एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Elections 2024 : मोठी बातमी: 'या' विधानसभा मतदारसंघात ट्विस्ट येणार, ठाकरे गटाच्या उमेदवाराला मनसेचा पाठींबा?

Maharashtra Assembly Elections 2024 : शिंदे गटाच्या भूमिकेमुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अंबरनाथमध्ये थेट ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठींबा जाहीर केलाय. 

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून (Kalyan Rural Assembly Constituency) मनसेचे (MNS) विद्यमान आमदार राजू पाटील (Raju Patil) यांना राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. राजू पाटील यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) सुभाष भोईर यांना उमेदवारी दिली आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सुरुवातीला मनसे विरुद्ध ठाकरे गट अशी लढत होणार होती. मात्र, शिवसेना शिंदे गटाने या जागेवर उमेदवार दिल्यामुळे आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. शिंदे गटाच्या भूमिकेमुळे मनसेचे पदाधिकारी अंबरनाथमध्ये थेट ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठींबा जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. 

अंबरनाथमध्ये शिवसेना शिंदे गटाने आमदार बालाजी किणीकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात मनसेने उमेदवार दिलेला नाही. मात्र शिवसेना शिंदे गटाने कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात उमेदवार दिल्याने आता मनसेचे पदाधिकारी आक्रमक झाले असून ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठींबा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

मित्र म्हणून राजेश वानखेडे यांना मदत करणार : राजू पाटील

त्यातच मनसे आमदार राजू पाटील यांनी यांनी अंबरनाथमधील एका कार्यक्रमात बोलताना राजेश वानखेडे हे माझे मित्र आहेत. त्यात अंबरनाथमध्ये मनसेचा उमेदवारही नाही. त्यामुळे मित्र म्हणून राजेश वानखेडे यांना नक्की मदत करणार, असे वक्तव्य केले. तर अंबरनाथचे ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांनी मनसैनिक हे माझे मित्र असून ते मला मदत करतील, याची फक्त खात्रीच नव्हे, तर गॅरंटी आहे, असे म्हटल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

काय म्हणाले यशवंत किल्लेदार?

तर राजू पाटील यांच्या भूमिकेबाबत मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी म्हटले आहे की, राजू पाटील यांनी अंबरनाथ येथील उबाठा गटाचे उमेदवार राजेश वानखडे यांना जाहीर पाठिंबा दिलाय. त्याचं कारणच हे आहे की, त्या वेळेला केवळ आणि केवळ राज साहेबांचा आदेश म्हणून त्यांनी श्रीकांतला मदत केली होती. त्यांची इच्छा नसतानाही श्रीकांतला पूर्ण पाठिंबा दिला आणि आता राजू पाटील यांच्या विरोधातच एकनाथ शिंदे यांनी राजेश मोरे यांना उमेदवारी जाहीर केली. हा एक प्रकारचा अन्यायच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता मनसेच्या भूमिकेमुळे अंबरनाथमध्ये शिंदे गटाची अडचण वाढणार असल्याचे दिसून येत आहे. 

आणखी वाचा 

Sanjay Raut: प्रकाश आंबेडकरांनी ICU मधून भ्रम पसरवू नये, छातीवर ताण येईल अशी वक्तव्ये ICU मधून करु नयेत : संजय राऊत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एक-दोन नव्हे तर 11 खेळाडूंचा वाढदिवस, श्रेयस अय्यर कर्णधार, 'बर्थडे बॉईज'च्या प्लेइंग-इलेव्हनमध्ये कोण कोण?
एक-दोन नव्हे तर 11 खेळाडूंचा वाढदिवस, श्रेयस अय्यर कर्णधार, 'बर्थडे बॉईज'च्या प्लेइंग-इलेव्हनमध्ये कोण कोण?
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
निवडणुकीआधी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश, आता त्याच नेत्यानं गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
निवडणुकीआधी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश, आता त्याच नेत्यानं गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 06 December 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सCM N DCM at Chaitya Bhoomi : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमी येथे बाळासाहेबांना अभिवादनABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 06 December 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सPratap Sarnaik On Mahayuti : प्रताप सरनाईक मंत्रिपदासाठी इच्छूक! शिवसेनेला १४ मंत्रिपदांची अपेक्षा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक-दोन नव्हे तर 11 खेळाडूंचा वाढदिवस, श्रेयस अय्यर कर्णधार, 'बर्थडे बॉईज'च्या प्लेइंग-इलेव्हनमध्ये कोण कोण?
एक-दोन नव्हे तर 11 खेळाडूंचा वाढदिवस, श्रेयस अय्यर कर्णधार, 'बर्थडे बॉईज'च्या प्लेइंग-इलेव्हनमध्ये कोण कोण?
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
निवडणुकीआधी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश, आता त्याच नेत्यानं गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
निवडणुकीआधी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश, आता त्याच नेत्यानं गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
'पुष्पा 2: द रुल'मधला 'हा' क्लासी सीन कमावून देणार 2000 कोटी; VIDEO पाहून तुम्ही स्वतःला शिट्ट्या वाजवण्यापासून रोखू शकणार नाही
'पुष्पा 2: द रुल'मधला 'हा' क्लासी सीन कमावून देणार 2000 कोटी; VIDEO पाहून क्रेझी झाली ऑडियन्स
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
Embed widget