एक्स्प्लोर

मोठी बातमी! निवडणुकीच्या आखाड्यात MIM चा मोठा निर्णय, 'आता सगळं संपलं' म्हणत जलील यांनी थेट भूमिका केली जाहीर

केल्या काही दिवसांपासून एमआयएम पक्षाकडून महाविकास आघाडीसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला जात होता. आता मात्र या पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे.

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024) उमेदवारी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांत बहुसंख्य जागांचे वाटप झाले आहे. काही जागांचा प्रश्न अद्याप प्रलंबितच आहे. मात्र त्यावरही लवकरच तोडगा निघेल, अशी आशा दोन्ही आघाड्यांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राज्यात अल्पसंख्याकांचा पाठींबा असलेल्या एमआयएम या पक्षाकडून महाविकास आघाडीसोबत जागावाटपाचा प्रयत्न चालू होता. मात्र आता हा पक्ष या निवडणुकीत 'एकला चलो रे' अशी भूमिका घेण्याची शक्यता आहे. कारण तसे सूतोवाचच एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केले आहे. आता सगळं संपलं आहे. आमची यादी तयार आहे, असं त्यांनी म्हटलंय.

चर्चा केली, पत्र लिहिले

"आता सगळं संपलं आहे. महाविकास आघाडीसोबत चर्चा केली, पत्र लिहले. पण आता आमचे जिथे विद्यमान आमदार आहेत, तिथे महाविकास आघाडीने उमेदवार दिले आहेत. आमचीदेखील यादी तयार आहे. काँग्रेसचे नाना पटोले, अमित देशमुख यांच्यासोबत चर्चा झाली होती. युती असल्याने आम्ही चर्चा करू असे ते म्हणाले होते," अशी माहिती जलील यांनी दिली. 

नाना पटोले यांच्यासोबत चर्चा झाली होती

तसेच चर्चेचा काही फायदा झाला नाही. मला सुप्रिया सुळे यांचा फोन आला होता. शिवसेनेच्या नेत्यांसोबत बोललो होतो. शिवसेनेच्या ज्या नेत्याशी चर्चा झाली, त्याचं नाव जाहीर करणार नाही. शिवसेनेकडून आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही. नाना पटोले यांच्यासोबत चर्चा झाली होती. वरळीच्या एका हॉटेलमध्ये आमची भेट झाली होती. मी लोकसभा लढणार म्हटल्यावर सर्व जागे झाले. थेट ओवैसी यांना फोन करण्यात आला. दिल्लीतील नेते थेट ओवैसी यांच्या संपर्कात होते. मी तीन वेळा महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटलो, अशीही माहिती जलील यांनी दिली.

आम्ही 15 जागा मागितल्या होत्या

ज्या ठिकाणी आम्ही चांगली कामगिरी केलेली आहे, त्याच जागा आम्ही मागत आहोत. भिविंडी, मालेगाव, मुंब्रा यासारख्या जागा मागितल्या होत्या. आम्ही 15 पेक्षा कमी जागा मागितल्या होत्या. ते किती जागा द्यायला तयार आहेत, याबाबत त्यांनी आम्हाला सांगायला हवे होते. आमच्या उमेदवाराविरोधात त्यांनी मुस्लीम उमेदवार दिले आहे, अशी खदखदही जलील यांनी बोलून दाखवली. 

ओवैसी यांच्या आदेशाची वाट पाहात आहे

काही दिवासांपूर्वी एमआयएमची जरांगे यांच्यासोबतही चर्चा झाली होती. याबाबत बोलताना जरांगे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली होती. एका जातीला सोबत घेऊन जाणार नाही, असे ते म्हणाले होते. जिथे आम्ही जिंकणार आहोत त्या ठिकाणी उमेदवार देणार आहोत. मी ओवैसी यांच्या आदेशाची वाट पाहात आहे. ओवैसी यांची टीम सर्वेक्षण करत असून ते सांगतील त्या जागा आम्ही लवढवणार आहोत, अशी माहिती जलील यांनी दिली. 

हेही वाचा :

Video: सुजय विखेचं ढोंग सगळ्यांना माहितीय; संयमी बाप संतापला, बाळासाहेब थोरातांनी टाळ्या वाजवणाऱ्यांनाही सुनावलं

रविकांत तुपकरांचा मोठा निर्णय, विधानसभा निवडणुकीत 'या' उमेदवारांना देणार पाठिंबा, मविआला देणार धक्का

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Embed widget