एक्स्प्लोर

Cabinet Reshuffle | राज्य मंत्रिमंडळात जूनच्या सुरुवातीला फेरबदलाचे संकेत

लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपला अनुकूल लागल्यास राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, विजयसिंह मोहिते पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो. त्यानंतर या दिग्गज नेत्यांना महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकांचे निकाल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. निकालाआधीच राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाचे वारे वाहू लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीआधी काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याचा अनुमान वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे निवडणुकांच्या तोंडावर पक्षात आलेल्या काही 'आयाराम' नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची चिन्हं आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपला अनुकूल लागल्यास राधाकृष्ण विखे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो. त्यानंतर या दिग्गज नेत्यांना महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तर जयदत्त क्षीरसागर यांनाही शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. Vikhe family disputes | विखे कुटुंबातील लढाई पुन्हा रस्त्यावर | अहमदनगर  राधाकृष्ण विखे पाटील दोन नंबरच्या मंत्रिपदाची म्हणजेच महसूल खात्याची मागणी करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून महसूल खातं काढून विखेंना मिळण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलं जातं. मात्र पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर रिक्त असलेलं आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडे अतिरिक्त भार असलेलं कृषी खातं विखेंना मिळण्याची दाट शक्यता आहे.
कोणतं दाबायचं? मतदानासाठी आलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांच्या सवालाने हास्यकल्लोळ
दुसरीकडे, मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनाही कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अहमदनगर आणि मराठवाड्यात संघटनेला बळकटी देण्यासाठी आणि पक्ष विस्तारीकरणासाठी मंत्रिपद देणार असल्याची चर्चा आहे. त्याआधी 21 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या निवडणूक आढावा बैठकीत लोकसभा निवडणुकीत डावलल्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न होणार आहेत.
सुजयने राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवावी असं राहुल गांधींनी सुचवलं, हे धक्कादायक : राधाकृष्ण विखे पाटील
राधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या वाटेवर? सुजय विखे पाटील यांना अहमदनगरमधून लोकसभेची निवडणूक लढवायची इच्छा होती. त्यामुळे काँग्रेसने राष्ट्रवादीच्या कोट्यातील ही जागा मागितली. मात्र राष्ट्रवादीने ही जागा बदलून देण्यास नकार दिल्याने सुजय विखेंनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला होता. भाजपने सुजय विखेंना तिकीट दिल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यांचा उघड प्रचारही केला होता. जयदत्त क्षीरसागरांचं बंडाचं निशाण याआधी जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी विरोधात बंड करत भाजपच्या लोकसभेसाठीच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना विजयी करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून राष्ट्रवादीत नाराज असलेल्या क्षीरसागर यांनी बीडमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेत प्रीतम मुंडेंना पाठिंबा देणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. क्षीरसागरांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चाही रंगल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Teachers Constituency Election : दोन ओएसडीच्या स्पर्धेत सचिन सानपांनी बाजी मारली आता शिंदेंनी सुद्धा पाठिंबा दिला, पुणे शिक्षकच्या लढाईतील कोण आहेत सचिन सानप?
दोन ओएसडीच्या स्पर्धेत सचिन सानपांनी बाजी मारली आता शिंदेंनी सुद्धा पाठिंबा दिला, पुणे शिक्षकच्या लढाईतील कोण आहेत सचिन सानप?
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्ह वापरु नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, राष्ट्रवादी शरद पवार गटाला इशारा
ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्ह वापरु नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, राष्ट्रवादी शरद पवार गटाला इशारा

व्हिडीओ

Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Baramati News: विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Tukaram Mundhe on MPSC Paper Committee: ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात,
ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात, "मला कोणतेही पत्र मिळालेले नाही!"
Embed widget