एक्स्प्लोर

लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघ | भाजपची विजयी घौडदौड रोखण्यात विरोधकांना यश मिळणार?

2014 साली झालेल्या निवडणूकीत शिवसेनेकडुन प्रताप पाटील आणी भाजपकडुन मुक्तेश्वर धोंडगे मैदानात होते. यावेळी 45 हजाराचा मताधिक्य घेत प्रताप पाटील विजयी झाले होते.

लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघ नांदेड जिल्ह्यातील एक महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. स्वातंत्र्यानंतर झालेल्या अनेक विधानसभा निवडणूकीत शेतकरी कामगार पक्ष विरुद्ध कॉंग्रेस अशीच लढाई या मतदारसंघात होत असे. एकेकाळी विधानभवन गाजवून सोडणारे भाई केशवराव धोंडगे यांचा मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे. 2004 साली या मतदारसंघात अपक्ष म्हणून प्रताप पाटील हे पहिल्यांदा निवडुन आले होते. तिथुन प्रताप पाटील यांच्या राजकिय कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्यानंतर 2009 साली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शंकरअण्णा धोंडगे हे विजयी झाले होते. धोंडगे यांनी प्रताप पाटील यांचा केवळ नऊ हजार मताने पराभव केला होता. त्यानंतर 2014 साली झालेल्या निवडणूकीत शिवसेनेकडुन प्रताप पाटील आणी भाजपकडुन मुक्तेश्वर धोंडगे मैदानात होते. यावेळी 45 हजाराचा मताधिक्य घेत प्रताप पाटील विजयी झाले होते. विशेष म्हणजे हा विधानसभा मतदारसंघ लातुर लोकसभेत येतो. आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत इथुन भाजपला मताधिक्य मिळालं. तर लोहा-कंधारचे आमदार असलेले प्रताप पाटील हे नांदेडचे खासदार म्हणून निवडुन आले आहेत. त्यामुळे आता लोहा-कंधार विधानसभेच्या निवडणुकीकडे जिल्ह्याच लक्ष लागलं आहे. लोहा कंधार मध्ये भाजपने प्रताप पाटील यांचे चिरंजीव प्रवीण पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. भाजपकडुन इथे माजी सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे,चिखलीकर यांची कन्या प्रनीता देवरे यांचीही नावे चर्चेत आहेत. तर हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने मुक्तेश्वर धोंडगे यांची उमेदवारी कायम मानली जात आहे. शिक्षण संस्थांच मोठं जाळं असणाऱ्या मुक्तेश्वर धोंडगे यांच्याकडे मनुष्यबळ भरपुर आहे पण त्याचा वापरच त्यांना करता आला नाही. त्यामुळे ते आजवर अयशस्वी झालेत. यावेळेला त्यांनीही कंबर कसली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडुन उमेदवारी गृहीत धरुन शंकरअण्णा धोंडगे कामाला लागले आहेत. पुर्ण मतदारसंघ शंकर अण्णानी पिंजुन काढला आहे. शेतकरी चळवळीतील एक धाडसी कार्यकर्ता म्हणून शंकर अण्णांना मतदारसंघात सहानुभुती असते मात्र ही सहानुभुती मतांत परावर्तीत करण गरजेचे आहे. त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने या मतदारसंघात लक्ष घातल पाहीजे. मात्र तसं होताना सध्या तरी दिसत नाही. कॉंग्रेसकडुन रोहीदास चह्वाण, अनील मोरे, बालाजी पांडागळे, संजय भोशीकर यांची नावं चर्चेत आहेत. तर शेकापकडुन पुरुषोत्तम धोंडगे हे ही नशीब अजमावणार आहेत. वंचीत आघाडीकडुन संजय बालाघाटे, शिवा नरंगले, विनोद पापिनवार, यांची नाव चर्चेत आहेत. शिवसेनेचे नेते तथा लिंगायत समाजाचे बडे प्रस्थ असलेले प्रा. मनोहर धोंडे हे देखील इथुन निवडणूकीसाठी मैदानात उतरु शकतात. शिवा संघटनेच्या माध्यमातुन त्यांचं मोठ संघटन लोहा-कंधार तालुक्यात आहे. त्यामुळे मनोहर धोंडे यांची भुमीका देखील महत्वपुर्ण आहे. लोहा कंधारच्या समस्या कायम दुष्काळी असलेला हा नांदेड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात अपुरे पर्जन्यमान होते. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचे नेहमीच हाल होत असतात. मात्र मानार प्रकल्पामुळे काही अंशी इथली सिंचनाची समस्या सुटण्यास मदत झाली आहे. सध्या मतदारसंघात रस्त्यांचे रुंदीकरण मोठ्या प्रमाणात होते. नागपुर-तुळजापुर हा राष्ट्रीय महामार्ग इथुन जात असल्याने दळणवळणाच्या सुविधा वाढतील अशी अपेक्षा आहे. आरोग्य, शिक्षणाच्या बाबतीत मात्र इथ मुलभुत सुवीधांचा अभाव आहे. उद्योगधंदे ही या दोन्ही तालुक्यात रुजलेच नाहीत. त्यामुळे शेती हा एकच प्रमुख व्यवसाय इथे आहे. शेताला लागणाऱ्या पाण्यासाठी नव्याने सिंचन प्रकल्प मंजुर करुन घेण्यात प्रताप पाटील यांना यश आलं आहे. त्यामुळे प्रताप पाटील खासदार बनले असले तरी इथले मतदार त्यांच्यावरचा हक्क सोडायला तयार नाहीत. त्यातुन या मतदार संघात भाजपची विजयी घौडदौड रोखण्यासाठी विरोधकांना कंबर कसावी लागणार आहे. पण इथले विरोधक विखुरलेले असल्यामुळे भाजपसाठी सध्या तरी हा मतदारसंघ सुरक्षीत मानल्या जात आहे. आगामी रणधुमाळीत इथं काय काय होईल? त्याचा अंदाज बांधणं सध्या तरी अवघड आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget