एक्स्प्लोर

मागाठाणे विधानसभा मतदारसंघ | मराठी मतदारांच्या टक्क्यावर शिवसेना सरशी करणार?

सध्या मागाठाणे मतदारसंघाची सद्यस्थिती पाहिली तर पुन्हा एकदा युतीचा पारड या ठिकाणी जड दिसतं. कारण प्रकाश सुर्वे आणि प्रवीण दरेकर हे दोन्ही युतीचे उमेदवार आमदार असून प्रवीण दरेकर हे विधानपरिषदेवर आमदार असल्याने जवळपास प्रकाश सुर्वे हे नाव या मतदारसंघातून निश्चित आहे.

उत्तर मुंबईतील मराठी भाषिकांचा, मराठी मतदारांचा ओळखला जाणार हा महत्वाचा मतदार संघ आहे. 2009 साली दहिसरचा काही भाग आणि बोरीवली  विधानसभा मतदार संघांचा काही भाग मिळून हा मागाठाणे मतदार संघ तयार झाला. या विधानसभा क्षेत्रात मराठी मतदार हा महत्वाचा फॅक्टर म्हणता येईल. त्यामुळे 2009 साली या मागाठाणे मतदारसंघातून मनसे निवडून आली होती तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने हा मतदारसंघ आपल्याकडे आणला. त्यामुळे हा मतदार संघ कोणत्याही एका पक्षाचा गड म्हणून ओळखला जात नाही. जो पक्ष मराठी मतदारांचे मन जिंकेल तो पक्ष याठिकाणी विजयाच्या जवळ जातो. काय आहे या मतदारसंघाचा राजकीय इतिहास ? मागाठाणे विधानसभा मतदारसंघ जेंव्हा 2009 साली अस्तित्वात आला तेंव्हा मनसेची ही पहिली विधानसभा निवडणूक होती. मराठीचा मुद्दा, मराठी माणसाच्या समस्या, मराठी लोकांसाठीचा पक्ष म्हणून मनसे समोर आला होता. त्यामुळे नव्यानं तयार झालेल्या मागाठाणे मतदार संघात त्यावेळी मनसेत असलेले प्रवीण दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर दुसरीकडे त्यावेळी राष्ट्रवादीत असलेले प्रकाश सुर्वे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, 2009 च्या निवडणुकीत मनसेचे प्रवीण दरेकर विजयी झाले होते. हे ही वाचा - वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ | मातोश्रीच्या अंगणातला गड वाचवण्यासाठी शिवसेनेला जोर लावावा लागणार त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत प्रकाश सुर्वे यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला आणि पुन्हा एकदा त्यावेळी मनसेत असलेल्या प्रवीण दरेकर विरोधात निवडणूक लढवत हा मतदारसंघ मनसेकडून शिवसेनेकडे आणला. पुढे प्रवीण दरेकर यांनी सुद्धा मनसेला रामराम ठोकत निवडणुकीनंतर भाजपमध्ये प्रवेश केला आणि सद्यस्थितीत ते विधानपरिषदेवर आमदार म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे हा मतदारसंघ तसा कोणत्या एका पक्षाचा किंवा उमेदवाराचा नाही. येथे चित्र प्रत्येक निवडणुकीला बदलताना दिसते. काय आहे मागाठाणेची सध्याची राजकीय परिस्थिती ? सध्या मागाठाने मतदारसंघाची सद्यस्थिती पाहिली तर पुन्हा एकदा युतीच्या उमेदवाराचा पारड या ठिकाणी जड दिसतं. कारण प्रकाश सुर्वे आणि प्रवीण दरेकर हे दोन्ही युतीचे उमेदवार आमदार असून प्रवीण दरेकर हे विधानपरिषदेवर आमदार असल्याने ते सुद्धा आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक आहेत तर विद्यमान आमदार  प्रकाश सुर्वे हे शिवसेनेकडून पुन्हा एकदा उभं राहण्यास इच्छुक आहेत. मतदारसंघात दोन्ही उमेदवारांचा चांगला जनसंपर्क आहे, दोघेही आमदार असल्याने अनेक विकास काम केल्याने मतदारांचा विश्वास त्यांच्यासोबत आहे. त्यामुळे युतीचा उमेदवार कोण ? याबाबत चुरस कायम आहे. मागाठाणे मतदारसंघात काय कामं झाली, काय राहिली ? मागाठाणेमध्ये दोन आमदार असताना सुद्धा काही प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. या मतदारसंघामध्ये बोरीवली नॅशनल पार्कचा भाग येतो. त्याठिकाणी असलेल्या वनविभागाच्या जमिनी संदर्भातले प्रश्न प्रलंबित आहे. शिवाय आदिवासी पाड्यात मूलभूत सुविधांचे प्रश्न अजूनही भेडसावत आहेत. या भागात असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न सुद्धा समोर येतो. मिठी नदीच्या स्वच्छतेचा प्रश्न अजूनही कायम आहे. राज्यभरात येणाऱ्या एसटी बस ज्या ठिकाणी उभा राहतात आणि जिथून राज्यातल्या अनेक भागात जातात असा बोरिवलीतील नॅसी बस डेपोचा प्रकल्प गेल्या काही दिवसापासून प्रलंबित आहे. तर मागाठाणेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून या दोन्ही आमदारांनी अनेक कल्याणकारी काम केली आहे. या  ठिकाणी मोठं डायलिसिस सेंटर उभारण्यात आलं आहे. शिवाय, रस्त्याची कामं,  सार्वजनिक शौचालयाची कामं झपाट्याने करण्यात आली. हे देखील वाचा -चांदिवली विधानसभा मतदारसंघ | नसीम खान यांच्यासमोर यंदा तगडे आव्हान या मतदारसंघात भाजप-शिवसेना यांच्यातील श्रेयवादाची लढाई मागील पाच वर्षात अनेकदा चर्चेचा विषय बनला. शौचालयाचा उद्घाटन असू द्या किंवा मग अग्निशमन विभागाचं उद्घाटन.  प्रकाश सुर्वे आणि प्रवीण दरेकर यांच्या समर्थकांमध्ये श्रेयवादाची लढाई अनेकदा पाहायला मिळाली. या गोष्टीचा फटका या निवडणुकात बसू नये याची काळजी आता युतीकडून घेतली जाईल. तर दुसरीकडे जर यदा कदाचित शिवसेना भाजप वेगळे लढले तर मात्र पुन्हा एकदा तिसऱ्यांदा प्रकाश सुर्वे विरोधात प्रवीण दरेकर भाजपकडून उभे राहू शकतात. इच्छुक उमेदवारांमध्ये आणखी एक नाव आहे ते म्हणजे मनसेचे नयन कदम. नयन कदम यांनी याआधी बोरीवली मतदारसंघातून निवडणूक लढवली होती मात्र तिथे त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे आता ते मराठी कार्ड वापरून मनसेला पुन्हा एकदा हा मतदारसंघ आणून देण्यासाठी इच्छुक आणि प्रयत्नशील असणार आहे, अशी चर्चा आहे. त्यांचा या मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. तर या निवडणुकांमध्ये मनसे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडीत गेले तर नयन कदम हे आणखी मजबूत उमेदवार म्हणून प्रकाश सुर्वेंना टक्कर देऊ शकतील. काँग्रेस- राष्ट्रवादीकडून अजूनही या मतदारसंघातून कोणाला उभं करायचं याची चाचपणी सुरु आहे. मागाठाणे मतदारसंघात काय कामं झाली, काय राहिली ? मागाठाणेमध्ये दोन आमदार असताना सुद्धा काही प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. या मतदारसंघामध्ये बोरीवली नॅशनल पार्कचा भाग येतो. त्याठिकाणी असलेल्या वनविभागाच्या जमिनी संदर्भातले प्रश्न प्रलंबित आहे. शिवाय आदिवासी पाड्यात मूलभूत सुविधांचे प्रश्न अजूनही भेडसावत आहेत. या भागात असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न सुद्धा समोर येतो. मिठी नदीच्या स्वच्छतेचा प्रश्न अजूनही कायम आहे. राज्यभरात येणाऱ्या एसटी बस ज्या ठिकाणी उभा राहतात आणि जिथून राज्यातल्या अनेक भागात जातात असा बोरिवलीतील नॅसी बस डेपोचा प्रकल्प गेल्या काही दिवसापासून प्रलंबित आहे. तर मागाठाणेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मोठं डायलिसिस सेंटर उभारण्यात आलं आहे. शिवाय, रस्त्याची कामं,  सार्वजनिक शौचालयाची कामं झपाट्याने करण्यात आली. मागाठाणे मतदार संघ 2014 निवडणूक निकाल मतदार -3,06,293 मतदार प्रकाश सुर्वे ( शिवसेना) -65,016 मतं हेमेंद्र मेहता ( भाजप)- 44,631 मतं प्रवीण दरेकर ( मनसे ) - 32,057 मतं सचिन सावंत( काँग्रेस ) -12,202 मतं जाणून घ्या या मतदारसंघाविषयी
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
Ratnagiri Lote MIDC : इटलीतून हद्दपार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
Embed widget