Yavatmal Vidhan Sabha Election :भाजपच्या मदन येरावार यांचा पराभव, काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर विजयी
Yavatmal Assembly Election 2024 : यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे बाळासाहेब मांगळुकर विजयी झाले आहेत.
Yavatmal Assembly Election 2024 यवतमाळ : महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या यवमताळ जिल्ह्यात विधानसभेचे 7 मतदारसंघ आहेत. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसनं या ठिकाणी अनिल उर्फ बाळासाहेब शंकरराव मांगुळकर यांना उमेदवारी दिली होती. बाळासाहेब मांगुळकर यांनी भाजपचे विद्यमान आमदार मदन येरावार यांचा पराभव केला आहे. बाळासाहेब मांगुळकर यांना 117504 मतं मिळाली आहेत. भाजपच्या मदन येरावार यांना 106123 मतं मिळाली. बाळासाहेब मांगुळकर यांनी 11381 हजार मतांनी विजय मिळवला आहे.
मदन येरावार- बाळासाहेब मांगुळकर पुन्हा आमने सामने
यवतमाळ जिल्ह्याचं मुख्यालय असलेला यवतमाळ विधानसभा मतदारसंघ आहे.1999 पासून कधी काँग्रेस तर कधी भाजप यांच्या ताब्यात होता. 2014 आणि 2019 मध्ये या ठिकाणी दोन वेळा सातत्याने भाजपचे मदन येरावार यांनी मतदारसंघाचं नेतृत्व कले. यावेळी भाजपच्या दुसऱ्या गटाने या मतदार संघ मदन येरावार यांना संधी न देता राजेंद्र डांगे यांना उमेदवारी मिळावी यासाठी मोठी मोर्चे बांधणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून माजी आमदार संदीप बाजुरे यांनी सुद्धा हा मतदार संघ तुतारीला सुटावा यासाठी प्रयत्न केले होते. वंचितचे डॉ. निरज वाघमारे आणि प्रहारचे बिपिन चौधरी सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात होते.
2019 मध्ये काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर यांचा केवळ 2200 मतांनी पराभव झाला होते. यवतमाळच्या मतदारांनी मदन येरावार यांच्याऐवजी बाळासाहेब मांगुळकर यांना आमदार म्हणून संधी दिली.
लोकसभेला काय घडलं?
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून राजश्री पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजय देशमुख निवडणूक लढवत होते. संजय देशमुख यांना 99869 मतं मिळाली होती. तर, राजश्री पाटील यांना 97331 मतं मिळाली होती. म्हणजेच महायुती आणि मविआमध्ये कांटे की टक्कर लोकसभेला या मतदारसंघात पाहायला मिळाली.
यवतमाळमध्ये कोण कोण निवडणूक लढतंय
अनिल उर्फ बाळासाहेब मांगुळकर - काँग्रेस
भाई अमन- बहुजन समाज पार्टी
मदन येरावार - भाजप
बिपीन चौधरी - प्रहार जनशक्ती पार्टी
धरम दिलीपसिंग ठाकूर- राष्ट्रीय समाज पक्ष
डॉ. निरज वाघमारे - वंचित बहुजन आघाडी
शब्बीर खान रहेमान खान- इंडियन नॅशनल लीग
अमरदीप आनंद वानखेडे - अपक्ष
अमोल कोमावार- अपक्ष
गजानन आडे -अपक्ष
देशा बंजारा- अपक्ष
नंदू घुगे- अपक्ष
प्रशांत ठमके- अपक्ष
बाळासाहेब गावंडे - अपक्ष
मोहन भोयर - अपक्ष
मनोज गेडाम- अपक्ष
युवराज आडे- अपक्ष
सलीम सा सुलेमान शा- अपक्ष
साहेबराव विष्णू परडखे -अपक्ष
सुभाष कासार - अपक्ष
संदीप शिंदे - अपक्ष
इतर बातम्या :