एक्स्प्लोर

Vidhan Parishad Election 2021: अकोल्यात भाजपचा 'वसंत' फुलला, काय होती पक्षाची रणनीती?

Maharashtra Vidhan Parishad Election 2021: विधान परिषदेच्या अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघात भाजपचं कमळ फुललंय.

Maharashtra Vidhan Parishad Election 2021: विधान परिषदेच्या अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघात भाजपचं कमळ फुललंय. या निवडणुकीत भाजपचे वसंत खंडेलवाल यांचा 109 मतांनी विजयी झालाय. शिवसेनेच्या तब्बल तीन टर्मपासून आमदार असलेल्या गोपीकिशन बाजोरियांचा पराभव करीत खंडेलवाल 'जायंट किलर' ठरलेत. खंडेलवालांनी बाजोरियांचा 443 विरूद्ध 334 मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणात फाटाफुट झाल्याचं स्पष्ट झालंय.

24 वर्षांपासून शिवसेनेचा अभेद्य गड असलेल्या मतदारसंघाला भाजपचा सुरूंग 
विधान परिषदेच्या अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघावरील शिवसेनेची तब्बल 24 वर्षांच्या सत्तेला आज भाजपनं सुरूंग लावला आहे. 1997 पासून या मतदारसंघावर शिवसेनेचा ताबा होता. 1997 ते 2021 पर्यंत शिवसेनेनं या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर एकहाती वर्चस्व गाजवलं होतं. यातील सलग तीन टर्म 18 वर्ष गोपीकिशन बाजोरिया येथून विजयी झाले होते. मात्र, भाजपच्या वसंत खंडेलवालांनी इतिहास घडवत या निवडणुकीत भाजपचं कमळ फुलवलं आहे. 

वसंत खंडेलवाल ठरले 'जायंट किलर' 
या निवडणुकीत भाजपचे वसंत खंडेलवाल 109 मतांनी विजयी झाले. वसंत खंडेलवाल यांना 443 मतं मिळालीय. तर गोपीकिशन बाजोरिया यांना 334 मतं मिळालीय. तर 31 मतं अवैध ठरलीयेत. गोपीकिशन बाजोरियांचा पराभव करीत खंडेलवाल 'जायंट किलर' ठरलेय. हा विजय कार्यकर्ते आणि पक्षाला समर्पित करीत असल्याची प्रतिक्रिया विजयी उमेदवार वसंत खंडेलवाल यांनी दिली.

कोण आहेत आहेत वसंत खंडेलवाल 
1) वसंत खंडेलवाल अकोल्यातील प्रख्यात सराफा व्यावसायिक आहेत.
2) खंडेलवाल घराणं संघ, जनसंघ आणि भाजपशी एकनिष्ठ. वसंत खंडेलवालांचे आजोबा 'काकाजी' खंडेलवाल आणि वडील मदनलाल खंडेलवाल विदर्भातील जनसंघ आणि नंतर भाजपचे जेष्ठ नेते आहेत. 
3) खंडेलवाल कुटुंबियांशी सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांचे घनिष्ट कौटूंबीक संबंध आहेत.
4) वसंत खंडेलवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक आहेत. 

असं झालं मतदान
एकूण मतदार : 821
झालेलं मतदान : 808
अवैध मतदान : 31

उमेदवारांना मिळालेलं मतदान
वसंत खंडेलवाल (भाजप)-  443
गोपीकिशन बाजोरिया (शिवसेना) - 334
भाजपचे वसंत खंडेलवाल 109 मतांनी विजयी

महाविकास आघाडीची 90 वर मतं फुटलीत 
या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणात फुट पडल्याचं स्पष्ट झालंय. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन पक्षांकडे 419 पेक्षा अधिक मतं होती. मात्र, त्यांची या निवडणुकीत जवळपास 90 च्या जवळपास मतं फुटल्याचं निकालावरून स्पष्ट झालं आहे. तर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनंही या निवडणुकीत भाजपला मतदान केल्याचं स्पष्ट झालंय. या पराभवाचं तिन्ही पक्षांनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलीय.

निवडणुकीतील मतदारांचं पक्षीय बलाबल
एकूण मतदार : 821
स्त्री : 389
पुरूष : 432
काँग्रेस : 191
राष्ट्रवादी : 91
सेना : 124
आंबेडकर : 86
भाजप : 245
एमआयएम : 07
प्रहार : 01
अपक्ष / स्थानिक आघाड्या : 77

प्रकाश आंबेडकरांच्या भाजपला अदृश्य मदतीमूळे सेना विजयापासून 'वंचित' 
या निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीकडं 85 मतं होती. यातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मंगरूळपीर आणि मानोरातील वंचितचे 22 नगरसेवक ऐन निवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रवादीमध्ये गेले होते. यात उरलेल्या वंचितच्या मतदारांनीही भाजपला मदत केल्याचं निकालावरून स्पष्ट होत आहे. आंबेडकरांनी भाजपच्या पारड्यात मतांचं दान देतांना सहा महिन्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपच्या 'अप्रत्यक्ष' मदतीचं 'वचन' घेतल्याची अकोल्यात चर्चा आहे. 

बाजोरियांच्या पराभवामूळे शिवसेनेत होणार घमासान
अकोल्यातील पक्षाच्या पराभवामूळे शिवसेनेत मोठं घमासान होण्याची शक्यता आहे. अकोल्यातील शिवसेनेच्या पराभवाचं खापर शिवसेनानेते खासदार अरविंद सावंत यांच्यावर फुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अकोल्याच्या निवडणुकीची जबाबदारी शिवसेनेनं  खासदार अरविंद सावंत यांच्यावर सोपवली होती. अरविंद सावंत याआधी अकोल्याचे सेना संपर्कप्रमुख होते. अकोल्यात शिवसेनेत अरविंद सावंत आणि बाजोरियांचे पक्षांतर्गत गट होते. दोन्ही गटांत जिल्ह्यात वर्चस्वाची लढाई रंगल्याचं अनेकदा समोर आलं होतं. अकोल्यातील बाळापूरचे सेना आमदार आणि जिल्हाप्रमुख नितीन देशमुख हे बाजोरियांचे पक्षांतर्गत कट्टर विरोधक आहेत. पराभवाच्या संभाव्य अहवालात पक्षाच्या पराभवाची कारणे समोर येण्याची शक्यता आहे. पराभवावर प्रतिक्रिया देतांना बाजोरिया यांनी "आपण मंत्री होऊ अशी काहींना भिती होती", असं म्हणत केलं पक्षांतर्गत दगाफटक्यावर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं आहे.

गोपीकिशन बाजोरियांनी केलं वसंत खंडेलवालांचं अभिनंदन 
भाजपचे विजयी उमेदवार वसंत खंडेलवाल हे सेनेचे पराभूत उमेदवार यांचे बालमित्र आहेत. पराभूत उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांनी विजयी उमेदवार खंडेलवालांचं विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे. नव्या जबाबदारीला वसंत खंडेलवाल न्याय देतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. यासोबतच सलग 18 वर्ष आमदार म्हणून निवडून देणार्या मतदारांचंही त्यांनी आभार मानलं आहे. 

या मतदारसंघातील शिवसेनेच्या पराभवाचं विश्लेषण लवकरच पक्षाकडून आणि महाविकास आघाडीकडून होण्याची शक्यता आहेय. यात पराभवासाठी जबाबदार लोकांवर कारवाईवरून राजकारण तापण्याची शक्यता आहेय. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्यAjit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तकNCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहाAditi Tatkare on Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे माघारी जाणार? जाणून घ्या एक-एक डिटेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Embed widget