एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

देवेंद्र फडणवीसांनी त्यागाची भूमिका घेतली, आता मुख्यमंत्रीच व्हावेत, माजी सहकारमंत्र्यांची बॅटिंग

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यापूर्वी त्यागाची भूमिका घेतली होती. त्यामुळं आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची अपेक्षा असल्याचे मत भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केलं.

Subhash Deshmukh : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यापूर्वी त्यागाची भूमिका घेतली होती. त्यामुळं आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची अपेक्षा असल्याचे मत माजी सहकारमंत्री आणि भाजप आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी व्यक्त केलं. भाजप दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांचा लोकमंगल बँकेच्या ( Lokmangal Bank) वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. आमदार सुभाष देशमुख हे सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 72 हजार मताधिक्य घेऊन विजयी झाले आहेत.

मला मंत्रिपद मिळावं, अशी अपेक्षा नाही : सुभाष देशमुख

आमदार सुभाष देशमुख हे लोकमंगल बँकेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. दरम्यान देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते असून त्यांनी यापूर्वी त्यागाची भूमिका घेतली होती. मात्र, आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे. मला मंत्रिपद मिळावं, अशी अपेक्षा नाही, पक्ष सांगेल त्याप्रमाणे आम्ही करणारे कार्यकर्ते आहोत. देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देऊन त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते. त्यामुळं आम्ही पक्षादेश पाळणारी माणसं आहोत, मंत्रिपद दुय्यम आहे, असंही देशमुख म्हणाले.

कोण होणार महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) निकालानंतर मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेलं नाही. महायुतीतील घटक पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ सुरू आहे.  भाजपच्या काही नेत्यांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी पुन्हा एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्याचबरोबर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी अशी इच्छा देखील व्यक्त केली आहे. 

महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण असणार, ही निवडण्याची मोठी जबाबदारी राजनाथ सिंह यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव सर्वात पुढे आहे. आज संध्याकाळी दिल्लीत होणाऱ्या वरीष्ठ नेत्यांच्या बैठकीत नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. निवडणुकीत भाजपला मिळालेले मोठे यश आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मिळालेल्या यशानंतर भाजपच्या वरीष्ठ नेत्यांकडून शिक्कामोर्तब होणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

मुख्यमंत्री पदासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाची एकनाथ शिंदेंना साथ, तर मराठा महासंघाची देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PAN 2.0 : क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? जुनं पॅन कार्ड वैध राहणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? नव्या प्रकल्पाबाबतच्या प्रश्नांची उत्तरं
मोठी बातमी! महाआघाडीत बिघाडीची शक्यता; शिवसेना ठाकरेंच्या बैठकीत महापालिकेला स्वबळाची भाषा
मोठी बातमी! महाआघाडीत बिघाडीची शक्यता; शिवसेना ठाकरेंच्या बैठकीत महापालिकेला स्वबळाची भाषा
IND Vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Banner Ayodhya : अयोध्यावासीयोंकी हैं पुकार, शिंदेजी बने मुख्यमंत्री फिर एकबारRahul Gandhi on Adani | लाखो कोटींचा आरोपी, गौतम अदानींना अटक करा; राहुल गांधींची मागणीSudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर यांची ईव्हीएम फेर मतमोजणीची मागणीABP Majha Headlines :  12 PM : 27 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PAN 2.0 : क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? जुनं पॅन कार्ड वैध राहणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? नव्या प्रकल्पाबाबतच्या प्रश्नांची उत्तरं
मोठी बातमी! महाआघाडीत बिघाडीची शक्यता; शिवसेना ठाकरेंच्या बैठकीत महापालिकेला स्वबळाची भाषा
मोठी बातमी! महाआघाडीत बिघाडीची शक्यता; शिवसेना ठाकरेंच्या बैठकीत महापालिकेला स्वबळाची भाषा
IND Vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ लिस्ट, शेअरमध्ये तेजी, गुंतवणूकदार मालामाल 
एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ लिस्ट, शेअरमध्ये तेजी, गुंतवणूकदारांना दमदार परतावा
Shivsena Shinde Camp: नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले
नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Embed widget