Maharashtra Assembly Election 2024: आष्टी विधानसभा मतदारसंघात जोरदार राडा, सुरेश धस समर्थक अन् शरद पवार गटाचे कार्यकर्ते आपसात भिडले
Ashti Assembly Constituency : भाजपचे उमेदवार सुरेस धस यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार महबूब शेख यांच्या समर्थकांमध्ये काही कारणावरून आष्टी विधानसभा मतदारसंघात राडा झालाय.
Ashti Assembly Constituency : बीड जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे. दरम्यान, परळी विधानसभा मतदारसंघ वगळता पाचही मतदार संघामध्ये सुरळीतपणे मतदान प्रक्रिया दुपारपर्यंत पार पडली. मात्र याला अपवाद ठरले आष्टी (Ashti) विधानसभा मतदारसंघातील पाटोदा तालुक्यातील बेदरवाडी गाव. कारण या ठिकाणी भाजपचे उमेदवार सुरेस धस (Suresh Dhas) यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) उमेदवार महबूब शेख यांच्या समर्थकांमध्ये काही कारणावरून बाचाबाची झाली. मात्रे संपूर्ण प्रकरण हाणामारीमध्ये गेले. यात सुरेश धस समर्थकांना महबूब शेख यांच्या समर्थकांकडून मारहाण करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे परिसरात काही काळ ताणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सुरेश धस समर्थक अन् शरद पवार गटाचे कार्यकर्ते आपसात भिडले
आष्टी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी त्यांच्या मूळ गावी जामगाव या ठिकाणी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. तर बीड जिल्ह्यातील आष्टी या एकमेव मतदार संघात महायुतीतील दोन पक्षात मैत्रीपूर्ण लढत होत आहे. या ठिकाणी भाजपकडून सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून बाळासाहेब आजबे हे निवडणूक लढवत आहेत. बीड जिल्ह्यातील 6 मतदारसंघाच चुरशीच्या लढती होत असून महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना आहे. मात्र, आष्टी (Ashti) मतदारसंघात महायुतीचे दोन उमेदवार रिंगणात आहेत. येथे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी मेहबूब शेख यांना देण्यात आली आहे.
तर, महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून सुरेस धस (Suresh Dhas) यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र, विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांनीही शड्डू ठोकल्याने मतदारसंघात चौरंगी लढत होत आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघात कोण विजयी होणार, याची चर्चा जिल्ह्यासह राज्यात आहे. त्यातच, मनोज जरांगेंनी घेतलेल्या भूमिकेचा नेमका फायदा कोणाला होणार, आष्टीकर कोणाला पाडणार हेही लवकरच स्पष्ट होईल. असे असताना आज ऐन निवडणुकीची रणधुमाळी रंगली असताना भाजपचे उमेदवार सुरेश धस समर्थक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार महेबुब शेख यांचे समर्थकांमध्ये घडला आहे.
हे ही वाचा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI