एक्स्प्लोर

पिंपरी विधानसभा मतदारसंघ | शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे इच्छुकांची गर्दी

लोकसभेतील मतं पाहून वंचित बहुजन आघाडी येत्या विधानसभेत पिंपरी काबीज करण्याच्या इराद्यात आहे. म्हणूनच प्रकाश आंबेडकर इथून त्यांचा मुलगा सुजतला विधानसभेत पाठवण्यासाठी चाचपणी करत आहेत. सुजत येथून नशीब अजमावणार असेल तर त्यांचा सामना विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांच्याशी होईल, असं तरी सध्या दिसत आहे.

पुणे : पिंपरी विधानसभा हा राखीव मतदारसंघ. गेल्या विधानसभेत गौतम चाबुकस्वार इथून आमदार झाल्याने या मतदार संघावर शिवसेनेचा दावा आहे. असं असलं तरी येथे सर्वच पक्षातून इच्छुकांनी शंख फुंकले आहेत. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर, आरपीआय (A) गटाचे अध्यक्ष रामदास आठवले आणि भाजप खासदार अमर साबळे यांच्याकडून चाचपणी सुरु आहे. 2009 सालच्या पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ स्थापन झाला. पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे तर दुसऱ्या म्हणजे 2014 च्या विधानसभेत शिवसेनेच्या गौतम चाबुकस्वार यांनी आमदार पदाची खुर्ची मिळवली. 2014 ची महानगरपालिका निवडणूक आणि नुकतीच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर येथील चित्र आता पालटलेलं दिसत आहे. म्हणूनच वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर हे त्यांचा मुलगा सुजतला विधानसभेत पाठवण्यासाठी इथे चाचपणी करत आहेत.

चिंचवड आणि भोसरी विधानसभेला विभागणारा, तुलनेने सर्वात लहान आणि जुना पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी असा 12 किलोमीटरमध्ये दुतर्फा पसरलेला असा हा पिंपरी विधानसभा मतदारसंघ. महापालिका इमारत, नाशिक फाट्यावरील दुमजली पूल, जुना पुणे-मुंबई महामार्गावरील ग्रेड-सेप्रेटर, भक्ती-शक्ती समूहशिल्प असा बराच विकसित भाग या मतदारसंघात येतो. पिंपरी चिंचवड शहरात एकूण 72 झोपडपट्ट्या आहेत, यापैकी 50 च्या आसापास याच मतदारसंघात येतात. त्यामुळेच मुस्लीम-दलित बहुल, झोपडपट्टी मिश्रित आणि तितकाच स्थानिकांचा ही प्रभाव असणारा हा मतदारसंघ आहे.

पिंपरी विधानसभेतील मतदारांनी मावळ लोकसभा 2009 च्या निवडणुकीत शिवसेना अर्थात युतीचे उमेदवार गजानन बाबर यांना मताधिक्य दिलं, ते खासदारही झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार स्थानिक असताना देखील मतदारांनी त्यांना नाकारलं. त्यामुळे 2009 च्या पिंपरी विधानसभेत युतीचा उमेदवार आमदार होईल, असं अपेक्षित असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अण्णा बनसोडेंच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली आणि युतीचे उमेदवार अमर साबळे यांना पराभव चाखावा लागला. 2012 साली पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक ही झाली. यात पिंपरी विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बहुसंख्येने निवडून आले. त्यामुळे लोकसभेला युतीच्या पारड्यात मतं दिलेला मतदार विधानसभा आणि महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने झुकला.

महापालिकेतील सत्तेच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेसने शहरात विकासाचं बीज रोवलं आणि पिंपरी चिंचवडचा चेहरा-मोहरा बदलला. हा विकास राष्ट्रवादी काँग्रेसला 2014 लोकसभा निवडणुकीत तारेल, अशी अपेक्षा होती. पण त्यावेळी ही 2009 ची पुनरावृत्ती झाली आणि पिंपरी विधानसभेने पुन्हा एकदा शिवसेना अर्थात युतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंना मताधिक्य मिळालं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने राहुल नार्वेकरना आयात केल्याने मतदारांनी नाकारलं असेल, असा अंदाज बांधण्यात आला. याचा परिणाम 2014 च्या पिंपरी विधानसभेवर होणारच नाही, अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसने बाळगत, विद्यमान आमदार अण्णा बनसोडेंना तिकीट दिलं. जशी आघाडीत बिघाडी झाली तशीच युतीत फूट झाली अन सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार रिंगणात उतरवले. त्यामुळे मतदार कुणाच्या बाजूने झुकेल याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. आमदार झाल्यापासून मतदारांना गृहीत धरणाऱ्या बनसोडेंना अपेक्षेप्रमाणे मतदारांनी सपशेल नाकारलं आणि निवडणुकीच्या आधीच काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेल्या गौतम चाबुकस्वार यांना मतदारांनी आमदारकीची खुर्ची दिली.

लोकसभा आणि विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसला बालेकिल्ल्यात लागलेला सुरुंग, 2017 च्या महापालिका निवडणुकीत ही कायम राहिला. या धक्क्यातून सावरण्यासाठी 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी खेळी खेळली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पिंपरी चिंचवड शहरावर अनेक वर्ष दबदबा राखणारे अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनाच रिंगणात उतरवण्यात आलं. पार्थच्या रुपाने शिवसेना अर्थात युतीला मोठा धक्का देण्याचा डाव राष्ट्रवादी काँग्रेसने आखला. यासाठी पिंपरी विधानसभेतून मोठं मताधिक्य मिळेल अशी आशा ते बाळगून होते. मात्र पार्थ पवार 41 हजार 294 मतांनी पिछाडीवर राहिले. त्यामानाने वंचित बहुजन आघाडीचे राजाराम पाटील यांना 17 हजार 794 मतं घेऊन छाप पाडली.

लोकसभेतील मतं पाहून वंचित बहुजन आघाडी येत्या विधानसभेत पिंपरी काबीज करण्याच्या इराद्यात आहे. म्हणूनच प्रकाश आंबेडकर इथून त्यांचा मुलगा सुजतला विधानसभेत पाठवण्यासाठी चाचपणी करत आहेत. सुजत येथून नशीब अजमावणार असेल तर त्यांचा सामना विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांच्याशी होईल, असं तरी सध्या दिसत आहे. ते सध्या जोमाने तयारीला लागले आहेत. पण त्यांना तिकीट मिळेल का? यावर अनेकांना शंका आहे. म्हणूनच चाबुकस्वार राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर राष्ट्रवादीचे माजी आमदार अण्णा बनसोडे शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळेच शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे इच्छुकांची गर्दी आहे. युती असल्यास शिवसेना तर आघाडी झाल्यास राष्ट्रवादीला ही जागा मिळेल असंच काहीसं सध्या चित्र आहे. पण दुसरीकडे शहरात भाजपची ताकद वाढल्याने ते तर झोपडपट्टीचा भाग अधिक असल्याने काँग्रेस आणि आरपीआय असं तिघे ही या जागेवर दावा करत आहे. भाजपकडून खासदार अमर साबळेंसह अनेकांनी षड्डू ठोकलेत आणि आरपीआय देखील यात मागे राहिलेली नाही. त्यामुळे सर्वच पक्षांसमोर निवडणुकीपूर्वी उमेदवारीचा गुंथा सोडवण्याचं मोठं आवाहन असेल.

2009 लोकसभा निकालाचा विधानसभेवर परिणाम झाला नाही, पण 2014 च्या लोकसभा निवडणुकीत याची पुनरावृत्ती झाली नाही. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा विधानसभेवर कितपत प्रभाव पडतो हे निकालातून स्पष्ट होईल.

लोकसभा 20109 ला पिंपरी विधानसभेत पक्षनिहाय मिळालेली मतं

  • श्रीरंग बारणे (शिवसेना) - 1 लाख 3 हजार 235
  • पार्थ पवार (राष्ट्रवादी) - 61 हजार 941
  • राजाराम पाटील (वंचित बहुजन आघाडी) - 17 हजार 794
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special ReportZero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget