Ahmednagar District Vidhan Sabha Election : साखर कारखानदारांच्या जिल्ह्यात कोण वरचढ ठरणार? नगरमधील 12 मतदारसंघांचे चित्र स्पष्ट
राज्याच्या राजकारणात महत्वाचा मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी अहमदनगर हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे.
Ahmednagar District Vidhan Sabha Election 2024 : राज्याच्या राजकारणात महत्वाचा मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी अहमदनगर हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्यात विधानसभेच्या 12 जागा आहेत. अहमदनगर जिल्ह्याला सात जिल्ह्यांच्या सीमांनी जोडले आहे. या मतदारसंघाच्या उत्तर-पूर्वेस औरंगाबाद जिल्हा, वायव्येस नाशिक जिल्हा, नैऋत्येस ठाणे व पुणे जिल्हा, दक्षिणेस सोलापूर,उस्मानाबाद जिल्हा व आग्नेयेस बीड जिल्हा आहे. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर प्रभाव पाडणारे बडे राजकारणी या जिल्ह्यात नेहमीच घडले आहेत. विठ्ठलराव विखे यांनी राज्यातील पहिला सहकारी साखर कारखाना नगर जिल्ह्यातील प्रवरा या ठिकाणी स्थापन केला. राज्यातील सर्वाधिक साखर कारखाने नगर जिल्ह्यातच आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी 6, काँग्रेस 2, भाजप 3, अपक्ष 1 जागा मिळाली होती. आता अहमदनगरमध्ये 2024 विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती
क्रमांक | विधानसभा मतदारसंघ | महायुती उमदेवार | महाविकास आघाडी | वंचित/अपक्ष/इतर | विजयी उमेदवार |
1 | अकोले | डॉ.किरण लहामटे (राष्ट्रवादी अजित) | अमित भांगरे (राष्ट्रवादी शरद पवार) | ||
2 | संगमनेर | अमोल खताळ (शिवसेना) | बाळासाहेब थोरात (काँग्रेस) | ||
3 | शिर्डी | राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) | - प्रभावती घोगरे (काँग्रेस) | ||
4 | कोपरगाव | आशुतोष काळे (राष्ट्रवादी अजित पवार) | संदीप वर्पे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) | ||
5 | श्रीरामपूर | भाऊसाहेब कांबळे (शिवसेना) | हेमंत ओगले (काँग्रेस) | ||
6 | नेवासा | विठ्ठलराव पाटील (शिवसेना) | शंकरराव गडाख (शिवसेना उद्धव ठाकरे) | ||
7 | शेवगाव | मोनिका राजीव राजळे (भाजप) | प्रताप ढाकणे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) | ||
8 | राहुरी | शिवाजीराव भानुदा कर्डिले (भाजप) | प्रचिन तनपुरे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) | ||
9 | पारनेर | काशिनाथ महादू दाते (राष्ट्रवादी अजित पवार) | राणी नीलेश लंके (राष्ट्रवादी शरद पवार) | ||
10 | अहमदनगर शहर | संग्राम जगताप (राष्ट्रवादी अजित पवार) | अभिषेक कळमकर (राष्ट्रवादी शरद पवार) | ||
11 | श्रीगोंदा | प्रतिभा पाचपुते (भाजप) | अनुराधा राजेंद्र नागवडे (शिवसेना उद्धव ठाकरे) | ||
12 | कर्जत जामखेड | राम शिंदे (भाजप) | रोहित पवार (राष्ट्रवादी शरद पवार) |
अहमदनगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती
अकोले विधानसभा -
डॉ.किरण लहामटे (राष्ट्रवादी अजित)- अमित भांगरे (राष्ट्रवादी शरद पवार)
संगमनेर विधानसभा -
अमोल खताळ (शिवसेना) - बाळासाहेब थोरात (काँग्रेस)
शिर्डी विधानसभा -
राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) - प्रभावती घोगरे (काँग्रेस)
कोपरगाव विधानसभा -
आशुतोष काळे (राष्ट्रवादी अजित पवार) संदीप वर्पे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
श्रीरामपूर विधानसभा -
भाऊसाहेब कांबळे (शिवसेना)- हेमंत ओगले (काँग्रेस)
नेवासा विधानसभा -
विठ्ठलराव पाटील (शिवसेना) शंकरराव गडाख (शिवसेना उद्धव ठाकरे)
शेवगाव विधानसभा -
मोनिका राजीव राजळे (भाजप) प्रताप ढाकणे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
राहुरी विधानसभा -
शिवाजीराव भानुदा कर्डिले (भाजप) प्रचिन तनपुरे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
पारनेर विधानसभा -
काशिनाथ महादू दाते (राष्ट्रवादी अजित पवार) राणी नीलेश लंके (राष्ट्रवादी शरद पवार)
अहमदनगर शहर विधानसभा -
संग्राम जगताप (राष्ट्रवादी अजित पवार) अभिषेक कळमकर (राष्ट्रवादी शरद पवार)
श्रीगोंदा विधानसभा -
प्रतिभा पाचपुते (भाजप) - अनुराधा राजेंद्र नागवडे (शिवसेना उद्धव ठाकरे)
कर्जत जामखेड विधानसभा -
राम शिंदे (भाजप) - रोहित पवार (राष्ट्रवादी शरद पवार)