एक्स्प्लोर

मलबार हिल विधासभा मतदारसंघ : मंगलप्रभात लोढांना सहाव्यांदा तिकीट मिळणार की मुख्यमंत्री हायजॅक करणार?

मलबार हिल हा उच्चभ्रूंसह मध्यमवर्गीय मराठी मतदार असलेल्या मतदारसंघात भाजपकडून मंगलप्रभात लोढांनाच सहाव्यांदा तिकीट मिळणार का?, भाजपचा गड काँग्रेस भेदणार? लोकसभेप्रमाणे मुकेश अंबानी काँग्रेसला समर्थन देणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यावर आपल्याला मिळणार आहे

मुंबई : देशाच्या आर्थिक राजधानीतील उच्चभ्रू वस्तीचा, मोठे उद्योजक,  व्यापारी अशांचा भरणा असणारा मतदारसंघ म्हणजे मलबार हिल विधासभा मतदारसंघ क्र.184. या मतदारसंघात राजभवन, सह्याद्री अतिथीगृह , पेडर रोड, यांसारखे महत्त्वाचे भाग येतात त्यामुळेचं याला राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं स्वरुप प्राप्त झालं आहे.

मलबार हिल विधासभा मतदारसंघात 1995 पासून सलग पाच वेळा भाजपचे मंगलप्रभात लोढा निवडून येत आहेतं. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरसह मुंबईतूनदेखील निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यासाठी मलबार हिल मतदारसंघांची देखील निवडकेली जाऊ शकते अशा चर्चा मतदारसंघात ऐकायला मिळत आहे. त्यामुळेच मतदारसंघात विद्यमान आमदार मंगलप्रभात लोढा यांचा पत्ता कच होणार का अशा चर्चांना उधाण आलं आहे.

मुख्यमंत्री मलबार हिलमधून निवडणूक लढवणार?

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरसह मुंबईतूनदेखील निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. यासाठी मुंबईतील मतदारसंघांची चाचपणी पूर्ण झाली आहे. लवकरच त्याबद्दल निर्णय जाहीर केला जाईल.

देवेंद्र फडणवीस हे नागपूरमधून सलग चार वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. लोकसभेचे निकाल लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांसाठी दोन मतदारसंघ विचारात घेतले गेले आहेत. मलबार हिल आणि मुलुंड हे मतदारसंघ भाजपसाठी अत्यंत सुरक्षित मानले जात असून, यापैकी एका मतदारसंघाची निवड मुख्यमंत्री करतील, अशी चर्चा आहे.

मलबार हिल हा उच्चभ्रूंसह मध्यमवर्गीय मराठी मतदार असलेला मतदारसंघ आहे. मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. मुख्यमंत्र्यांनी या मतदारसंघातून लढायचे ठरवले, तर लोढा यांना लगतच्या कुलाबा मतदारसंघातून उमेदवारी मिळेल. तसे झाल्यास राज पुरोहित यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे.

काँग्रेसमधून हिरा देवासी इच्छुक

माजी खासदार मिलिंद देवरा यांचे निकटवर्ती आणि राजस्थान सेलचे मुंबई अध्यक्ष हिरा देवासी यंदा काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. हिरा देवासी यांना उमेदवारी दिल्यास मतदारसंघातील राजस्थानी समाजाची मते काँग्रेसला मिळू शकतात. तसेच देवरा यांचे निकटवर्ती असल्याने त्यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. पण काँग्रेसचे हिरा देवासी हे नाव मुळात मतदारांसाठी फारसं परिचयाचं नाही. त्यामुळे हिरा देवासी यांच्या उमेदवारीचा फायदा काँग्रेसला होणार का? हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

विधानसभेला मुकेश अंबानी मंगलप्रभात लोढांना विरोध करणार?

लोकसभा निवडणुकीत उद्योजक मुकेश अंबानी यांनी काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांना समर्थन केले होते. पण त्याचा फारसा फायदा देवरा यांना झालेला नाही. मतदाकसंघात मुकेश अंबानी आणि मंगलप्रभात लोढा याच्या वादाच्या जोरदार चर्चा आहे.  असे असल्यास मुकेश अंबानी आपली सर्व ताकद लोढांच्या विरोधात लावण्याची चिन्ह आहे. येणाऱ्या काळाच याचा फटका लोढांना बसतो का हे पाहणं औत्युक्याचं ठरेल.

मतदारसंघाचा इतिहास

मलबार हिल विधासभा हा सुरुवातीपासून खुला मतदारसंघ राहिला आहे. मराठी मतदार अधिक असलेल्या मतदारसंघात जात, मराठी अस्मिता यांसारखी समीकरणं कधी उपयोगी आली नाहीत. 1995 पासून मतदारसंघात मंगलप्रभात लोढा यांच्याशिवाय कोणतंही नेतृत्व तयार झालेलं नाही. 1995 साली बी. ए देसाई यांना हरवून पहिल्यांदा मंगलप्रभात लोढा आमदार झाले. 1995 पासून ते 2009 पर्यंत भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्यातच प्रमुख लढत पाहायला मिळाली. 2014 साली भाजप-शिवसेना यांच्यात काडीमोड झाल्यामुळे त्यावेळी फक्त भाजप विरुद्ध शिवसेना लढत पाहायला मिळाली. पण तरीही भाजपच्या मंगलप्रभात लोढा यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे.

मतदारसंघातील राजकीय परिस्थिती

मतदारसंघातील राजकीय परिस्थिती सांगायची झाली तर काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे हे पक्ष असून नसल्यासारखेच. मलबार हिल मतदारसंघ हा 1995 पासून फक्त भाजपचाच बालेकिल्ला राहिलेला आहे. मंगलप्रभात लोढा यांना टक्कर देण्यासाठी एकही नेता उरलेला नाही. काँग्रेसमधील राज श्रॉफ, शुशिबेन शाह, काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले राजकुमार बाफना यांपैकी कोणत्याच नेत्याला भाजपचा गड भेदता आला नाही.

शिवसेनेचा या मतदारसंघात पकड असली तरीदेखील 2014 विधासभेत त्याचा परिणाम जाणवला नाही. 2014 विधासभेला शिवसेना-भाजप स्वतंत्र लढले. यावेळी शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक अरुण दुधवडकर यांनी लोढा यांच्या विरोधात निवडणूक लढवली. पण 2014 ला देखील मंगलप्रभात लोढाच निवडून आले. यावरुनच मलबार हिल मतदासंघात सगळे विरोधक जरी एकत्र आले तरीदेखील भाजपला नमवणे शक्य नाही असेचं दिसते.

2014 विधानसभा निवडणुकीचा निकाल काय सांगतो

  • मंगलप्रभात लोढा (भाजप)  97,818
  • अरविंद दुधवडकर (शिवसेना) 29,132
  • शुशिबेन शाह (काँग्रेस) 10,928
  • राजेंद्र शिरोडकर  (मनसे) 3,925
  • नरेंद्र राणे (राष्ट्रवादी काँग्रेस) 1,111

मतदारसंघातील समस्या?

  • गिरगावातील चाळींच्या पुनर्वसनचा प्रश्न
  • शिमला हाऊस, ताडदेव तुळशीवाडी यांसारख्या झोपडपट्टीचं पुनर्वसन
  • धोकादायक इमारती
  • मेट्रोमुळे रस्त्यांवर निर्माण होणारे खड्डे
  • प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीची समस्या
  • पाणीपुरवठा

दरम्यान मलबार हिलमधील राजकीय परिस्थितीचा अभ्यास केल्यास भाजपला आपला बालेकिल्ला टिकवण्यास कोणतीही अडचण येणार नाही असेच दिसत आहे. विरोधकांना  भाजपला शह द्यायचा असल्यास आर्थिकदृष्ट्या तगडा स्थानिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवावा लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Embed widget