एक्स्प्लोर

बोईसर विधानसभा मतदारसंघ | बालेकिल्ला भेदणार कोण? शिवसेना भाजपामध्ये उमेदवारीवरुन चढाओढ

आदिवासी, कुणबी आणि वंजारी मतदार या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात असून शेतकऱ्यांसह, भूमीपूत्र आणि औद्योगिक क्षेत्रातील अनेक समस्यांनी हा मतदारसंघ घेरलेला आहे.

पालघर : बोईसर विधानसभा मतदारसंघ हा बहुजन विकास आघाडीच्या ताब्यात असलेला मतदारसंघ. विविध विकास कामे केल्याचा दावा जरी विद्यमान आमदारांकडून केला जात असला तरीही आजही हा मतदारसंघ मूलभूत सेवा सुविधांपासून वंचित असल्याचा आरोप स्थानिक मतदार आणि विरोधकांकडून केला जातोय. 2014 च्या निवडणुकीत बहुजन विकास आघाड़ीकडून पुन्हा विलास तरे निवडून आले त्यांनी शिवसेनेच्या कमलाकर दळवी यांचा पराभव केला तर भाजपमधून निवडणूक लढवत जगदीश धोडी तीन क्रमांकावर राहिले.

2009 च्या पुनरर्चनेनंतर नव्यानं अस्तित्वात आलेला बोईसर विधानसभा मतदारसंघ हा पालघर आणि वसई तालुक्यातील काही भाग मिळून हा तयार झालाय. अनुसुचित जमातीसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ देशातील मोठ्या औद्योगिक क्षेत्रापैकी एक असलेल्या बोईसर एमआयडीसीसाठी ओळखला जातो.

आदिवासी, कुणबी आणि वंजारी मतदार या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात असून शेतकऱ्यांसह, भूमीपूत्र आणि औद्योगिक क्षेत्रातील अनेक समस्यांनी हा मतदारसंघ घेरलेला आहे. औद्योगिक आणि अतिग्रामीण अशा दोन क्षेत्रात विभागलेल्या या मतदारसंघात 2 लाख 39 हजार 137 मतदार आहेत. 1 लाख 9 हजार 671 महिला असून 1 लाख 29 हजार 466 पुरुष मतदारांचा समावेश आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या विलास तरे यांना 52 हजार 837 मतं मिळाली होती. तर शिवसेनेच्या सुनील धानवा यांना 40 हजार 627 मतं मिळाली.

बहुजन विकास आघाडीच्या विलास तरे यांनी गेल्या काही वर्षात कामाचा धडाका लावल्याचा दावा करण्यात येतोय. विविध योजनातून सुमारे 250 कोटी रुपये त्यांनी आपल्या मतदारसंघावर खर्च केले असल्याचा त्यांचा दावाही आहे. मात्र पाहिजे तसा विकास ते करण्यात अपयशी ठरल्याची चर्चाही ऐकायला मिळत आहेत. प्रत्यक्षात ग्रामीण भागावर दुर्लक्ष असल्याचं दिसते.

बोईसर विधानसभा मतदार संघातील समस्या

- औद्योगिक क्षेत्रातील वाढतं जल आणि वायू प्रदुषणांच्या मोठ्या समस्या या मतदारसंघात आहेत. - बोईसर या औद्योगिक शहराचा खुंटलेला विकास. - स्थानिक भूमीपुत्रांचे प्रश्न प्रलंबित. - गौण खनिज उत्पन्नावर शासनाच्या जाचक अटी असल्यानं भूमिपूत्र नाराज. - ग्रामीण भागात पाणी आणि रस्त्याची दुरावस्था. - सुर्या नदीचं पाणी स्थानिक शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळत नाही. - मनोर या वाढत्या शहरातील रहदारीचा प्रश्न.

या समस्यांचं विकासकामांपेक्षा वरचढ ठरत असल्याने विरोधकांमध्ये आणि मतदारांमध्येही संमिश्र वातावरण दिसते.

विलास तरे हे बहुजन विकास आघाडीचे बोईसर विधानसभा या राखीव मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून गेले आहेत. 2009 मध्ये त्यांनी निवडणूक आयोगाला उमेदवारी अर्ज सादर करताना आपली शैक्षणिक पात्रता दहावी असल्याचे नमूद केली होती. 1995 साली पुणे विद्यापीठातून दहावी झाल्याचे त्यांनी नमूद केले होते. त्यानंतर ते 2014 मध्ये पुन्हा याच मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले. यावेळी आपण 1992–93 या वर्षांत पालघर जिल्ह्यातील दहिसर येथील गिरीजन शाळेतून दहावी झाल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते. पहिल्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी 1995 मध्ये पुण्यातून तर दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात पालघरमधून दहावी झाल्याचे नमूद केले असल्याने त्यांच्या शैक्षणिक अर्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडी बोईसर विधानसभा क्षेत्रासाठी नवीन उमेदवार देण्याच्या तयारीत असून राजेश पाटील यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे विद्यमान आमदार विलास तरे यांनी शिवसेनेची दारही ठोठावल्याची चर्चा ऐकायला मिळते. तर बोईसर मतदार मतदारसंघात सध्या कोकण विकास पाटबंधारे महामंडळावर उपाध्यक्ष असलेले शिवसेनेचे जगदीश धोडी यांनी जनतेमध्ये आपला विश्वास निर्माण करायला सुरुवात केली असून जनतेच्या लहानसहान समस्या सोडविण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे बोईसर विधानसभा क्षेत्रात जगदीश धोडी यांना मतदारांची पहिली पसंती असल्याची चर्चा आहे. तर जगदीश धोडी यांनी 2014 ची निवडणूक भाजप कडून लढविली होती म्हणून आताचा त्यांचा वसई पासून बोईसर पर्यंतचा जनसंपर्कही दांडगा केला आहे. त्यामुळे मातोश्री वरूनही जगदीश धोडी यांचे नाव निश्चित होण्याची चिन्ह आहेत. तर पालघर लोकसभेवर सतत लक्ष ठेऊन असलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि आमदार रवींद्र फाटक यांचाही जगदीश धोडी यांनाच दुजोरा असल्याची माहिती आतल्या गोटातून बोलली जात आहे. तर दुसरीकडे भाजपही या मतदार संघावर दावा ठोकण्याचा तयारीत असून भाजप कडून संतोष जनाठे यांच्या नावाची चर्चा असून तेही जोरदार तयारीला लागले आहेत. तर शिवसेनेकडून मागील निवडणुकीत पराभूत झालेले कमलाकर दळवी ह्याचाही उमेदवारीकरिता दावा आहे.

या मतदारसंघासाठी शिवसेनेकडून दुसऱ्या जिल्ह्यातील उमेदवार आयात करण्याची चर्चाही जोर धरू लागली आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर डॉ विश्वास वळवी नावाच एक नवीन वादळ पालघर जिल्ह्यात बॅनरबाजी करत घोंगाऊ लागल्याने स्थानिक शिवसैनिक आणि पदाधिकारी यांच्या पायाखालची जमीन सरकायला लागली आहे. ठाण्यातून पार्सल बोईसरमध्ये येण्याची चिन्हही आहेत. त्यामुळे बाहेरील उमेदवाराला येथे मोठा विरोध होण्याची चिन्ह आहेत. काही उमेदवार बंडखोरीही करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

ही सर्व समीकरण बदलत असताना बहुजन विकास आघाडीला आपला बोईसरचा गड कायम राखण कठीण बनत चालले असून शिवसेनेकडूनही जर स्थानिक आणि दमदार जनसंपर्क असलेला उमेदवार दिला नाही तर या मतदार संघांत काटे की टक्कर पाहायला मिळेल.

संभाव्य उमेदवार

  • विलास तरे - विद्यमान आमदार (बविआ)
  • डॉ. विश्वास वळवी (शिवसेना)
  • जगदीश धोडी (शिवसेना)
  • राजेश पाटील (बविआ)
  • संतोष जनाठे (भाजपा)
  • कमळाकर दळवी (शिवसेना)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget