Anil Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही आमदार संपर्कात, 4 महिन्यात रिझल्ट दिसेल, आश्चर्य वाटू देऊ नका, अनिल पाटील यांचा मोठा दावा
Anil Patil : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद अनिल पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार संपर्कात असल्याचं म्हटलं आहे.
मुंबई : अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीचे प्रतोद अनिल पाटील (Anil Patil) यांनी मोठा दावा केला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही आमदार संपर्कात असल्याचं अनिल पाटील यांनी म्हटलं आहे. अनिल पाटील यांच्या या दाव्यानं खळबळ उडाली आहे. लवकरच ते आमदार आमच्या सोबत आले तर आश्चर्य वाटायला नको, असं पाटील यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे 10 आमदार विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते.
अनिल पाटील यांनी एबीपी माझा सोबत बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्याच पक्षाचे नाही, काँग्रेसचे सुद्धा काही आमदार अस्वस्थ झालेले आहेत. शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अस्वस्थ झालेले आहेत. त्यातले काही लोकं आमच्याशी चर्चा करत आहेत, असं पाटील म्हणाले. तुम्हाला चार महिन्यानंतर याचे परिणाम दिसतील. कारण मतदारसंघाचा विकास हवा असेल तर सत्तेसोबत जाणं कधीही कुणाला बरं वाटतं. चार महिन्यामध्ये आश्चर्य वाटण्याचं कारण वाटणार नाही. शपथविधी आणि ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संपर्कात असलेल्या आमदारांबाबतीत चित्र स्पष्ट होईल, असं अनिल पाटील म्हणाले.
अनिल पाटील यांनी चार महिन्यात पाच ते सहा जण प्रवेश करु शकतात, असं सांगितलं. नाव कुणाचं घेऊन चालत नाही. रोहित पवार 18 जणांची नावं घेतली होती, त्यांनी नावं सांगितली नव्हती. शेवटी सत्तेचे समीकरण सर्वांना कुणालाही प्रिय असतं, आता जरी आम्ही त्यांना काही आग्रह करायला कुणाकडे जाणार नाही, असं अनिल पाटील म्हणाले. पुढच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून, लोकांची कामं करायची असतील, जनतेत विकासाचा मुद्दा घेऊन जायचं असेल तर लोकांमध्ये मतदारसंघात तर सत्ता असणं गरजेचं आहे. दारुण पराभव झालेला आहे हे स्पष्ट दिसतंय, पुढं भवितव्य काय राहील हे सांगता येणार नाही. बरेच मोठे धक्के तुम्हाला पाहायला मिळतील, असं अनिल पाटील म्हणाले.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद अनिल पाटील यांनी हा मोठा दावा केला आहे. या दाव्यानंतर राजकीय क्षेत्रातून काय प्रतिक्रिया येतात हे पाहावं लागेल.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार
जयंत पाटील - इस्लामपूर
जितेंद्र आव्हाड- कळबा मुंब्रा
बापूसाहेब पठारे- वडगाव शेरी
नारायण पाटील- करमाळा
रोहित आर आर पाटील- तासगाव कवठेमहाकाळ
संदीप क्षीरसागर -बीड
माळशिरस- उत्तमराव जानकर
मोहोळ - राजू खरे
अभिजीत पाटील-माढा
रोहित पवार- कर्जत जामखेड
इतर बातम्या :
Vidhan Sabha Election Results 2024 : महाराष्ट्राचे नवे 288 आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा