(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dindori Vidhan Sabha Election Result 2024 : दिंडोरीतून नरहरी झिरवाळांची विजयाची हॅटट्रिक, मोठ्या मताधिक्याने विजय, शरद पवार गटाचा पराभव
Dindori Vidhan Sabha Election Result 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर नरहरी झिरवाळ हे अजित पवारांच्या गटात दाखल झाले. अजित पवारांकडून नरहरी झिरवाळ यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले होते.
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल अखेर वाजले आहे. दिंडोरी विधानसभा मतदारसंघात (Dindori Assembly Constituency) राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांना तिसऱ्यांदा निवडणुकीसाठी तिकीट देण्यात आले. महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) राष्ट्रवादी शरद पवार गटाने सुनिता चारोस्कर यांना मैदानात उतरवले होते. दिंडोरीत कोण बाजी मारणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र नरहरी झिरवाळ या मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत.
नरहरी झिरवाळ- 1,38442
सुनीता चारोस्कर- 93910
सुशीला चारोस्कर- 9674
संतोष रेहरे- 4290
नरहरी झिरवाळ 44532 मतांनी विजयी
दिंडोरी (Dindori) विधानसभा मतदारसंघ हा पश्चिम भारतातील महाराष्ट्र राज्यातील २८८ विधानसभा (विधानसभा) मतदारसंघांपैकी एक आहे. हे अनुसूचित जमाती (ST) समुदायासाठी राखीव आहे. 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघात नरहरी झिरवाळ यांचा विजय झाला होता. विशेष म्हणजे 2014 मध्ये मोदी लाट असूनही ते निवडून आले होते. नरहरी झिरवाळ यांनी दिंडोरी मतदारसंघावर वर्चस्व प्रस्थापित केल्याने शरद पवारांकडून त्यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा संधी देण्यात आली. या निवडणुकीत त्यांना 1 लाख 24 हजार 520 मतं मिळाली होती. तर शिवसेनेने भास्कर गावित यांना तिकीट दिले होते. त्यांना 63 हजार 707 मतं मिळाली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर नरहरी झिरवाळ हे अजित पवारांच्या गटात दाखल झाले. अजित पवारांकडून नरहरी झिरवाळ यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले. तर महाविकास आघाडीकडून सुनिता चारोस्कर यांना संधी देण्यात आली होती.
दिंडोरीत महायुतीत मैत्रीपूर्ण लढत?
महायुतीकडून नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दिंडोरीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार धनराज महाले यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला होता. धनराज महाले हे शिवसेनेकडून दिंडोरी मतदार संघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र ही जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटल्याने धनराज महाले यांनी बंडखोरी केली. 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत धनराज महाले विरुद्ध नरहरी झिरवाळ असा सामना रंगला होता. या निवडणुकीत धनराज महाले विजयी झाले होते. धनराज महालेंना 68 हजार 569 मतं मिळाली तर राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवाळ यांना 68 हजार 420 मतं मिळाली होती. धनराज महाले या निवडणुकीत अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होते. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना शिवसेना शिंदे गटाचा एबी फॉर्म दिला होता. त्यामुळे आता महायुतीचे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता होती. मात्र धनराज महाले यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतली. आता दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून नरहरी झिरवाळ सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत.