महायुतील वाद शमता शमेना; रवी राणांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला सुरुवात; संजय खोडके-राणांमध्ये खडाजंगी

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अमरावतीत महायुतीकडून राष्ट्रवादीच्या सुलभा खोडके घड्याळ चिन्हावर उभ्या आहेत. दरम्यान, रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्यावरुन आता पुन्हा नव्यानं सुरुवात झाली आहे.

Maharashtra Politics अमरावती : अमरावती भाजप (BJP) कार्यालयात काही दिवसांपूर्वी बडनेराचे उमेदवार रवी राणा (Ravi Rana) यांची बैठक झाली. त्यामध्ये रवी राणा यांनी अमरावतीची एक जागा कमी झाली तरी चालेल पण कमळ निवडून आले पाहिजे, असे वक्तव्य केलं होतं. असे असले तरी अमरावती विधानसभेत महायुतीकडून राष्ट्रवादीच्या सुलभा खोडके घड्याळ चिन्हावर उभ्या आहेत. त्यामुळे सुलभा खोडके (Sulbha Khodke) यांचे पती संजय खोडके आणि रवी राणा यांच्यातील वादाला आता पुन्हा नव्यानं सुरुवात झाली आहे. आज रवी राणा यांच्या याच वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली की, रवी राणांना विनाशकाले विपरीत बुद्धी आहे. देवेंद्र फडणवीसांनी त्यांना समज द्यावी असे म्हणत अजित पवारांकडूनरवी राणांची कानउघडणी करण्यात आलीय.

माचिस है तो दिया जलेगा, रवी राणांचा रोख नेमका कुणाकडे?

तर यावर आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिलीय की, अजित दादा हे आमच्या महायुतीचे घटक आहेत. महायुतीमध्ये युवा स्वाभिमान पार्टी सुद्धा आहे. लोकसभेला भाजपची सीट उभी असताना संजय खोडके यांनी नवनीत राणांच्या विरोधात काम केलं. अजित पवार जेव्हा अमरावतीला आले, तेव्हा संजय खोडके त्यांच्या सभेला सुद्धा आले नाही. खोडकेंनी त्यांचे नेते अजित दादांना भाव दिला नाही. एका विशिष्ट जातीला फायदा पोहोचवण्यासाठी खोडके काम करणार असतील तर त्यांनी लक्षात ठेवावं, माचिस है तो दिया जलेगा. दिया जलने वाला है और माचिस पे ही लोग भरोसा रखेंगे. असा टोला ही त्यांनी यावेळी लगावला. मात्र माचीस हे भाजपचे बंडखोर उमेदवार जगदीश गुप्ता यांचे निवडणूक चिन्ह आहे, हे विशेष त्यामुळे रवी राणांचा रोख नेमका कुणाकडे आहे हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

नवनीत राणांप्रमाणे रवी राणा देखील पराभूत होतील-सुषमा अंधारे 

तसंच आज सुषमा अंधारे यांनी रवी राणांवर टीका करत लक्ष्य केलंय. नवनीत राणानंतर आता रवी राणा देखील पराभूत होतील, असे सांगितले. त्यावर रवी राणा म्हणाले की, सुषमा अंधारे पाच वर्षातून एकदा इथे येतात आणि सांगतात की रवी राणांचा पराभव होणार आहे. त्यांनी कडू बोलण्यापेक्षा थोडं गोड बोलावं. लोकं सुज्ञ आहेत त्यांना सगळं माहिती आहे. हे दिवाळी दसऱ्यासारखे येतात त्यामुळे यांच्यावर लोक विश्वास ठेवणार नाहीत. असा पलटवारही रवी राणांनी यावेळी केलाय.  

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्धABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
Embed widget