देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक PA निवडणुकीच्या रिंगणात; आर्वीतून भाजपच्या विद्यमान आमदाराचा पत्ता कट
आर्वीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट असा सामना होण्याची शक्यता असतांना विधमान आमदार दादाराव केचे यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे अपक्ष नामांकन दाखल केले आहे.
वर्धा : वर्धा (Wardha) जिल्ह्यात बहुचर्चेत राहिलेल्या आर्वी मतदार संघात भाजपने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे खाजगी पी ए सुमित वानखेडे (Sumit Wankhede) यांना आर्वीतून तिकीट दिले. सुमित वानखेडे यांनी नामांकन अर्ज दाखल करत मंगळवारी मोठे शक्तिप्रदर्शन आर्वी शहरात केले. भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ या नामांकन रॅलीमध्ये उपस्थित होत्या. बंडखोरी केलेल्या दादाराव केचेंवर पक्षश्रेष्ठी योग्य ती कारवाई करणार असल्याचे सांगितले.
आर्वीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट असा सामना होण्याची शक्यता असतांना विधमान आमदार दादाराव केचे यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे अपक्ष नामांकन दाखल केले आहे. त्यामुळे या मतदार संघात कोण बाजी मारते हे पाहणे महत्वाचे आहे.फडणवीसांचे अत्यंत विश्वासू म्हणून वानखेडे ओळखले जातात. सुमीत वानखेडे यांच्या उमेदवारीने जल्लोष असला तरी दुसरीकडे केचे यांच्या बंडखोरीमुळे विजयबाबत संघर्ष करवा लागणार आहे, अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
भाजपच्या विद्यमान आमदाराचा पत्ता कट
आर्वी मतदार संघात विद्यमान आमदार दादाराव केचे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपने दादाराव केचे यांना उमेदवारी नाकारल्याने दादाराव केचे अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. भाजपात आर्वी येथील उमेदवारी नेमकी कुणाला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दादाराव केचे यांनी उमेदवारी दाखल करेपर्यंत आर्वी येथील उमेदवार घोषित करण्यात आला नव्हता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे यांना येथे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दादाराव केचे भाजपचे आर्वीचे विद्यमान आमदार असून अर्ज कायम ठेवणार की बंडखोरी करणार यावर लक्ष लागले आहे.
कोण आहेत सुमीत वानखेडे?
वानखेडे हे मूळचे वर्धा जिल्ह्याच्या आर्वी मतदारसंघातील आहेत. 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत इच्छुकांच्या यादीत त्यांचे नाव झळकले होते. वानखेडे यांच्याकडे वर्धा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी पद देखील सोपवले होते.
आतापर्यंत हे सचिव झाले आमदार
नेत्यांचे स्वीय सचिव निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची ही पहिली वेळ नाही. या अगोदर देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सचिव राहिलेले अभिमन्यू पवार हे निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. यंदाच्या सलग दुसऱ्यांदा ते लातूरमधील औसा या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. तसेच उद्धव ठाकरेंचे सचिव मिलिंद नार्वेकर हे देखील आमदार आहेत.
हे ही वाचा :
Shrinivas Vanga: मोठी बातमी: 36 तास नॉट रिचेबल श्रीनिवास वनगा अखेर परतले, पण काही मिनिटं घरी थांबून पुन्हा घराबाहेर पडले