एक्स्प्लोर

Kasba Peth Assembly Election: भाजप आपला गड परत मिळवणार? कसबा विधानसभा मतदारसंघात कुणाचं पारडं जड? बंडखोरीचा फटका कोणाला बसणार?

Kasba Peth Assembly Election: 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मुक्ता शैलेश टिळक यांनी कसबा पेठ मतदारसंघातून 75,492 मतांनी विजय मिळवला होता.

Kasba Peth Assembly Election: कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघाचा एक विभाग आहे. हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जात होता, कारण ते 1995 ते 2019 पर्यंत भाजपचे आमदार जिंकत आले आहेत.मात्र, 2023 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत जनतेने काँग्रेसनेते रवींद्र धंगेकर यांना निवडून दिलं होतं. कसबा पेठ ही पाचव्या शतकात स्थापन झालेली पहिली पेठ होती आणि पुण्यातील सर्वात जुनी पेठ आहे. याला पुणे शहराचे हृदय असंही म्हटलं जातं. 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मुक्ता शैलेश टिळक यांनी कसबा पेठ मतदारसंघातून 75,492 मतांनी विजय मिळवला होता. मात्र, त्यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक पार पडली त्यामध्ये काँग्रेसने विजय मिळवला, त्यानंतर आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पुन्हा मोठी तयारी केली आहे. 

पोटनिवडणुकीनंतरची मतदारसंघातील परिस्थिती

कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर हे विद्यमान आमदार आहेत.रविंद्र धंगेकरांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील त्यांचं नशीब आजमावलं होतं, पण ते लोकसभा हरले. लोकसभेत भाजपचे मुरलीधर मोहोळ यांचा विजय झाला. त्यानंतर पुन्हा एकदा धंगेकरांनी विधानसभेची तयारी सुरू केली. या विधानसभा निवडणुकीमध्ये कसबा मतदारसंघातील जनता कोणाच्या पारड्यात आपली मते टाकते, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.  

कसबा विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीतच मुख्य लढत होणार असल्याने प्रामुख्याने काँग्रेस आणि भाजप यांचे प्रतिष्ठा पुन्हा एकदा पणाला लागली आहे. 25 वर्षांनंतर कसबा विधानसभा मतदारसंघ हातातून गेला तो काँग्रेसकडे, तो पुन्हा मिळवण्यासाठी भाजपने मोठी तयारी केली आहे. पोडनिवडणुकीला देखील आणि आताही भाजपकडून पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने हे उमेदवार आहेत. या वेळी पुन्हा रासने यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर, काँग्रेसकडून विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसच्या माजी महापौर कमल व्यवहारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे.त्यामुळे मतांचा काही प्रमाणात फटका धंगेकरांना बसणार असल्याची शक्यता आहे, धंगेकरांची मते काही प्रमाणात कमी होणार असली, त्यासोबतच मनसेचे गणेश भोकरे हे देखील निवडणुकीच्या मैदानात आहेत. तरी प्रत्यक्षात दुरंगी लढत ही धंगेकर आणि रासने यांच्यात होणार आहे. 

उमेदवारी कोणाला?

महाविकास आघाडी - काँग्रेस - रविंद्र धंगेकर
महायुती- भाजप- हेमंत रासने 
मनसे - गणेश भोकरे
अपक्ष - कमल व्यवहारे

पोटनिवडणुकीचा निकाल 

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले होते. चुरशीच्या आणि प्रतिष्ठेची ठरलेल्या या निवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर 11 हजार 40 मतांनी विजयी ठरले होते. 

2019 चा निकाल?

2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप नेत्या मुक्ता शैलेश टिळक यांना 75,406 इतकी मते होती, तर काँग्रेस नेते अरविंद शिंदे यांना 47,240 इतकी मते मिळाली होती. या निवडणुकीमध्ये मुक्ता टिळक विजयी ठरल्या, मात्र, त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने भाजपला बालेकिल्ला मिळवला होता. या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :18 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 02 PM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Speech Shivdi : उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? शिवडीत राज ठाकरेंचा हल्लाबोलBala Nandgaonkar Full Speech : भर उन्हात बसून राज ठाकरेंनी ऐकलं बाळा नांदगावकर यांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
Sanjay Raut: 23 तारखेनंतर फडणवीस-शिंदेंना पोलीस ठाण्यात हेलपाटे मारावे लागतील, दयामाया दाखवणार नाही: संजय राऊत
23 तारखेनंतर देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंचा वेळ पोलीस ठाण्यात हेलपाटे घालण्यात जाईल: संजय राऊत
Sanjay Raut : संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
Vidhan Sabha 2024 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? कुंडली पाहून ज्योतिषाचार्यांनी भविष्य सांगितलं
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? ज्योतिषाचार्यांचं भाकित
Embed widget