मी निवडून आलो त्यापेक्षा जास्त आनंद बावनकुळेंच्या विजयाने, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhan Parishad Election 2021 : मी स्वत: निवडून आलो त्यापेक्षा जास्त आनंद मला आज बावनकुळेंच्या विजयाने झाला, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Devendra Fadnavis On Victory of BJP : विधान परिषद निवडणुकांच्या दोन जांगांचे निकाल हाती आले. निकालांमध्ये भाजपनं महाविकास आघाडीला दुहेरी धक्का दिला आहे. नागपूर पाठोपाठ अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघात भाजपनं विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भाजपने आपली मते फक्त राखलीच नाहीत तर महाविकास आघाडीची 96 फोडली असल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. हा महाविकास आघाडीला मोठा धक्का असल्याचे समजलं जात आहे.
नागपूरसह अकोला-बुलढाणा-वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदार संघातील भाजपच्या विजयाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मी स्वत: निवडून आलो त्यापेक्षा जास्त आनंद मला आज बावनकुळेंच्या विजयाने झाला. बावनकुळेंच्या विजय महाविकास आघाडीला चपराक आहे."
पाहा व्हिडीओ : Bawankule आणि Fadanvis यांची विजयानंतर गळाभेट
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
"आज माझे सहकारी चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रचंड विजय मिळाला आहे. मी स्वत: निवडून आलो त्यापेक्षा जास्त आनंद मला आज बावनकुळेंच्या विजयाने झाला. बावनकुळेंच्या विजय महाविकास आघाडीला चपराक आहे. तिकडे अकोल्यात वसंत खंडेलवाल यांनीही निर्णायक विजय मिळवला आहे. एकूणच विधानपरिषदेच्या 6 पैकी 4 जागी भाजप निवडून आली आहे. महाविकास आघाडीचे तीन पक्ष एकत्र आले म्हणजे सगळे विजय मिळू शकतात हे गणित मांडलं गेलं ते चुकीचं ठरलं. महाराष्ट्रातील जनता भाजपच्या पाठिशी आहे, भविष्यातही आम्हाला आशिर्वाद मिळेल. चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय हा भविष्यातील विजयाची नांदी आहे. आमचे राष्ट्रीय नेते मोदी, अमित शाह, नड्डा यांचे आभार.", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"मी विशेष आभार मानतो नितीन गडकरी यांचे, त्यांच्या नेतृत्त्वात आम्ही लढलो आणि आम्हाला विजय मिळाला. विजयाच्या मालिकेची सुरुवात यानिमित्ताने झाली आहे. महाविकास आघाडीची मतं ही नागपूर आणि अकोल्यात मिळाली. ज्यांनी मतं दिली त्या सर्वांचे आभार मानतो", असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपकडे विजयासाठी आवश्यक संख्याबळ होते. मात्र, काँग्रेसने या चमत्कार घडवण्याचा दावा केला होता. त्यांचा दावा हवेत राहिला. काँग्रेस-महाविकास आघाडीची 16 मते फुटली. भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मते मिळाली. तर, काँग्रेसचे उमेदवार मंगेश देशमुख यांना 186 मते मिळाली. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले रविंद्र भोयर यांना एक मत मिळाले. मतदानाच्या काही तास आधीच काँग्रेसने रविंद्र भोयर यांचा पाठिंबा काढत देशमुख यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. काँग्रेसमध्ये उमेदवार निवडी करूनच गोंधळ असल्याचे चित्र होते. मतदानाच्या काही तासांआधीच उमेदवार बदलण्यात आला. त्यातून काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर मतभिन्नता असल्याचे दिसून आले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Vidhan Parishad Election : एक-दोन नव्हे, महाविकास आघाडीची तब्बल 96 मतं फोडली, भाजपने दोन्ही जागा कशा जिंकल्या?
- भाजपचा महाविकास आघाडीला धक्का; अकोल्यात शिवसेनेचे बाजोरिया यांचा धक्कादायक पराभव
- विधान परिषद निवडणूक: नागपूरमध्ये चमत्कार झालाच नाही, भाजपचा दणदणीत विजय, महाविकास आघाडीची मते फुटली
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह