एक्स्प्लोर

Maharashtra Exit Polls Result 2024 : महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळणार? एक्झिट पोलनुसार NCP ला फटका, आकडे काय सांगतात? 

 Maharashtra Election Exit Polls Results 2024 : अजित पवार यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेसनं महायुतीतून निवडणूक लढवली आहे. अजित पवार आणि शरद पवार हे वेगळे झाल्यानंतर पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आमने सामने आले. 

Maharashtra Election Exit Polls Results 2024  मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी 288 जागांवर  मतदान पार पडलं. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत यावेळी महाविकास आघाडी आणि महायुती आमने सामने आले होते. अजित पवार यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा गट महायुतीत सहभागी झाला. अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व आल्यानंतर ते महायुतीतून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवत आहेत. महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 54 जागा मिळाल्या,भाजपनं 148 जागा, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 85 जागा लढवल्या तर मित्रपक्षांना 4 जागा सोडण्यात आल्या. आता विविध संस्थांचे एक्झिट पोलचे अंदाज समोर येत आहेत. एक्झिट पोलचे अंदाज समोर येत असून यामध्ये बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज महायुतीचं सरकार येईल, असा आहे. मात्र, यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी कशी आहे, हे पाहावं लागेल.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक्झिट पोलमध्ये किती जागांचा अंदाज?

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेप्रमाणं विधानसभेला देखील महायुतीत कमी जागा मिळाल्या. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभेला 4 जागा लढवल्या होत्या. तर, महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत 54 जागा मिळाल्या. एक्झिट पोल करणाऱ्या विविध संस्थांचे अंदाज पाहिले असता अजित पवारांच्या आमदारांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांची संख्या 40 पेक्षा अधिक होती. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांची संख्या घटण्याची शक्यता  आहे. 

एक्झिट पोलनुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळण्याचा अंदाज?

चाणक्य स्ट्रॅटेजीज : 22+
पोल डायरी : 18-28 
इलेक्टोरल एज : 14
मॅट्रिझ : 17-26
दैनिक भास्कर : 15-20
लोकशाही रुद्र : 18-22 

एक्झिट पोलनुसार अजित पवार  यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फटका?

लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चार पैकी 1 जागा मिळाली होती. आता एक्झिट पोलच्या अंदाजानुसार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचं नुकसान होताना दिसत आहे. अजित पवार यांनी ज्यांना उमेदवार दिले त्यामध्ये बहुतांश उमेदवार हे विद्यमान आमदार होते. त्यामुळं जर एक्झिट पोलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा कमी होताना दिसत आहे. त्यामुळं एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांश आमदारांना पराभव स्वीकारावा लागू शकतो. 

राष्ट्रवादी काँग्रेसला पोल डायरीनं सर्वाधिक जागा 18-28 च्या दरम्यान दाखवल्या आहेत. तर, मॅट्रिझनं 17-26 जागा राष्ट्रवादीला दाखवल्या आहेत. इलेक्ट्रोल एजनं सर्वात कमी जागा राष्ट्रवादीला दाखवल्या आहेत. राष्ट्रवादीला 14 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

इतर बातम्या : 
   

Maharashtra Exit Polls Result 2024 : नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात कोण ठरणार 'बाजीगर'? महायुती की मविआ? एक्झिट पोलमधून समोर आली आकडेवारी

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget