एक्स्प्लोर

Ajit Pawar Property : बँकेत 3 कोटी, 8 कोटींचे शेअर्स, तिजोरीत 41 किलो चांदी; अजित पवारांची संपत्ती किती?

अजित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते बारामतीत या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, त्यांच्या संपत्तीबाबत आता माहिती समोर आली आहे.

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती या मतदारसंघासाठी आपला उमदेवारी अर्ज दाखल केला आहे. 28 ऑक्टोबर रोजी मोठे शक्तिप्रदर्शन करत त्यांनी हा अर्ज भरला आहे. या मतदारसंघात अजित पवार यांची आणि युगेंद्र पवार यांच्याशी लढत होणार आहे. युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे पुतणे आहेत. म्हणजेच बारामतीत काका-पुतण्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळेल. दरम्यान, अजित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या संपत्तीबाबतची माहिती समोर आली आहे.

अजित पवार यांच्याकडे संपत्ती किती?

अजित पवार यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे एकूण 7 लाख 20 हजार रुपयांची रोख रक्कम आहे. त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे 6 लाख 65 हजार 400 रुपये रोख आहेत. अजित पवार यांच्याकडे बँकेत ठेवीच्या रुपात 3 कोटी 9 लाख 69 हजार 53 रुपये आहेत. तर त्यांची पत्नी सुनेत्र पवार यांच्या बँक खात्यात एकूण 3 कोटी 69 लाख 92 हजार 91 रुपयांच्या ठेवी आहेत. अजित पवार यांच्याकडे 24 लाख 79 हजार 760 रुपयांचे बाँड्स आहेत. तर सुनेत्रा पवार यांच्याकडे 14 लाख 99 हजार 610 रुपयांचे बाँड्स आहेत.

शेअर्समध्ये किती कोटींची गुंतवणूक?

पोस्ट ऑफिसमधील बचत आणि विम्याच्या रुपात अजित पवार यांनी 10 कोटी 79 लाख 2155 रुपये गुंतवलेले आहेत. तर सुनेत्रा पवार यांनी 44 लाख 29 हजार 463 रुपये गुंतवलेले आहेत. अजित पवार यांच्याकडे वेगवेगळ्या कंपन्यांचे 8 कोटी 50 लाख रुपयांचे शेअर्स आहेत. 

अजित पवार यांच्या नावावर कोणती वाहने?

अजित पवार यांच्या नावे 3 ट्रेलर्स, Toyota Camry, होन्डा CRV, ट्रॅक्टर अशी नावे आहेत. तर सुनेत्रा पवार यांच्या नावे Tractor आणि दोन trailers आहेत. अजित पवार यांच्याकडे 41.50 किलो चांदी आहे. तर सुनेत्रा पवार यांच्याकडे 35 किलो चांदी, 1.30 किलो सोने तसेच 28 कॅरेटचा हिरा आहे.

गेल्या पाच वर्षांच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपत्तीमध्ये वाढ झाली आहे. पवार यांनी उमेदवारी अर्ज सादर करताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून हे स्पष्ट झाले आहे. २०१९ च्या तुलनेत स्थावर त्यांच्या मालमत्तेत १० कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. ३७ कोटी १५ लाख ७० हजार २९ रुपये स्थावर, तर ८ कोटी २२ लाख ६० हजार ६८० रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी २७ कोटींपेक्षा अधिक किमतीची मालमत्ता जाहीर केली होती.तसेच, २० ठिकाणी जमीन, चार निवासी इमारती, एक व्यापारी संकुल इमारत, दोन ट्रॅक्टर, चार ट्रेलर अशी जंगम मालमत्ता असून, यंदा एका ट्रेलरची वाढ झाली आहे. तसेच संपत्तीमध्ये देखील वाढ झाली आहे  प्रतिज्ञापत्रात नमूद केल्याप्रमाणे पवार यांच्याकडे सात लाख २० हजार
रुपयांची रोख रक्कम आहे.

२०१९ च्या तुलनेत स्थावर मालमत्तेत १० कोटी रुपयांनी वाढ होत ३७ कोटी १५ लाख ७० हजार २९ रुपये इतकीस्थावर, तर आठ कोटी २२ लाख ६० हजार ६८० रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. पवार यांनी वैयक्तिक एक कोटी ७ लाख ९२ हजार १५५ रुपयांची विमा पत्रे, डाक बचतीत गुंतवणूक केली असून, २४ लाख ७९ हजार ७६० रुपयांचे शेअर, बंधपत्र (बॉण्ड), तर तीन कोटी ९ लाख ६९ हजार ५३ रुपयांच्या बँकांमध्ये ठेवी असल्याचे स्पष्ट केले आहे. २०१९ मध्ये अजित पवार यांच्यावर वैयक्तिक एक कोटी पाच लाख रुपयाचे कर्ज होते,तुलनेने यंदा कर्जात वाढ झाली आहे. २०२४ मध्ये ४ कोटी १० लाख ८६ हजार ७५५ रुपयांचे कर्ज असल्याचे नमूद केले आहे.

तसेच सोने-चांदीबरोबर हिऱ्याचे दागिने वाढले आहेत. अजित पवार यांच्याकडे सद्यःस्थितीला ३८ लाख १ हजार ५३२ किमतीचे सोने-चांदी आहे. यामध्ये सोन्याचे दागिने, चांदीची भांडी, भेटवस्तू, चांदीच्या मूर्ती आणि हिल्याचे दागिने असल्याचे जाहीर केले आहे. तर २०१९ मध्ये वैयक्तिक १३ लाख रुपयांचे सोने, चांदीचे दागिने असल्याचे नमूद केले होते. ही वाढ दुप्पट आहे.

हेही वाचा : 

Ajit Pawar: तुटायला वेळ लागत नाही, अजित पवार भावूक; अर्ज भरल्यानंतर बारामतीकरांना भावनिक साद

माढ्याचा तिढा सुटता सुटेना! शरद पवारांंनंतरच अजित पवार आपला डाव टाकणार? नेमकं कुणाला तिकीट मिळणार?

अजित पवार बारामतीत 75000 मतांनी मागे राहतील, विधानसभेनंतर ते संपतील, उत्तमराव जानकरांचा हल्लाबोल

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
Komal Kale Reel Star Arrested : 50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
Tatkal Ticket Booking New Rule : तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
Komal Kale Reel Star Arrested : 50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
Tatkal Ticket Booking New Rule : तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
पुन्हा घोळ... निवडणुकीसाठी पुण्यातून इच्छुक, पण नवऱ्याचं नाव इंदापुरात अन् बायकोचं नाव बारामतीत; सुप्रिया सुळेंनी आणलं समोर
पुन्हा घोळ... निवडणुकीसाठी पुण्यातून इच्छुक, पण नवऱ्याचं नाव इंदापुरात अन् बायकोचं नाव बारामतीत; सुप्रिया सुळेंनी आणलं समोर
निरोगी आरोग्यासाठी होलिस्टिक हीलिंगला पसंती, ही पद्धती लाखो लोकांसाठी आशेचा किरण, पतंजलीचा दावा
निरोगी आरोग्यासाठी होलिस्टिक हीलिंगला पसंती, ही पद्धती लाखो लोकांसाठी आशेचा किरण, पतंजलीचा दावा
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget