के पी पाटील थेट मातोश्रीवर, प्रकाश आबिटकरांविरोधात उद्धव ठाकरेंचा प्लॅन काय?
Radhanagari Vidhan Sabha : के पी पाटील हे शरद पवार गटात आहेत. मात्र राधानगरीची जागा उद्धव ठाकरे गटाकडे असल्यामुळे ते मातोश्रीवर गेले आहेत. के पी पाटील यांचेच मेहुणे ए वाय पाटील देखील राधानगरी मतदार संघामधून इच्छुक आहेत.
मुंबई : कोल्हापूरचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) माजी आमदार के पी पाटील (K P Patil Radhanagari) हे मातोश्रीवर पोहोचले. के पी पाटील हे राधानगरी विधानसभा मतदारसंघातून (Radhanagari Bhudargad Vidhan Sabha Election) इच्छुक आहेत. विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर (Prakash Aabitkar) हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असल्याने, हा मतदारसंघ मविआत ठाकरे गटाच्या वाट्याला जाणार आहे. त्यामुळं इथून के पी पाटील आणि त्यांचे कट्टर विरोध आणि सख्खे मेहुणे पाहुणे ए वाय पाटील हे दोघेजण ठाकरे गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
के पी पाटील हे शरद पवार गटात आहेत. मात्र राधानगरीची जागा उद्धव ठाकरे गटाकडे असल्यामुळे ते मातोश्रीवर गेले आहेत. के पी पाटील यांचेच मेहुणे ए वाय पाटील देखील राधानगरी मतदार संघामधून इच्छुक आहेत. ते देखील शरद पवार गटामध्ये आहेत, मात्र या मेहुणे पाहुणे यांच्यामध्ये राजकीय वाद आहेत.
प्रकाश आबिटकर यांच्याविरुद्ध ठाकरेंचा काय प्लॅन?
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राधानगरी भुदरगड मतदारसंघात सभा झाली होती. लाडकी बहीण योजनेच्या या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आबिटकर यांना निवडून द्या, मंत्री करतो असा शब्द दिला होता. मात्र प्रकाश आबिटकर यांना घेरण्यासाठी उद्धव ठाकरे आता कोणता प्लॅन आखतात याबाबत या मतदारसंघात चर्चा उत्सुकता आहे.
उद्धव ठाकरे यांच्याकडे ही जागा असल्याने के पी पाटील जे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार आहेत, ते इथून उत्सुक आहेत. याशिवाय ए वाय पाटील हे सुद्धा इथूनच निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे या दोघांपैकी एकाला उमेदवारी देतात की नवा उमेदवार मैदानात उतरणावर याबाबत उत्सुकता आहे.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघासाठी महाडिक उत्सुक
दरम्यान, एकीकडे राधानगरीबाबत उत्सुकता असताना, तिकडे भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) हे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून लेकाला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजपकडून अमल महाडिकांना उमदेवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर
आता कोल्हापूर उत्तर मतदारसंघासाठीही महाडिक उत्सुक आहेत. मुलगा कृष्णराजसाठी धनंजय महाडिक फिल्डिंग लावत आहेत. त्यासाठी धनंजय महाडिकांकडून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेटीगाठी सुरु आहेत. महायुतीत कोल्हापूर उत्तरची जागा शिवसेनेकडे आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत लेकाचा प्रवेश करुन त्याला कोल्हापूर उत्तरमधून उमदेवारी मिळावी