एक्स्प्लोर

Lok Sabha Result 2024 : विदर्भात काँग्रेसची घरवापसी, भाजपला धक्का; दहा मतदारसंघातल्या निकालाची नेमकी वैशिष्ट्ये काय?

विदर्भातील दहा पैकी 7 ठिकाणी महाविकास आघाडीला यश आले आहे. तर महायुतीला अवघ्या 3 ठिकाणी यश आले आहे. त्यामुळे विदर्भात मविआने चांगलीच मुसंडी मारली असून काँग्रेस विदर्भातील सर्वत मोठा पक्ष ठरला आहे.

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : राज्यासह देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या आणि विदर्भातील (Vidarbha) सर्वात प्रतिष्ठेचा अन् हायव्होल्टेज मतदारसंघांमध्ये समावेश असलेल्या, नागपूर लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election Result 2024) भाजपचे नेते आणि विद्यामन केंद्रीय मंत्री नितीन गडकारींनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे (Vikas Thakre) यांच्यात थेट लढतीत गडकारींनी आपल्या विकासाच्या जोरावर विजयाची माळ आपल्या गळ्यात घातली आहे. दुसरीकडे विदर्भात मात्र काँग्रेसने घरवापसी केल्याचे चित्र आहे.

कारण विदर्भातील (Vidarbha) दहा पैकी 7 ठिकाणी महाविकास आघाडीला यश आले आहे. तर भाजप 2 आणि शिंदेच्या शिवसेनेला अवघ्या 1 ठिकाणी यश आले आहे. त्यामुळे विदर्भात महाविकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारली असून काँग्रेस विदर्भातील सर्वत मोठा पक्ष ठरला आहे. विदर्भातील दहा मतदारसंघात नेमकं काय घडलं, या  मतदारसंघातल्या निकालाची नेमकी वैशिष्ट्ये काय?  हे आपण जाणून घेऊया.      

नागपूर लोकसभा मतदारसंघ

नागपूर लोकसभा मतदारसंघातील (Nagpur Lok Sabha Election Result 2024) पहिल्या फेरी पासून  नितीन गडकरींची सरसी कायम असल्याचे  चित्र होते. तर अखेरच्या फेरीत नितीन गडकारींनी 1,37,603 मतांनी आघाडी मिळवत दणदणीत विजय मिळवला आहे. नितीन गडकरी यांना 6 लाख 55 हजार 027 मते मिळाली तर विकास ठाकरे (Vikas Thakre) यांना 5 लाख 17 हजार 424 मते मिळवत पराभव स्वीकारावा लागलाय. नागपूरची 12 तर साडे चौदा तास मतमोजणी झाली. यात मात्र गेल्या वेळीच्या तुलनेत गडकारींच्या मताधिक्यात 1.56 टक्क्यांनी घट झाली. तर मध्य नागपूर गडकारींच्या विजयासाठी महत्वपूर्ण ठरला. दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार ज्या मतदारसंघात आमदार आहेत तिथेच त्यांना कमी मते पडल्याचे समोर आले आहे. नागपूर मतदारसंघ भाजपने जरी राखला असला तरी विदर्भात भाजपला सफशेल अपयश आल्याचे पाहायला मिळाले. 

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ

नागपूरनंतर पश्चिम विदर्भातील महत्वाची जागा असलेल्या चंद्रपूर मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा दारुण पराभव झाला आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी भाजप आणि महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांचा पराभव केला आहे. प्रतिभा धानोरकर यांना एकूण 7 लाख 18 हजार 410 मत मिळाली, सुधीर मुनगंटीवार यांना 4 लाख 58 हजार 004 मत मिळाली. प्रतिभा धानोरकर यांनी 2 लाख 60 हजार 406 मतांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत, त्या मतदारसंघातूनही प्रतिभा धानोरकर यांना मताधिक्य मिळालं. त्यामुळे चंद्रपूरात देखील भाजपला मोठा धक्का बसला असून 2019 प्रमाणेच काँग्रेसने हा गड राखला आहे.   

रामटेक लोकसभा मतदारसंघ

नागपूर आणि चंद्रपूरनंतर देशाला पंतप्रधान मिळवून देणारा मतदारसंघ अशी रामटेक लोकसभा मतदारसंघाची ओळख असलेल्या रामटेक गडावरही महायुतीला अपयश आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांचा दारुण पराभव झाला आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार श्यामकुमार बर्वे यांनी  दणदणीत विजय मिळवत रामटेकच्या गडात काँग्रेसच्या गडात 6 लाख 13 हजार 025 मतांनी विजयी झेंडा रोवला आहे. विशेष म्हणजे कधीकाळी रामटेक मतदारसंघातील कांद्रीचे माजी उपसरपंच आता रामटेकचे खासदार झाले आहेत. 

अकोला लोकसभा मतदारसंघ

नागपूरनंतर केवळ अकोल्यात भाजपला विजय मिळवण्यात यश आले आहे. महायुतीचे भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या डॉ. अभय पाटील यांचा पराभव केलाय. शिवाय वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष प्रकाश आंबेडकर देखील पराभूत झाले आहेत. चाळीशीतील अनुप धोत्रे या निवडणुकीत जायंट किलर ठरले आहेत. त्यांनी पहिल्याच निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांसह काँग्रेस उमेदवाराचा दारूण पराभव केला. अनुप धोत्रे यांचे वडील संजय धोत्रे याआधी सलग चार वेळेस खासदार झाले होते. मात्र संजय धोत्रे आजारी असल्याने यंदा अनुप धोत्रेंना भाजपनं मैदानात उतरवलं होतं. मात्र, विदर्भात नागपूरनंतर केवळ अकोल्यात भाजपला यश आले आहे.  

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात (Bhandara Gondia Lok Sabha Election) काँग्रेसचा नवा चेहरा असलेले डॉ. प्रशांत पडोळे (Prashant Padole) आणि सलग दुसऱ्यांदा महायुतीचे उमेदवार असलेले सुनील मेंढे (Sunil Mendhe) यांच्यात अतीतटीची लढत झाली. राज्यात एकट्या भंडारा-गोंदिया मतदारसंघात उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. अखेर 30 व्या फेरीत डॉ. प्रशांत पडोळे यांनी आघाडी घेत विजय मिळवला आहे. तर महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्यावर 32 हजार 945 मतांनी आघाडी घेत आपल्या गळ्यात पहिल्याच टर्म मध्ये विजयाची माळ घातली आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात तब्बल 25 वर्षानंतर निवडणुकीत पहिल्यांदा इव्हीएम मशीनवर पंजा निवडणूक चिन्ह पाहायला मिळाले होते. तर राज्यातील पक्ष फुटीनंतर या मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel)यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

अमरावती लोकसभा मतदारसंघ

विदर्भातील कायम चर्चेत असलेल्या अमरावती या मतदारसंघात मोठी रंजक निवडणूक झाल्याचे बघायला मिळाले होते. यात भाजपच्या (BJP) तिकिटावर निवडणूक लढवलेल्या नवणीत राणा (Navneet Rana) यांचा पराभव झाला आहे. येथे मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवाराच्या पारड्या मतं टाकली आहेत.पूर्वी अपक्ष म्हणून निवडणूक लढल्या आणि विजयी ठरलेल्या नवनीत राणा यंदा मात्र भाजपच्या तिकिटावर 19 हाजार 731 मतांनी पराभूत झाल्या आहेत. अमरावती लोकसभेच्या मैदानात यंदा तिहेरी लढत पाहायला मिळाली. काँग्रेसचे बळवंत वानखेडे, भाजपकडून नवनीत राणा आणि प्रहारचे दिनेश बुब हे मैदानात होते. पण या तिहेरी लढतीत काँग्रेसने बाजी मारत बळवंत वानखेडेंनी विजयाचा गुलाल उधळलाल. त्यामुळे विदर्भातील एका महत्त्वाच्या जागेवरची महायुतीची आणि पर्यायाने भाजपची पकड सुटली.  

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ

विदर्भातील महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघांपैकी एक असणाऱ्या यवतमाळ-वाशिमची निवडणूक यंदा कधी नव्हे इतकी चुरशीची ठरली. गेल्या पाच टर्मपासून यवतमाळ लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेच्या भावना गवळी यांचे एकहाती वर्चस्व होते. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अँटी-इन्कम्बन्सीचा फॅक्टर आणि भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे महायुतीने भावना गवळी यांच्या उमेदवारीला विरोध केला. त्यामुळे यवतमाळमधून शिंदे गटाने  हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील  यांना रिंगणात उतरवले होते. त्यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून रिंगणात उतरलेल्या ठाकरे गटाचे संजय देशमुख यांचे आव्हान होते. मात्र उद्धवसेनेने अखेर हा गड आपल्याकडे खेचला आहे. 94 हजार 474 मतांनी महायुतीच्या राजश्री पाटील यांचा दारुण पराभव झाला.    

लोकसभा निवडणुकीत कोणाला किती  जागांवर विजय मिळाला?

देशपातळीवरील समीकरणं

एनडीए आघाडी- 294
इंडिया आघाडी- 232
इतर-17

महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल

महाविकास आघाडी- 29
महायुती- 18
अपक्ष- 1

महायुतीमधील पक्षीय बलाबल

भाजप- 9
शिवसेना (शिंदे गट)-7
राष्ट्रवादी काँग्रेस-1


महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?

काँग्रेस- 13
ठाकरे गट-9
शरद पवार गट-8

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget