एक्स्प्लोर

मनसेविरोधात भाजपनं अखेर उमेदवार रिंगणात उतरवलाच; पदवीधर मतदारसंघात अभिजीत पानसे विरुद्ध निरंजन डावखरे यांची लढत

Maharashtra Legislative Council Elections: बिनशर्त पाठिंबा दिलेल्या मनसेविरोधात (MNS) भाजपनं (BJP) अखेर उमेदवार रिंगणात उतरवलाच, पदवीधर मतदारसंघात पानसे विरुद्ध डावखरेंची लढतMaharashtra Legislative Council Elections | Niranjan Davkhar vs Abhijit Panse

Maharashtra Legislative Council Elections 2024: मुंबई : भाजपकडून (BJP) विधानपरिषदेचे उमेदवार (Maharashtra Legislative Council Elections) जाहीर करण्यात आले आहेत. भाजप विधान परिषदेच्या (Legislative Council Elections) एकूण तीन जागा लढणार आहे. मुंबई शिक्षक आणि पदवीधरसहित, कोकण पदवीधरवर भाजपकडून उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. कोकण विभाग पदवीधरमधून निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबई पदवीधरमधून किरण शेलार तर, मुंबई शिक्षकमध्ये शिवनाथ दराडे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कोकण पदवीधरसाठी अभिजीत पानसेंच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासूनच भाजपकडून विधान परिषदेवर असलेले निरंजन डावखरेंचं काय होणार? याच्या चर्चा रंगल्या होत्या. मनसेनं जाहीर केलेला उमेदवार महायुतीचा की, मनसे स्वबळावर लढणार अशा चर्चा सुरू होत्या. त्यामुळे भाजपकडून राज ठाकरेंची मनधरणी केली जाणार का? अशाही चर्चा सुरू होत्या. अशातच आता भाजपनं विधान परिषदेसाठी यादी जाहीर केली आहे. कोकण पदवीधरसाठी भाजपकडून निरंजन डावखरेंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

बिनशर्त पाठिंबा दिलेल्या मनसेविरोधात भाजपने अखेर उमेदवार रिंगणात उतरवलाच

महायुतीत विधानसभेचं बिगुल वाजण्याआधीच जागांवरून रस्सीखेच सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. असं असतानाच त्यापूर्वी राज्याच्या राजकारणात विधान परिषदेची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. लोकसभेत मोदींना बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी, भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मनसेकडून अभिजीत पानसेंची उमेदवारी जाहीर केली. राज ठाकरेंची ही खेळी भाजपसाठी धक्का असल्याचं बोललं जात आहे.  कोकण पदवीधर हा भाजपचा पारंपारिक मतदारसंघ समजला जातो आणि याच मतदारसंघात निरंजन डावखरे हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे राज ठाकरेंनी अचानक अभिजीत पानसेंचं नाव जाहीर करून भाजपची पुरती गोची केल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. 

राज्यात बदलेल्या राजकीय समीकरणांमुळे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अतिरीक्त मदतीमुळे, यंदाही निरंजन डावखरेंसाठी ही लढत सोपी मानली जात होती. पण ऐनवेळी राज ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केल्यामुळे, महायुतीच्या गोटात मिठाचा खडा टाकल्याची चर्चा रंगली आहे. अशातच आता भाजपकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारांची घोषणा करत कोकण पदवीधरसाठी निरंजन डावखरेंच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे यंदा कोकण पदवीधरसाठी अभिजीत पानसे विरुद्ध निरंजन डावखरे यांची लढत होणार आहे. दरम्यान, कोकण पदवीधरसाठी येत्या 26 जून रोजी मतदान होणार आहे. तर 1 जुलैला मतमोजणी होणार आहे.       

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Marathwada Voting : मराठवाड्यात मतदानाची तयारी; लढतीत रंगतTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6:30 AM :20 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:00 AM : 20 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Attacked : 4 दुचाकी, 2 कार; संजय शिरसाटांच्या लेकानं सांगितला हल्ल्याच घटनाक्रम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Embed widget