एक्स्प्लोर

Chandrashekhar Bawankule : उमेदवारी अर्ज मागे न घेणाऱ्या बंडखोरांना भाजप प्रदेशाध्यक्षांचा थेट इशारा, गोपाळ शेट्टींबाबतही महत्त्वाचं वक्तव्य

Maharashtra Assembly Elections 2024 : जे उमेदवारी अर्ज परत घेणार नाही, त्यांना सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित केले जाईल, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलाय.

नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे बिगुल वाजल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Elections 2024) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अधिकृत उमेदवारांसह भाजपच्या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यामुळे भाजपचे (BJP) टेन्शन वाढल्याचे दिसून येत आहे. भाजपकडून बंडोबांना थंड करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. त्यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी बंडखोरांना थेट इशारा दिला आहे.  उमेदवारी अर्ज परत न घेणारे बंडखोर सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित होतील, असे त्यांनी म्हटले आहे. 

बावनकुळेंचा बंडखोरांना इशारा

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, 90 टक्क्यांपेक्षा जास्त बंडखोर उमेदवार त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतील, असा आम्हाला विश्वास आहे. मात्र जे उमेदवारी अर्ज परत घेणार नाही, त्यांना सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित केले जाईल. पुढील सहा वर्ष त्यांच्यासाठी पक्षाचे दारं बंद राहतील आणि कितीही प्रयत्न केले तरी निलंबन मागे होणार नाही, बंडखोरांना असा थेट इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.  

पक्षातील नेत्यांना भेटण्यात काहीच गैर नाही

आर्वी मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार व बंडखोरीची गर्जना करणारे दादाराव केचे यांची समजूत घालण्यासाठी भाजपने प्रथमच चार्टर्ड विमानाचा वापर केला. त्यांना थेट अहमदाबादला नेत केंद्रीयमंत्री अमित शहा यांची भेट घालवून देण्यात आली. यावरून बंडखोर शिरजोर झाले आहे का? ते पक्षश्रेष्ठींचा ऐकायला तयार नाहीत का? त्यामुळेच काहींना थेट अमित शाहांची भेट करून द्यावी लागत आहे का असा प्रश्न विचारल्यावर बावनकुळे म्हणाले की, दादाराव केचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी अमित शाह यांना भेटून आपला राजकीय प्रवास त्यांना सांगण्याची इच्छा व्यक्त केली होती. म्हणून त्यांची भेट अमित शहा यांच्यासोबत झाली. पक्षातील नेत्यांना भेटण्यात काहीच गैर नाही, असे बावनकुळे म्हटले आहे.

गोपाळ शेट्टी उमेदवारी अर्ज मागे घेतील

तर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि बोरीवली विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करणारे उमेदवार गोपाळ शेट्टी हे अपक्ष निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसत आहे.याबाबत देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. गोपाळ शेट्टी हे सुद्धा त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतील असा विश्वास असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. आता गोपाळ शेट्टी नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

आणखी वाचा 

फडणवीसांचा चेहरा पुढे केल्यास 5 ते 7 टक्के मतं कमी होतील, अमित शाहांना त्यांनाच मुख्यमंत्री करायचंय : रोहित पवार

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Embed widget