एक्स्प्लोर

मध्य प्रदेशातील मतमोजणी पूर्ण, काँग्रेस सर्वात मोठा पक्ष

Madhya PradeshAssembly Election Live Results 2018 : 230 जागांच्या मध्य प्रदेश विधानसभेत 114 जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. परंतु काँग्रेसला बहुमतासाठी दोन जागा कमी पडल्या.

भोपाळ : तब्बल 24 तासांनंतर मध्य प्रदेशातील मतमोजणी पूर्ण झाली आहे. सकाळी सव्वा आठच्या सुमारास आघाडीवर असलेल्या काँग्रेस उमेदवाराचा निकाल लागला आणि 230 जागांची मतमोजणी संपली. 230 जागांच्या मध्य प्रदेश विधानसभेत 114 जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. परंतु काँग्रेसला बहुमतासाठी दोन जागा कमी पडल्या. 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपला खाली खेचण्यात काँग्रेसला यश आलं. भाजपला इथे 109 जागा मिळवता आल्या. तर इतरांच्या खात्यात सात जागा जमा झाल्या आहेत. त्यामध्ये मध्य बसपाच्या 2, सपाची 1 आणि अपक्षांच्या चार जागा आहेत. महत्त्वाचे म्हणजे हे चारही अपक्ष काँग्रेसचेच बंडखोर आहेत. सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी काँग्रेसने सोमवारी (11 डिसेंबर) रात्री राज्यपालांना भेटण्याची वेळ मागितली. फॅक्स आणि ई-मेलद्वारे काँग्रेसने राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे भेटण्याची वेळ मागितली. मात्र सर्व निकाल स्पष्ट झाल्यानंतरच वेळ देण्यात येईल, असं राज्यपाल कार्यालयाकडून सांगण्यात आलं. मध्य प्रदेशात काँग्रेसचे सत्ता स्थापनेचे प्रयत्न सुरु, राज्यपालांकडे मागितली वेळ परंतु सरकार स्थापनेसाठी काँग्रेसला अपक्ष किंवा बसपा-सपाची मदत घ्यावी लागेल, हे स्पष्ट आहे. मध्य प्रदेशात निवडून आलेले चार अपक्ष उमेदवार हे काँग्रेसचेच बंडखोर आहेत. त्यापैकी वारासिवनी मतदारसंघाच्या आमदाराने आपलं प्राधान्य काँग्रेसच असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस आपल्याच बंडखोरांना सोबत घेणार की बसपा-सपाची साथ घेणार हे लवकच स्पष्ट होईल. दुसरीकडे काँग्रेस मोठा पक्ष असला तरी बहुमत नाही. त्यामुळे भाजपही सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष राकेस सिंह यांनी ट्विटरवरुन दिली. अनेक अपक्ष आणि इतर आमदार आमच्या संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळे राजकीय घोडेबाजार रंगण्याची दाट चिन्हं आहेत. काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदासाठी दोन नावं आघाडीवर आहेत. यामध्ये कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांचा समावेश आहे.
    • मध्य प्रदेशात समाजवादी पक्षाचा काँग्रेसला पाठिंबा, अखिलेश यादव यांची माहिती
    • शिवराज सिंह चौहान यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
    • सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसचा मार्ग मोकळा, बहुमत नसल्याने सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही, शिवराज सिंह चौहान यांची माहिती
    • मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये बसपा काँग्रेसला समर्थन देणार, मायावतींची माहिती
  • मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या निवासस्थानी भाजपची बैठक, निकालावर चर्चा होणार, कैलाश विजयवर्गीय, विनय सहस्त्रबुद्धे बैठकीला उपस्थित
  • मध्य प्रदेशातील मजमोजणी पूर्ण : अंतिम निकाल काँग्रेस 114, भाजप 109, इतर 7 (बसपा 2, सपा 1, अपक्ष 4)
  • मध्य प्रदेशातील मतमोजणी पूर्ण, काँग्रेस सर्वात मोठा पक्ष
  • भगवानपुरा : केदार चिदाभाई दवार : काँग्रेस बंडखोर वारासिवनी : प्रदीप अमृतलाल जैसवाल : काँग्रेस बंडखोर, (प्राधान्य काँग्रेस असल्याचा बंडखोराचा दावा) सुसनेर : विक्रम सिंह राणा गुड्डू भाई : काँग्रेस बंडखोर बुरहानपूर : ठाकूर सुरेंद्र सिंह नवल सिंह : काँग्रेस बंडखोर
  • मध्य प्रदेशात भाजपही सत्ता स्थापनेसाठी दावा करणार, काँग्रेसला बहुमत नाही, अनेक अपक्ष आणि इतर भाजपच्या संपर्कात, राज्यपालांना भेटणार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांची ट्विटरवरुन माहिती
  • मध्य प्रदेशातील मतमोजणी पूर्ण, काँग्रेस सर्वात मोठा पक्ष
  • कमलनाथ यांचं राज्यपालांना पत्र, सत्ता स्थापनेसाठी वेळ देण्याची मागणी, मात्र अंतिम निकाल स्पष्ट झाल्यानंतरच वेळ मिळणार, राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचं पत्राला उत्तर
  • मध्य प्रदेशची मतमोजणी अजूनही सुरु, 230 पैकी 229 जागांचे निकाल जाहीर, एका जागेचा निकाल अद्याप बाकी, एका जागेवर काँग्रेस उमेदवार आघाडीवर
  • मध्य प्रदेशातील मतमोजणी पूर्ण, काँग्रेस सर्वात मोठा पक्ष
  • बारही, भोपाळ दक्षिण पश्चिम, चंदला, देवरी, देवताला, गरोथ, जोबत, कास्रावद, खर्गापूर, मंधाता, मेहगाव, नेपानगर, राजनगर या मतदारसंघांतील निकाल रखडला
  • मध्य प्रदेशात काँग्रेसची पुन्हा आघाडी, कलानुसार काँग्रेस 116, भाजप 104 इतर 10 जागा
  • मध्य प्रदेशात बहुमत जमवण्याची जबाबदारी दिग्विजय सिंह यांच्याकडे सोपवली : सूत्र
  • मध्य प्रदेशात दोलायमान स्थिती कायम; भाजप 113, काँग्रेस 107, इतर 10
  • मध्य प्रदेशात 19 जागांवर 500 मतांसाठी ओढाताण, सत्ताकारण याच 19 जागा ठरवणार
  • मध्य प्रदेशात समाजवादी पक्ष काँग्रेसच्या समर्थनार्थ
  • मध्य प्रदेश : बसपा भाजपला पाठिंबा देणार नाही : सूत्र
  • बसप अध्यक्षा मायावतींनी विजयी आमदारांना दिल्लीला बोलावलं, भाजपला समर्थन न देण्याचा निर्णय, सूत्रांची माहिती
  • मध्य प्रदेशात भाजपची तातडीची बैठक होणार, सत्ता स्थापनेच्या शक्यतांवर चर्चा होण्याची शक्यता; भाजप 109, काँग्रेस 109, इतर 12
  • मध्य प्रदेश : पुन्हा चित्र बदललं, भाजप 103, काँग्रेस 115 आणि इतर 12
  • मध्य प्रदेश : कल क्षणाक्षणात बदलत असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
  • मध्य प्रदेशात भाजपच्या सत्ता स्थापनेच्या हालचाली, अपक्ष-इतरांमधील 10 उमेदवार संपर्कात असल्याचा भाजपचा दावा
  • मध्य प्रदेशात भाजप-काँग्रेसमध्ये चुरस कायम, भाजप 111, काँग्रेस 110 आणि इतर 9 जागा
  • मध्य प्रदेश : भाजप 96, काँग्रेस 118 आणि इतर 16 जागा
  • मध्य प्रदेशात सत्ताधारी भाजपला धक्का, कलानुसार काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला, भाजप, 97, काँग्रेस 117 आणि इतर 16 जागा
  • मध्य प्रदेशात काँग्रेस कार्यालयाबाहेर गर्दी, कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण
  • कलानुसार, मध्य प्रदेशात काँग्रेसला बहुमत, भाजप 99, काँग्रेस 116, इतर 15
  • मध्य प्रदेशात पेच कायम, भाजप-काँग्रेसमध्ये चुरस, मायावती किंगमेकर ठरण्याची शक्यता
  • मध्य प्रदेश : जसं 2014 मध्ये लोकांनी मोदी हवे, असं मत बनवलं होतं, तसंच यंदा मोदी नको हे मत बनवलं आहे : राजीव सातव
  • मध्य प्रदेशात भाजप-काँग्रेसमध्ये चुरस, बसपा किंगमेकरच्या भूमिकेत
  • मध्य प्रदेशात काँग्रेस-भाजपमध्ये काँटे की टक्कर, भाजप 109, काँग्रेस 109 जागांवर आघाडीवर
  • मध्य प्रदेशातील आतापर्यंतच्या कलामध्ये काँग्रेस आणि भाजपची शंभरी पार, काँग्रेस 110 तर भाजप 102 जागांवर आघाडीवर
  • मध्य प्रदेशात काँग्रेसचं शतक पूर्ण
  • मध्य प्रदेशात काँग्रेसची आघाडी कायम, 94 जागांवर पुढे तर भाजप 87 जागांवर आघाडीवर
  • काँग्रेस 10 जागांवर आघाडीवर, तर भाजप 9 जागांवर पुढे
  • मध्य प्रदेशात भाजप आघाडीवर, भाजप 9, काँग्रेस 6, इतर तीन
  • मध्य प्रदेशचा पहिला कल, काँग्रेस दोन जागांवर आघाडीवर
----------------------- भोपाळ :मध्य प्रदेश विधानसभेवर कोणाचा झेंडा हे आज जाहीर होईल. निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजता सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात 28 नोव्हेंबर रोजी मतदान झालं होतं. मतदानानंतर केलेल्या एक्झिट पोलमध्ये सत्ताधारी काँग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळेल असा अंदाज वर्तवला आहे. मात्र दोन्ही पक्ष आपापल्या विजयाचा दावा करत आहे. मध्य प्रदेश विधानसभेच्या 230 जागांसाठी 51 जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. सुरुवातीला पोस्टल मतमोजणी होईल. त्यानंतर साडेआठ वाजल्यापासून ईव्हीएम मतांची मोजणी होईल. या निवडणुकीत एकूण 5,04,95,251 मतदारांपैकी 3,78,52,213 मतदारांनी म्हणजेच 75.05 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. आज 1,094 अपक्ष उमेदवारांसह एकूण 2,899 उमेदवारांच्या भवितव्याच्या फैसला होणार आहे. यामध्ये 2,644 पुरुष, 250 महिला आणि पाच तृतीयपंथी उमेदवारांचा समावेश आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : पुण्यात ठाकरेसेना 91 तर मनसे 74 जागा लढणार, राज-उद्धव अंतिम फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब करणार
पुण्यात ठाकरेसेना 91 तर मनसे 74 जागा लढणार, राज-उद्धव अंतिम फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब करणार
Prashant Jagtap Pune: काँग्रेसकडून ऑफर, ठाकरे अन् शिंदेंचाही फोन; कोणत्या पक्षात जाणार?; प्रशांत जगतापांनी अखेर सगळं सांगितलं!
काँग्रेसकडून ऑफर, ठाकरे अन् शिंदेंचाही फोन; कोणत्या पक्षात जाणार?; प्रशांत जगतापांनी अखेर सगळं सांगितलं!
Pune Election Shivsena: नीलम गोऱ्हे कमर्शियल पद्धतीने उमेदवारांना तिकीटं देतायत, भाजपच्या सांगण्यानुसार वागतात; पुण्यातील शिवसैनिकांचा गंभीर आरोप
नीलम गोऱ्हे कमर्शियल पद्धतीने उमेदवारांना तिकीटं देतायत, भाजपच्या सांगण्यानुसार वागतात; पुण्यातील शिवसैनिकांचा गंभीर आरोप
Prashant Jagtap: 27 वर्ष शरद पवारांसोबत एकनिष्ठ राहिले, पण तत्त्वांशी तडजोड करण्याची वेळ येताच राजीनामा टाकला, कांँग्रेस-ठाकरे गटाकडून ऑफर, कोण आहेत प्रशांत जगताप?
27 वर्ष शरद पवारांसोबत एकनिष्ठ राहिले, पण तत्त्वांशी तडजोड करण्याची वेळ येताच राजीनामा टाकला, कांँग्रेस-ठाकरे गटाकडून ऑफर, कोण आहेत प्रशांत जगताप?

व्हिडीओ

Pimpari NCP Alliance : दोन्ही राष्ट्रवादीचा तिढा दोन जागांवर अडला, त्या 2 इच्छुकांनी सांगितल्या अटी
Rohit Pawar On Ajit Pawar : सगळी जबाबदारी अमोल कोल्हेंवर, अजितदादांसोबत बैठकीला मी नव्हतो
Uddhav Thackeray Calls Prashant Jagtap : उद्धव ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, ऑफर स्वीकारणार
Vidarbha Mahayuti News : नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि अमरावतीसाठी महायुती एकत्र; युतीवर शिक्कामोर्तब
Navi Mumbai airport first flight : नवी मुंबई विमानतळ सेवेत, पहिलं विमान हवेत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : पुण्यात ठाकरेसेना 91 तर मनसे 74 जागा लढणार, राज-उद्धव अंतिम फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब करणार
पुण्यात ठाकरेसेना 91 तर मनसे 74 जागा लढणार, राज-उद्धव अंतिम फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब करणार
Prashant Jagtap Pune: काँग्रेसकडून ऑफर, ठाकरे अन् शिंदेंचाही फोन; कोणत्या पक्षात जाणार?; प्रशांत जगतापांनी अखेर सगळं सांगितलं!
काँग्रेसकडून ऑफर, ठाकरे अन् शिंदेंचाही फोन; कोणत्या पक्षात जाणार?; प्रशांत जगतापांनी अखेर सगळं सांगितलं!
Pune Election Shivsena: नीलम गोऱ्हे कमर्शियल पद्धतीने उमेदवारांना तिकीटं देतायत, भाजपच्या सांगण्यानुसार वागतात; पुण्यातील शिवसैनिकांचा गंभीर आरोप
नीलम गोऱ्हे कमर्शियल पद्धतीने उमेदवारांना तिकीटं देतायत, भाजपच्या सांगण्यानुसार वागतात; पुण्यातील शिवसैनिकांचा गंभीर आरोप
Prashant Jagtap: 27 वर्ष शरद पवारांसोबत एकनिष्ठ राहिले, पण तत्त्वांशी तडजोड करण्याची वेळ येताच राजीनामा टाकला, कांँग्रेस-ठाकरे गटाकडून ऑफर, कोण आहेत प्रशांत जगताप?
27 वर्ष शरद पवारांसोबत एकनिष्ठ राहिले, पण तत्त्वांशी तडजोड करण्याची वेळ येताच राजीनामा टाकला, कांँग्रेस-ठाकरे गटाकडून ऑफर, कोण आहेत प्रशांत जगताप?
Bharat Gogawale Son Vikas Gogawale Raigad News मोठी बातमी: मंत्री गोगावलेंचा पुत्र 24 दिवसांपासून पोलिसांना सापडेना, विकास गोगावलेंचा अटकपूर्व जामीनही फेटाळला, नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी: मंत्री गोगावलेंचा पुत्र 24 दिवसांपासून पोलिसांना सापडेना, विकास गोगावलेंचा अटकपूर्व जामीनही फेटाळला, नेमकं प्रकरण काय?
Raigad Crime: खोपोलीत शिंदे गटाच्या नगरसेविका मानसी काळोखेंच्या पतीला हल्लेखोरांनी संपवलं, मुलाला शाळेत सोडून परत येताना घात झाला
खोपोलीत शिंदे गटाच्या नगरसेविका मानसी काळोखेंच्या पतीला हल्लेखोरांनी संपवलं, मुलाला शाळेत सोडून परत येताना घात झाला
Sharad Pawar NCP Probable Candidate List BMC Election 2026: शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबईतील संभाव्य उमेदवारांची पहिली यादी समोर, कोणाकोणाला संधी?
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबईतील संभाव्य उमेदवारांची पहिली यादी समोर, कोणाकोणाला संधी?
Jaykumar Gore: 'काय होता तू काय झाला तू, शकुनी मामा बरबाद झाला तू,' जयकुमार गोरे रामराजेंवर तुटून पडले
'काय होता तू काय झाला तू, शकुनी मामा बरबाद झाला तू,' जयकुमार गोरे रामराजेंवर तुटून पडले
Embed widget