एक्स्प्लोर

Jagdish Mulik: वडगाव शेरीत महायुतीमध्ये बिघाडी; अजितदादा गटाने सुनील टिंगरेना उमेदवारी दिली, भाजपनेही जगदीश मुळीकांना एबी फॉर्म दिला

Jagdish Mulik: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सुनील टिंगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, आता भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांना देखील पक्षांनी एबी फॉर्म दिला आहे.

पुणे: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. अनेक मतदारसंघात उमेदवार जाहीर करून देखील आता मैत्रीपुर्ण लढत होताना दिसत आहे. अशातच वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सुनील टिंगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, आता भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांना देखील पक्षांनी एबी फॉर्म दिला आहे. पण हा मतदारसंघ घेण्यासाठी भाजप देखील आग्रही होता. राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केला असला तरी वडगाव शेरी मतदारसंघावरील दावा भाजपने सोडलेला नव्हता. भाजपने या मतदारसंघात निवडणुक लढवावी यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, असे भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले होते.

जगदीश मुळीक यांना पक्षांनी दिला एबी फॉर्म 

पुणे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र निर्माण झाला आहे. अजित पवारांच्या पक्षाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र आता भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांना देखील पक्षांनी एबी फॉर्म दिला आहे आणि ते देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे.

वडगाव शेरीचे विद्यमान उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे सुनील टिंगरे हे आहेत. टिंगरे यांचं नाव कल्याणीनगरच्या पोर्शे प्रकरणात आल्याने त्यांची उमेदवारी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. मात्र टिंगरेंचं नाव दुसऱ्या उमेदवार यादीमध्ये जाहीर झालं. त्यानंतर पुन्हा जगदीश मुळीक यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी भाजप सुरुवातीपासून आग्रही होते. मात्र, या ठिकाणी विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या भाजपच्या जगदीश मुळीक यांनी या ठिकाणी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू ठेवली असल्याचं बोललं जातं होतं. पक्षाने अधिकृत एबी फॉर्म दिल्यास आपण निवडणूक लढणार असल्याचं जगदीश मुळीक यांनी सांगितले होते. आता घडामोडींना वेग आला आहे. 

आता वडगाव शेरीमध्ये मैत्रीपुर्ण लढत होण्याच्या चर्चा सुरू आहेत. आज भाजप पक्षाकडून जगदीश मुळीक यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे, यामुळे आता वडगावमध्ये मित्रपक्ष आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मे 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मे 2026 | सोमवार
Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूका जाहीर; 18 जून रोजी होणार मतदान, पाहा A टू Z माहिती
विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूका जाहीर; 18 जून रोजी होणार मतदान, पाहा A टू Z माहिती
Kerala Government Formation: व्ही. डी. सतीशन केरळ मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; काँग्रेसच्या 12 मंत्र्यांसह 6 पक्षांतील 21 मंत्र्यांचा समावेश, राहुल आणि प्रियांका गांधीही उपस्थित राहणार
व्ही. डी. सतीशन केरळ मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; काँग्रेसच्या 12 मंत्र्यांसह 6 पक्षांतील 21 मंत्र्यांचा समावेश, राहुल आणि प्रियांका गांधीही उपस्थित राहणार
Rajinikanth: 'मला खूप आश्चर्य वाटलं', विजय सीएम होताच चक्क सुपरस्टार रजनीकांतवर खुलासा करण्याची वेळ! स्टॅलिन भेटीवरूनही थेट भाष्य, नेमकं असं घडलं तरी काय?
'मला खूप आश्चर्य वाटलं', विजय सीएम होताच चक्क सुपरस्टार रजनीकांतवर खुलासा करण्याची वेळ! स्टॅलिन भेटीवरूनही थेट भाष्य, नेमकं असं घडलं तरी काय?

व्हिडीओ

Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी
Rohit Pawar Full Speech : येत्या २६ तारखेला चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करणार; रोहित पवार आक्रमक
Sanjay Raut PC : अजितदादांचं डोकं फिरवण्यात दोन चार लोक त्यात मुंडे, तटकरे; ही त्यांच्या कर्माची फळं
Silver Kolhapuri Chappal Story : लाडक्या जावयासाठी सासऱ्याने बनवली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BLOG : पालकांनो… आता तरी शहाणे व्हा..!
BLOG : पालकांनो… आता तरी शहाणे व्हा..!
Fuel Price Hike : सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
साखरपुड्याचा कार्यक्रम जीवघेणा ठरला; वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, मन हेलावून टाकणारी घटना
साखरपुड्याचा कार्यक्रम जीवघेणा ठरला; वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, मन हेलावून टाकणारी घटना
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मे 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मे 2026 | सोमवार
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET Paper Leak : मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
Embed widget